मुजीब तांबोळी यांच्या प्रचाफेरीस उस्फुर्त प्रतिसाद तांबोळी यांचे समाजकार्य हीच यशाची ग्वाही.,


 मुजीब तांबोळी यांच्या प्रचारफेरीस उस्फुर्त प्रतिसाद, तांबोळी यांचे समाजकार्य हीच यशाची ग्वाही.

पंढरपूर (प्रतिनिधी)


पंढरपूर येथे नगरपालिका निवडणुकीत प्रचारात रंगत येत असून प्रभाग क्रमांक १८ अ मधून  अपक्ष उमेदवार असून जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन आपली विकासाची भूमिका मांडत आहेत. मुजीब तांबोळी हे दिलखुलास आणि दिलदार वृत्तीचे बहारदार व्यक्तिमत्व असल्याने जनमानसात त्यांना आदराचे व मानाचे स्थान आहे.

तांबोळी कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवेत अग्रेसर असून प्रभागातील विविध समस्या त्यांनी एका चुटकी सरशी सोडविल्या आहेत.  सर्वच पक्षांनी मुस्लिम समाजावर अन्याय केला असून कोणत्याही पक्षाने नगरपालिका निवडणुकीत तिकीट दिले नाही, हा या अल्पसंख्य समाजावर अन्याय असून समाजाची परखड भूमिका मांडण्यासाठी तरुण तडफदार उमेदवार मुजीब तांबोळी यांना विजयी करणे गरजेचे आहे. प्रभागात विकासाची गंगा वाहत असून हजारो रहिवासी त्यांच्या विकासकांवर समाधानी आहेत.

मुजीब तांबोळी यांचे मोठे बंधू मुनीर तांबोळी हे देखील या भागात अनेक वर्षे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

नगरपालिकेत त्यांच्या शब्दाची तात्काळ दखल घेऊन अनेक विकासकामे केली आहेत, यामुळे मुजीब तांबोळी यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत असल्याची चर्चा रंगली आहे, या प्रभागात अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येतील अशी खात्री लोक व्यक्त करीत आहेत.

वीज, गटारीची समस्या, खड्डे रस्त्याची कामे, अशा विविध समस्या त्यांनी सोडविल्या आहेत.

जनतेची कामे करण्या बरोबरच समाजसेवा करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात,

पूरग्रस्त लोकांना त्यांनी संकटकाळात सर्वात आधी आणि मोलाची मदत करून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले होते, तसेच कोरोना काळात धोकादायक परिस्थिती असतानाही जीवाची पर्वा न करता रुग्णांना क्वारंटाइन सेंटर उभे करून वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून हजारो गोरगरिबांचे जीव वाचविले आहेत,

गणेशोत्सवात अन्नदान, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला.

महिला, भगिनी यांच्यासाठी 

नवरात्र उत्सव काळात अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले आहे.

अशा विविध प्रकारच्या कामाची पावती विजयी रूपाने मिळणार अशी चर्चा पंढरपूर शहरातून होत आहे. त्यांनी केलेली समाजसेवा आणि दानशूर वृत्ती हीच त्यांच्या यशाची जमेची बाजू आहे.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.