पंढरपूर एम आय डी सी मध्ये उद्योग करण्यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावेत. आ. समाधान आवताडे.
पंढरपूर एम.आय.डी.सी मध्ये उद्योग करण्यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे - आमदार समाधान आवताडे कासेगाव हद्दीत एमआयडीसी होणार; उद्योजक क्षेत्रासाठी उद्योजकांनी मागणी करावी पंढरपूर (प्रतिनिधी:)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खाजगी २१.५१ हे.आर क्षेत्रामध्ये लघु ,मध्यम व इतर उद्योजकांसाठी लागणारी जमीन मागणी बाबतचा प्रस्ताव शासनाकडे जास्तीत जास्त उद्योजकांनी पाठवावेत आपण उद्योगासाठी मागणी केल्यानंतरच पंढरपूर तालुक्यातील अनेक दिवसापासून चे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे असे आवाहन पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून साकार होत असलेल्या एमआयडीसी मुळे प्रगतशील व बागायत शेती क्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील द्राक्षे, डाळिंब व इतर फळे, पीके उत्पादन मालास आयात-निर्यात तसेच प्रकिया माध्यमातून मोठी व्यावसायिक व उद्योग बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार कालखंडात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाल्याने पंढरीत येणाऱ्या वार...