पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ शीतल शहा उत्कृष्ठ बालरोगतज्ज्ञ या पुरस्काराने सन्मानित.


 पंढरीचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा उत्कृष्ठ बालरोग तज्ञ या पुरस्काराने सन्मानित,

कोल्हापूर येथे पार पडला सत्कार सोहळा.

पंढरपूर (प्रतिनिधी)केवळ सोलापूर जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बालरुग्णांचे देवदूत अशी ओळख असलेले पंढरपूर येथील डॉ शीतल शहा यांना कोल्हापूर येथे शुक्रवार दि.३०मे रोजी उत्कृष्ठ बालरोग तज्ज्ञ या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ शीतल शहा हे ४५वर्षापासुन पांडुरंगाच्या पावन नगरीत बालरुग्णांची सेवा करीत आहेत,

आजपर्यंत त्यांनी हजारो बालकांना जीवदान दिले आहे, अनेक अतिशय अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करुन अक्षरशः बालकांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले आहे, इतकेच नव्हे तर पैसा नसेल तरीही सामाजिव कर्तव्य म्हणुन मोफत उपचार करुन रुग्णसेवा केली आहे,

नुकतेच त्यांनी अकलूज येथील चिमुकलीस क्लिष्ट अशा त्वचारोगातून बरे केले होते.

शिवसेना वैद्यकीय कक्ष व श्रीकांत दादा शिंदे फाऊंडेशन आयोजित हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

या सन्मान सोहळ्यास कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली,सोलापूर, जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी, डॉक्टर, मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ शीतल शहा यांनी अनेक बालकांना नवजीवन दिल्याने पंढरीत अनेक पालक ऋण व्यक्त करीत त्यांचा वाढदिवस साजरा करतात, डॉ शीतल शहा यांनी वैयक्तिक मौजमजा याला फाटा देत हॉस्पिटल साठी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक साधन सामुग्री, सुसज्ज रुग्णालय उभे केले आहे,या कार्यक्रमास  शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, सोलापूर येथील शिवसेना शिंदे गट महिला प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे, पंढरपूर येथील हभप देवव्रत उर्फ राणा महाराज वासकर ,राम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

पंढरपूर येथे ही सुवार्ता समजताच डॉ शीतल शहा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.