जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषदेच्या वतीने वृक्षारोपण.
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपूर येथे भारत विकास परिषद यांच्या वतीने वृक्षारोपण*
पंढरपूर (प्रतिनिधी) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे झाडे झुडपे, हेच आपले पाहूणे.
पावसाळा सुरू झाला की सर्वत्र झाडे लावण्याचा उपक्रम सुरू होतो.
आज गुरुवार दिनांक दि.५ जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारत विकास परिषद यांच्या वतीने दोन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
वेगवेगळ्या जातीची रोपे प्रकल्प प्रमुख सौ. भाग्यश्री लिहिणे व सौ. रेखाताई टाक सौ. सीमाताई कुलकर्णी यांच्या सहकार्याने पंढरपूर येथील इसबावी परिसरातील सह्याद्री नगर मधील महादेव मंदिर पटांगणात
तसेच नवीन कराड नाका परिसरात रघुकुल सोसायटी मधील श्री राम मंदिर येथे झाडे लावण्यात आली.
वड, पिंपळ, बकुळ, औदुंबर, करंजा अशा विविध वृक्षांची लागवड करून योग्य संवर्धन होण्यासाठी ट्री गार्ड बसविण्यात आले.
यावेळी भारत विकास परिषद चे संस्थापक, अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे, अध्यक्षा सौ रोहिणी कोर्टीकर, डॉ. वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, मंदार लोहोकरे, डॉ. अनिल पवार, डॉ. माने, सतीश कोर्टीकर, सौ. संध्या साखी, मिलिंद वाघ, पत्रकार चैतन्य उत्पात, राजीव कुलकर्णी, जगदीश टाक, मनोज कुलकर्णी हे पदाधिकारी सदस्य व रघुकुल सोसा. चे श्रीकांत देशपांडे, सौ. लाड, सच्चिदानंद कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षा रोहिणी कोर्टीकर यांनी मानवी जीवनात तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावणे, किती गरजेचे व महत्वाचे आहे याची माहिती दिली.
त्या म्हणाल्या , मानवी जीवनात पाणी जेवढे आवश्यक आहे तेवढेच झाडे सुद्धा आहेत,
झाडांमुळे फळे,फुले, अन्नधान्य, पक्ष्यांना निवारा, मानवांना सावली, असे अनेक फायदे आहेत, झाडांची मुळे पाणी शोषून आणतात, झाडांमुळे कोणत्या जमिनीत पाणी आहे याची माहिती मिळू शकते, असे सांगितले.
यावेळी सौ. रेखाताई टाक यांनीही वृक्षारोपण आजच्या काळात कसे उपयुक्त आहे याची माहिती दिली. सौ. संध्या सखी यांनी काव्यातून झाडांचे महत्व विषद केले.
वृक्ष प्रेमी मंडळाचे श्री.सुनील वाळुंजकर , व श्री.सोमनाथ होरणे यांच्या सहकार्याने आजचा प्रोजेक्ट केला आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment