पंढरीत शिक्षणपद्धतीवर भाष्य करणाऱ्या, बिकमिंग यु द बेस्ट, या पुस्तकाचे उत्साही वातावरणात प्रकाशन.
पंढरीत शिक्षणपद्धतीवर
भाष्य करणाऱ्या" बिकमिंग यु द बेस्ट "या पुस्तकाचे उत्साही वातावरणात प्रकाशन.
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात बिकमिंग यू द बेस्ट, या
आगळ्यावेगळ्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले मूळ भारतीय व पंढरपूर येथील शिरीष पारिपत्यदार यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
यावेळी व्यासपीठावर डॉ अनिल जोशी, प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश दीक्षित, सौ उज्वला दीक्षित, आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे डॉ प्रकाश दीक्षित म्हणाले , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक संवाद रुपी हे पुस्तक असून
शहाणे करून सोडावे सकल जन, हा साने गुरुजींचा विचार अंमलात आणला आहे.
पालक,शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी असणारे हे मॅन्युअल आहे. भाषा इंग्रजी आहे, पण सोपी आहे चिंतनशील आशय, चित्रे समर्पक आहेत.
जीवनात गुरूचे, आईचे संस्कार महत्वाचे असतात.
हे पुस्तक म्हणजे अजोड,मौल्यवान, अनुकरणीय ठेवा आहे.
नरसिंह जोशी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सोप्या इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले आहे,
प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया, यांनी हे पुस्तक अभ्यासावे, शिक्षण देण्याइतके पवित्र जगात दुसरे काही नाही ही प्रक्रिया अंतापर्यंत चालू असते.
यावेळी बिकमिंग यु द बेस्ट या पुस्तकाचे लेखक शिरीष पारिपत्यदार म्हणाले, नव्या युगात टिकण्यासाठी पारंपरिक शिक्षणपद्धती बाजूला सारून नवीन सोप्या, मात्र उपयुक्त अशा स्मार्ट बाबीचा अवलंब केला पाहिजे. मोठे होऊ तसे मार्ग शोधावे लागतात, शाळा कशी असावी याचे व्हिजन या पुस्तकात देण्यात आले आहे. पाच घटनांमधून शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाली,
यावेळी निवृत्त शासकीय अभियंते बाळासाहेब पोरे,
दीपक पारीपत्यदार यांची भाषणे झाली.
डॉ अनिल जोशी यांनी शिरीष पारिपत्यदार यांचा परिचय करून दिला,
१९७३साली एस एस सी परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये आलेले शिरीष पारिपत्यदार यांच्या कार्याची ओळख करून ते पंढरपूर येथे शाळा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बिकामिंग यु द बेस्ट
या पुस्तकाचे मुखपृष्ठ वेगळ्या कलात्मक पद्धतीने
करणाऱ्या सौ शुभांगी अनिल जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
पुस्तकाची छपाई समिहन आठवले, विनायक पतकी
यांनी केली आहे.
या कार्यक्रमास सौ मैत्रेयी केसकर तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार केसकर यांनी केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment