अर्बन बँकेचे पिग्मी एजंट अरविंद केशव उत्पात यांचे निधन.
अरविंद उत्पात यांचे अपघाती निधन.
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर अर्बन बॅंकेचे पिग्मी एजंट अरविंद केशव उत्पात (वय,७२)यांचे अपघाती निधन झाले,
तीन महिन्यापूर्वी पंढरपूर येथील भोसले चौक परिसरात दुचाकी धडकल्याने मेंदूला मार लागला होता, तेव्हापासून ते आजारी होते, सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ सचिन कासेगावकर यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते, गुरूवारी सकाळी अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अरविंद उत्पात यांचा स्वभाव मनमोकळा व आनंदी होता, गावात अनेकांशी त्यांचे उत्तम नाते होते, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे खास विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती, गावातील अनेक राजकीय घडामोडींची माहिती त्यांना होती, त्यांचे राजकीय अंदाज सहसा चुकत नसत,
४०वर्षापेक्षा जास्त वर्षे त्यांनी पंढरपूर अर्बन बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम पाहिले, पण कधीही एक रुपयांची देखील घोटाळा झाला नाही.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
आज सायंकाळी ७: ३०वा.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोफण परिवार दुःखात सहभागी आहे.

Comments
Post a Comment