पंढरीत भाजपा आणि ज्योतिर्मय योग यांच्या वतीने योगदीन उत्साहात साजरा.


 पंढरीत भाजपा आणि ज्योतिर्मय योग यांच्या वतीने  यमाई तलाव येथे योगदीन उत्साहात साजरा.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथे जागतिक योग दिना निमित्त, शनिवार दि.२१जून रोजी भारतीय जनता  पक्ष व   ज्योतिर्मय योग् व निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने 

योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर येथील यमाई तलावाच्या निसर्गरम्य हिरवाईने बहरलेल्या वातावरणात योगसाधना घेण्यात आली.

प्रमुख योगशिक्षिका ज्योती शेटे यांनी महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी अशी विविध आसने 

घेतली, आसनाचे प्रात्यक्षिक करून  याचा फायदा कसा होतो,

योगासना मुळे विविध आजार कसे टाळले जातात आणि निरोगी आयुष्य जगता येते, याची माहिती ज्योती शेटे यांनी दिली.

भाजपा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांनी 

 संपूर्ण मोलाचे सहकार्य करीत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रयत्न केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ सौ जोती शेटे

यांनी या योग दिनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन केले

या निमित्ताने अनेक योग साधिका यांनी योग व  योगाचे महत्व साांगणाऱ्या    रॅलीचे आयोजन केले

या कार्यक्रमाचा लाभ शेकडो महिलांनी घेतला.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.