जिल्हा न्यायालय येथे जागतिक योगदिन संपन्न


 *जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे जागतिक योग दिन कार्यक्रम संपन्न*


पंढरपूर-पंढरपूर तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांचे संयुक्त विद्यमानाने माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, यांचे निर्देशानुसार शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी जिल्हा न्यायालय पंढरपूर आवारामध्ये माननीय श्री एस. बी. देसाई, प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती  तथा जिल्हा न्यायाधीश  पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली व माननीय श्रीमती एस एस पाखले, दिवाणी न्यायाधीश व स्तर पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      प्रथम कार्यक्रमाची प्रास्ताविक न्यायाधीश श्रीमती एस एस पाखले  यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव अड श्री.ए. एम. देशमुख यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री समीर बिडकर सर , तसेच योग गुरु श्री राधे मंडल हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थिताना योगाचे महत्व सांगून योग प्रशिक्षण दिले. 

      कार्यक्रमाच्या शेवटी न्यायाधीश  श्रीमती के जे खोमणे, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पंढरपूर यांनी उपस्थित न्यायिक  अधिकारी , विधीज्ञ वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांना योग दिनाबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच विधी स्वयंसेवक श्री संतोष माने यांनी सर्वांचे आभार मानले.

    सदर योग दिनाच्या कार्यक्रमास न्यायिक अधिकारी न्यायालयीन कर्मचारी व वि विधज्ञ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.