श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी युवकाचे उपोषण.


 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभार  विरोधात युवकाचा उपोषणाचा इशारा,

समिती बरखास्त करण्याची मागणी.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_ शासन निर्णय तसेच मंदिर अधिनियमाचे उल्लंघन करुन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अवैध रित्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग केल्यामुळे संबधित मंदिर समिती सदस्य, सह अध्यक्ष व मंदिर कर्मचारी यांच्या वर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे तसेच मंदिरे समितीच्या कारभाराची चौकशी होऊन ती बरखास्त करण्याची मागणी पंढरपूर येथील सागर बडवे यांनी केली आहे. यासंदर्भात 

.... न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदन देऊन सांगितले आहे. पंढरपूर येथील तक्रारदार सागर बडवे यांनी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही,

दि.१४मार्च रोजी घडलेल्या गैर कारभाराची निरपेक्ष,निःपक्षपाती तपासणी होत नसल्याने सोमवार दि२३जुन रोजी बडवे हे सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

 न्याय मिळवण्यासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आमरण उपोषण करणार आहे. 

असे सांगण्यात आले आहे.

संदर्भीय अर्जानुसार तक्रार दाखल केली आहे. सदर दाखल केलेल्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही म्हणून मला नाईलाजास्तव उपोषणासारख्या मार्गाचा वापर करावा लागत आहे.

असे त्यांनी म्हटले आहे.


 १४ मार्च रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचा विरोधात गंभीर तक्रारी अर्ज त्यावर विधी व न्याय विभाग यांचे क्रमांक पीटीए १३२५/१६१/प्र.क्र.४२/कार्या- १६ दि.२५ मार्च रोजीचे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरे समिती यांना गंभीर तक्रारी बाबत मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचा बाबतचे पत्र माहिती अधिकारात प्राप्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांचे अद्याप विधी व न्याय विभाग पाठविण्यात आले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.