मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका,._डॉ सौ शेरॉन भोपटकर.तुलना करू नका
मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका. डॉ सौ शेरॉन भोपटकर. प्रतिनिधी पंढरपूर _आपला मुलगा सराईत पणें मोबाईल हाताळतो,ही गर्व करण्याची, अभिमानाची बाब नसून ती एक धोक्याची घंटा आहे, मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, किंवा तुलना करू नका असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ सौ शेरॉन तेजस भोपटकर यांनी केले. शिशु विहार व आदर्श प्राथमिक विद्यालयात माँटेसरी दीन व संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये यांचा दहावा स्मृतिदिन कऱण्यात आला.यावेळी बाल मानसशास्त्र आणि पालकांची भूमिका, या विषयावर व्याख्यान गुरुवार दिनांक २६रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ तेजस भोपटकर, ॲड ज्ञानेश आराध्ये, , सदस्या सौ रेखा उंबरकर, श्रीमती भालेराव,आदर्श प्राथमिक मुख्याधापिका सौ राजश्री घंटी, शिशु विहार मुख्याध्यापिका आदिती देशमुख,डॉ मैत्रेयी केसकर , श्री संत आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ शेरॉन तेजस भोपटकर म्हणाल्या, वाढत्या वयात मुलांचा विविध स्तरावर विकास होत असतो, बौद्धिक, शारीरिक विकास होत असताना आपण आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा विकास होत असताना विविध ...