पंढरपूर येथील तुळशी माळेचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केले कौतुक.

 

वर्धा येथे पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत भव्य मेळावा संपन्न.

पंढरपूर येथील युवकांच्या तुळशीमाळेची पाहणी करून केले कौतुक.

पंढरपूर (प्रतिनिधी)

पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत वर्धा येथे भारतातील विविध पारंपारिक कारागीर यांना चालना मिळावी  व आर्थिक उन्नती व्हावी म्हणून  भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व इतर मंत्री मंडळ उपस्थित होते. या शिबिरामध्ये पंढरपूर नगर परिषदेचे वतीने विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी केलेले स्वप्नील टमटम ,विशाल वाडेकर,नितीन पानकर ,अनिल इंदापूरकर,निरंजन पानकर  हे उपस्थित होते  देश विदेशात व संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलाच्या कृपा आशीर्वाद मिळावा या सदभावनेने अनेक भाविक भक्ती भावनेने  तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालतात त्या तुळशीच्या माळा तयार करणेचे काम पंढरपुरातील काशी कापडी समाज करतो त्यामुळे या तुळशी माळ करणारे कारागीर यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले होते व या मेळाव्यात  त्याचा स्टॉल लावण्यात आला होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या तुळशीमाळा तयार करणाऱ्या पंढरपूर मधील कारागीर यांच्या स्टॉलला आज भेट दिली या काशी कापडी समाजाच्या कारागीर यांना जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, प्रशासक सचिन इथापे,मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी अँड .सुनिल वाळूजकर, योगेश काळे, संतोष कसबे, सचिन सरवदे, अनिकेत सर्वगोड विशेष प्रयत्न करून वर्धा येथे पाठविले होते  आज जेव्हा त्यांच्या स्टॉलला पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी भेट दिली त्यावेळेस त्यांच्या आनंदाला  पारावर उरला नाही त्यांनी  जिल्हा प्रशासन व पंढरपूर नगरपालिका प्रशासन यांचे मुळे ही संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.