कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने फौजी चित्रपटाच्या प्रीमियर शो चे आयोजन, श्रीकांत बडवे यांची महत्वपूर्ण भूमिका.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने फौजी चित्रपटाचा प्रीमियर शो, पंढरीचे कलावंत श्रीकांत बडवे यांची महत्वपूर्ण भूमिका.
पंढरपूर प्रतिनिधी -कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कै. मेजर कु़णालजी गोसावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ "फौजी" या चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन!
सर्वत्र प्रसारीत होणाऱ्या जवानांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आलेल्या, फौजी या चित्रपटाच्या प्रिमियर शो चे आयोजन शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा डिव्हीपी स्क्वेअर पंढरपूर येथे शहीद मेजर कै. कुणाल गोसावी यांना आदरांजली म्हणून कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतिने, फौजी या चित्रपटाच्या प्रिमियर शोचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन युटोपियन शुगरचे चेअरमन उमेशजी परिचारक व कै. शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पिताश्री मुन्नागीर गोसावी व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच बारामती येथील निवृत्त सैनिक महेश जी पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर चित्रपट फौजी या चित्रपटाचे दिग्दर्शन घनश्याम येडे यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण केले असून, फौजी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगावर हा चित्रपट आधारीत आहे. देशाच्या संरक्षणात फौजीच्या असण्याचे किती महत्त्व असते याची सुरेख मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. या चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले, अरुण नलावडे, संजय खापरे, हंसराज जगताप,सोबत आपल्या पंढरपूर चे श्रीकांत बडवे महाजन यांची ही महत्वाची भूमिका आहे, फक्त मराठीतीलचं नाही तर हिंदीतील शहाबाज खान, टिनू वर्मा अश्या दिग्गज कलाकारांचा अभिनय आपल्याला पहाता येईल. या चित्रपटाचे लेखक, गीतकार व दिग्दर्शक घनश्याम येडे, अश्विनी कासार, यांच्या सह अनेक कलाकारांनी आपल्या भूमिका यशस्वी साकारल्या आहेत. युध्दभूमिवरचे सीन तर अत्यंत सुंदर चित्रीत करण्यात आले आहेत.
घनश्याम येडे यांनी यापूर्वी सिनेस्टार अमोल कोल्हे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या बोला अल्लख निरंजन या चित्रपटाची यशस्वी निर्मिती केली आहे.
सदरचा चित्रपट दि १३ सप्टेंबर पासून पंढरपूर येथील डिव्हीपी स्क्वेअर येथे प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध होत आहे. प्रत्येकाने आपल्या फॅमिली सोबत पहावा असा चित्रपट असून देशप्रेमा बरोबर तरुणाईच्या अनेक पैलुंचे दर्शन या चित्रपटात होत असल्याने निखळ करमणुकीतून जय जवान व जय किसान हा संदेश देत चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला कसा खिळवून ठेवतो हे चित्रपट पाहिल्यावरच समजते.
दि. १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रिमियर शोच्या नियोजनासाठी कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे सदस्य प्रा. विनायक परिचारक, ज्ञानेश्वर मोरे, अमर चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय बडवे पाटील, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, जगदीश खडके, बसवराज बिराजदार, राजकुमार आटकळे, महेश अंबिके, अनिरुद्ध बडवे पाटील,विष्णुकांत बोंबलेकर , अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे,नारायण बडवे आदी कला साधनाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment