एक हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप.


 पंढरीत 1000 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप...



पंढरपूर प्रतिनिधी


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आले. यावेळेस संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी परिचारकांनी संबोधित करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कामगारांचा घरकुल प्रश्न प्राधान्याने सोडवून, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची घरे कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. सामाजिक कार्य करताना उपेक्षित, वंचितांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळेस रवी सर्वगोड, प्रदीप परकाळे, शाहू सर्वगोड,  किशोर कदम, समाधान भोसले, सतीश सर्वगोड, सिध्दनाथ सांवत, राजेंद्र सर्वगोड, लक्ष्मण बंगाळे, तुकाराम मोळावडे, शरद सोनवणे, अमोल पाटील,गणेश सर्वगोड, स्वप्नील कांबळे, सुरज साखरे इत्यादी उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.