सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न.
सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर.
प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर शहरातील समाज सेवेसाठी तत्पर असणारे सहकार गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने रविवार दि 8सप्टेंबर रोजी प्रदक्षिणा रोड येथील राजपूत मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर उत्साहात घेण्यात आले.
यावेळी 151उत्साही युवकांनी रक्तदान केले.
यावेळी सहकार गणेशोत्सवात मंडळाचे अध्यक्ष युवराज लखेरी, उपाध्यक्ष सुयोग अंबिके, युवा नेते ओंकार जोशी, प्रथमेश सासवडे, प्रवीण मोरे, हणमंत पालकर, सोमनाथ जाधव, कौस्तुभ कुलकर्णी, शुभम ताकभाते, सागर पाठक, सुमेर काळे,, कृष्णा जव्हेरी
मंडळाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
सहकार गणेशोत्सव मंडळाने गेल्या बावीस वर्षात विविध सामाजिक उपक्रम,महाआरती , ऐतिहासीक देखावे, भव्य मिरवणूक , शिस्तबध्द ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक, सर्वांत जास्त
कार्यकर्ते असणारे मंडळ
असा लौकिक प्राप्त केला आहे.
सहकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज शुक्रवार दी 13सप्टेंबर रोजी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment