मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका._डॉ सौ शेरॉन भोपटकर.
मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, तुलना करू नका.
डॉ सौ शेरॉन भोपटकर.
प्रतिनिधी पंढरपूर _आपला मुलगा सराईत पणें मोबाईल हाताळतो,ही गर्व करण्याची, अभिमानाची बाब नसून ती एक धोक्याची घंटा आहे,
मुलांना वाढविताना कोणतेही लेबल लावू नका, किंवा तुलना करू नका असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ सौ शेरॉन तेजस भोपटकर यांनी केले.
शिशु विहार व आदर्श प्राथमिक विद्यालयात माँटेसरी दीन व संस्थापिका कै. कुसुमताई आराध्ये यांचा दहावा स्मृतिदिन कऱण्यात आला.यावेळी बाल मानसशास्त्र आणि पालकांची भूमिका, या विषयावर व्याख्यान गुरुवार दिनांक २६रोजी आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी डॉ तेजस भोपटकर, ॲड ज्ञानेश आराध्ये, ,मुख्याध्यापिका सौ रेखा उंबरकर (मंगळवेढेकर) डॉ मैत्रेयी केसकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ शेरॉन तेजस भोपटकर म्हणाल्या,
वाढत्या वयात मुलांचा विविध स्तरावर विकास होत असतो, बौद्धिक, शारीरिक विकास होत असताना आपण आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मुलांचा विकास होत असताना विविध स्पर्धा, वक्तृत्व, आदि स्पर्धात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
आजकाल ची मुले मोबाइल सोडत नाहीत, पण जर घरात सगळेच मोबाइल बघण्यात गुंग असतील तर तसेच अनुकरण करण्याचा प्रयत्न मुले करतात,
त्यांच्या जन्मापासून सेल्फी काढण्यापासुन हा प्रकार सूरू होतो. मोबाईल वरील गेम्स, व्हिडिओ मुळे मुले आळशी आणि चिडचीडी होत आहेत,
हे टाळणे पालकांच्या हातात आहे, मुलांच्या मानसिकता विकासाचा अभ्यास म्हणजेच बाल मानसशास्त्र मुलाच्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष देणे गरजेचे असते, वाढत्या वयात त्यांना चिप्स आणि कुरकुरे देण्या ऐवजी सकस आहार द्यावा, मुल मोठे होत असताना आवश्यक लसी वेळचे वेळी देणे महत्त्वाचे आहे. या काळात शारीरिक वाढ झपाट्याने होत असते, बौद्धिक, भावनिक वाढ होताना त्यांचे भावनावर नियंत्रण आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे. मुलाला घडविणे हा अनुभव आहे, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या, सामाजिक विकास ,अनुकरण, प्रतिस्पर्धी,शेअरिंग, मदत करणे, सहानुभूती ही वाढ, विकास वयाच्या आठव्या वर्षापर्यंत होत असते, असे त्यांनी सांगितले, वयाच्या विविध टप्प्यांवर होणारे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल, चांगले, वाईट परिणाम, यात पालकांची भूमिका काय असावी याविषयी साध्या, सरळ, सोप्या भाषेत अत्यंत
मौलिक मार्गदर्शन डॉ सौ शेरॉन भोपटकर केले. यावेळी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी शेकडो पालक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment