Posts

Showing posts from March, 2026

दुचाकी अपघातात तुंगत येथील शेतकऱ्याचा मृत्यू

Image
 तीन रस्ता (विसावा) येथे मोटारसायकल अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू  प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉली ची धडक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, हा अपघात सोमवार दि.२३रोजी दुपारी २वाजता घडला. तुंगत येथील धनाजी जगन्नाथ पवार, वय ४३ हे आपल्या मोटारसायकल वरून पंढरपूर कडे येत असताना तीन रस्ता, विसावा येथे असताना अचानक एका शेतातून ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा आला या ट्रॅक्टर ला जोरात धडक बसल्याने धनाजी पवार यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे पवार यांनी हेल्मेट घातले असूनही अपघात झाला, याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक भोसले अधिक तपास करत आहेत. संपादक. चैतन्य उत्पात.

भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने मोफत दिव्यांग शिबिर यशस्वी,२०४ दिव्यांग बांधवांना मिळाले हात पाय.

Image
 भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने पंढरीत मोफत दिव्यांग शिबिर यशस्वी, २०४दिव्यांग बांधवांना मिळाले हात, पाय  पंढरपूर (प्रतिनिधी) जे का रंजले , गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी साधू ओळखावा  असे संत वचन आहे या वचनाप्रमाणे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात लोकोपयोगी समाजसेवा करणाऱ्या भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने रविवार दि२२मार्च रोजी गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिव्यांग बांधवांना हात आणि पाय मोफत बसवून देण्यात आले. या मोफत दिव्यांग शिबिरात राज्यभरातून दिव्यांग बांधव सहभागी झाले होते, दिव्यांग शिबिराच्या सुरुवातीला पुणे दिव्यांग केंद्र चे विनय खटावकर यांनी मार्गदर्शन केले, नरसेवा हीच नारायण सेवा, असे ते म्हणाले, भारत विकास परिषदेचे कार्य आणि उद्दिष्ट यावर त्यांनी सांगितले. सुमारे २०४दिव्यांग व्यक्तींना मोफत हात आणि पाय बसविण्यात आले. वसमत, जालना, धुळे,जळगाव जिल्ह्यातील लोक या शिबिरात आले होते, या शिबिरात भोजनाची सोय करण्यात आली होती. याआधी दि.१४फेब्रुवारी रोजी या दिव्यांग लाभार्थी रुग्णांचे मापे घेण्यात आली होती, सुमारे ५०हजार रुपये किंमती...

अधिक देखणे तरी निरंजन पाहणे.

Image
 *अधिक देखणे तरी निरंजन पाहणे* आपण जन्माला येताना आपलं पूर्वसुकृत घेऊन येत असतो. माझ्या सुकृताचं संचित नक्कीच बरं असावं याचा प्रत्यय मला वारंवार येतो. आताच घडलेली घटना पहा ना!! मी एका पुरस्काराच्या निमित्ताने अहिल्यानगरला गेले होते. जवळच असलेल्या प्रवरा काठच्या नेवासे या शांत, निरामय स्थानाची अकल्पित भेट घडली.  इथे आहे एक अनलंकृत  तरीही विलक्षण चैतन्यदायी असा खांब!! त्याला 'पैसाचा खांब' असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या खांबाला टेकून विश्व वंदनीय ज्ञानेश्वरी, हरिपाठ,अमृतानुभव असे अजरामर साहित्य लिहिले त्या अद्भूत पैसाच्या खांबाचे दर्शन घडणे हे केवळ पूर्वसंचितच!!  त्या खांबाला स्पर्श केला आणि अक्षरशः अंगातून एक आनंद लहर सरसरली!!माऊलींना स्पर्श केल्याची अनुभूती आली! त्या स्थानापासून हलावेसे देखील वाटेना. माऊलींनी जिथे पाठ  टेकवली होती तिथे मी हळुवार असा हात फिरवला. त्या खांबाला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचा स्पर्श झाला होता!! किती जिवंत आणि साक्षात्कारी हा खांब आहे असे मनात आले. समोर श्रोतृवृंद बसला आहे. सच्चिदानंद बाबा तन्मयतेने करवीरेश्वराच्या साक्षीने माऊली...

ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने जागतिक महिला दीन उत्साहात साजरा.

Image
 ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र पंढरपूर   यांच्या वतीने जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा .  पंढरपूर(प्रतिनिधी )- पंढरपूर येथील    ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने योग भवन येथे मंगळवार दि.१०रोजी संध्याकाळी   अतिशय उत्साही वातावरणामध्ये जागतिक महिला दिन साजरा   उत्साहात करण्यात आला.  यावेळी  ज्योतिर्मय योगाच्या योगसाधिकांनी टाळ दिंडी काढून यामध्ये पांडुरंग रुक्मिणी प्रत्यक्ष उभी करून भक्तिमय वातावरण निर्माण केले भक्ती योग दाखवून दिला  त्यानंतर अनेक योगा साधिकांनी विविध गुणदर्शन करून यामध्ये देशभक्तीपर गीतांवर ती नृत्य केले त्याचबरोबर उत्तम प्रकारचं भारुड सादर केलं रोडगा वाहीन तुला या माध्यमातून संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी समाज प्रबोधन केले असं या भारुडातून सर्वांना संदेश दिला  विविध राज्यांच्या राज्यातील विविध  परंपरा  व  वेशभूषा   परिधान करून भारतातील एकात्मतेचे दर्शन या नृत्यातून  घडवून दिले तसेच योगा डान्स मराठमोळ्या लावणी सादरीकरण या निमित्ताने महिलांनी केलं लावण...

जातीभेद निर्माण करणाऱ्या किन्नर व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी जोगती संघटनेचे निवेदन.

Image
 जातीभेद निर्माण करणाऱ्या किन्नर व्यक्तीवर कारवाई करण्याची जोगती संघटनेची मागणी. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरूध्द जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पंढरपूर येथील किन्नर समाजातील मंडळींनी व जोगती संघटनेच्या वतीने उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना निवेदन देऊन जातीभेद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिपाशा उर्फ आकाश राजू मणिकम यांच्या वर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी यल्लम्मादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष परसु नाना हणमंत पवार उपस्थित होते.  पंढरपूर येथे राहणाऱ्या किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरूध्द जबरदस्तीने जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. पुणे येथील किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम (रा. धावजी पाटील निवास, गुरूनानक कॉलनी, कात्रज, पुणे) ही व्यक्ती जाणीव पुर्वक किन्नर समाजामध्ये मतभेद निर्माण करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळत आह...

स्वेरीचे राष्टीय तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन स्पर्धेत घवघवीत यश.

Image
                                                                                                                                             स्वेरीचे १२ व्या राष्ट्रीय तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा ‘सृष्टी-२०२६’ मध्ये घवघवीत यश केरळ या राज्यात फडकला स्वेरीचा झेंडा पंढरपूर(प्रतिनिधी)- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘सृष्टी-२०२६’ या तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा महोत्सवात उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर स्वेरी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. इतर राज्यात आयोजित करण्यात आलेल्या संशोधन स्पर्धात द...

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांचा तुटवडा भासणार नाही, प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम.

Image
 *जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस चा तुटवडा भासणार नाही ---- प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम*  *नागरिकांनी इंधन व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक न करण्याचे आवाहन* *नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे*  सोलापूर, दिनांक 11:- जिल्हा प्रशासनाची बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या इंधन व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा भासणार नाही. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरची अतिरिक्त साठवणूक करू नये. तसेच  कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.प्रभारी जिल्हाधिकारी श्री जंगम पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात मागणी प्रमाणे गॅसचा पुरवठा होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवू नये. गॅस पुरवठा कंपन्या व त्यांच्या एजन्सी यांच्याशी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्क...

राज्यस्तरीय डिपेक्स प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निक चे घवघवीत यश.

Image
 राज्यस्तरीय 'डिपेक्स' प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश.  तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश. पंढरपूर (प्रतिनिधी)  नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय  तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये  कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर च्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून आर एफ आयडिया आधारित पेट्रोल पंप स्वयंचलन प्रणाली या विषयावर प्रकल्प सादर केला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील कु. सारंग दिनेश शिंदे, विश्वजीत वैजनाथ मस्के, हर्षवर्धन हनुमंत शेंडगे व रोहित शंकर अवताडे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी  पुनर्वापरित प्लास्टिक, टाकाऊ वाळू आणि बारीक केलेला कचरा वापरून पर्यावरणपूरक वीट तयार करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये ओम मनोज हावळ, सुरज नाना कवडे, श्रीराज यशवंतराव राजे घाडगे, दादासाहेब जालिंदर मसवडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता तसेच इलेक...

सौ मीरा ताशी उत्पात या सिद्धहस्त लेखिका प्रवचनकार दोन पुरस्कारांनी सन्मानित.

Image
 सिद्धहस्त लेखिका प्रवचनकार सौ मीरा ताशी दोन पुरस्कारांनी सन्मानित. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सिद्धहस्त लेखिका,प्रवचनकार सौ मीरा ताशी उत्पात यांना दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मूळच्या पंढरपूर येथील माहेरवाशीण असलेल्या सौ मीरा ताशी या सध्या कोल्हापूर येथे असतात, अफाट वाचन आणि व्यासंग यांनी समृद्ध मीरा ताशी वेगवेगळ्या वृत्तपत्रात दर्जेदार लिखाण करतात, दैनिक तरुण भारत संवाद, गोफण वेब पोर्टल वर त्यांचे लेख वाचकांना खूप आवडतात, दैनिक तरुण भारत संवाद मधील आषाढी वारी विशेषांकात त्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रीय ठरली होती. अहिल्यानगर येथे ए आर न्यूज चॅनेल यांच्या वतीने काव्यलेखन आणि प्रवचन यासाठी पुरस्कार बहाल करण्यात आला तर वाई येथील विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेच्या वतीने साहित्य लेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. सौ मीरा ताशी या श्री रुक्मिणी स्वयंवर कथा तसेच श्रीमद् भागवत यावर प्रवचन, व्याख्यान देत असतात. त्यांच्या या अनमोल यशाने पंढरपूर येथील उत्पात समाज बांधवात त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. गोफण वेब पोर्टल आणि उत्पात समाजाच्या वतीने सौ मीरा ...

पंढरपूर येथे कॉरिडॉर विरोधात तहसील कचेरीवर भव्य मोर्चा.

Image
 - पंढरपूर कॉरिडॉर विरोधात उस्फुर्त बंद व प्रचंड मोर्चा........ पंढरपूर (प्रतिनिधी)  सोमवार दिनांक दोन मार्च रोजी पंढरपूर मंदिर परिसरामध्ये कॉरिडोरच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला व प्रचंड मोर्चा काढण्यात आला. महाद्वारातील नामदेव पायरी येथे संत श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे वारकरी संप्रदायातील माऊली महाराज शिरवळकर वडगावकर महाराज देहूकर महाराज आदी मान्यवरांच्या हातून पूजन करून या मोर्चाला सुरुवात झाली. आज पर्यंत बाधित भागातील नागरिकांनी कॉरिडर विरोधात अनेक चळवळी केल्या त्यामध्ये आजचा मोर्चा हा सर्वात मोठा व भूतो न भविष्यती असा प्रसंग ठरला आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला यात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकच जिद्द कॉरिडोर रद्द जुलमी कॉरिडॉर रद्द करा.अशा घोषणा दिल्या जात होत्या. बाधित भागाशिवाय अन्यही नागरिक चांगल्या संख्येने उपस्थित होते.  पंढरपुरात एकरांच्या मापात व डझनांच्या संख्येने फार मोठ्या सरकारी जागा बिगर उपयोगाच्या पडाकडून आहेत त्यावर शासनाने कॉरिडॉर सारखे प्रकल्प...

सृजनाचे रंग.

Image
 *सृजनाचे रंग*      ऋतुचक्र आता वसंताच्या उंबरठ्यावर उभे आहे. शिशिर आणि वसंताचा हा संधिकाल मनावर विलक्षण मोहिनी घालतो. नवसर्जनाचे मोहक रंग सृष्टीवर उमटतात आणि लक्षात येतं की ऋतू बदलतोय!! तनामनाला गारठवून टाकणारी थंडी संपली. परवापर्यंत एकेक पाने गाळीत खराटा झालेल्या निष्पर्ण झाडांना लालसर बाळपालवी फुटली आहे. लाल डोळ्यांचे काळे कोकिळ आम्रपालवीत, मोहरात दडून आर्त स्वरात कूजन करत आहेत. स्वर्णरंगी बहावा तटतटून फुलला आहे. इतका की झाडावर सोन्याची फुलेच फुले! एकही पान नाही!! कडुनिंबावर लाल चाॅकलेटी पानांबरोबर लोभस पांढरी फुलेही दिसू लागली आहेत. केशरी, लालभडक फुलांनी पळस पांगारे फुलले आहेत. त्यांच्या वर भुंगे, मुंग्या, पक्षी मध पिण्यासाठी गर्दी करायला लागले आहेत. मंद वासाच्या, अतिनाजूक पाकळ्यांच्या फुलांनी शिरीष फुलून आला आहे. संध्याकाळी त्याच्या खाली नाजूक फुलांचा खच पडलेला असतो. एक मंद सुवास दरवळत राहतो. कोपऱ्यात फुललेल्या मोगऱ्याच्या शुभ्र फुलांनी आणि मधुर गंधानी आठवणींची दुखरी कळ काळजात उमटवलेली असते. समोरच्या अंगणात लाल चाफा फुलांनी नुसता बहरला आहे.  एकही पान न...

किडनीवरील सर्व विकारांवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती.

Image
 किडनीवरील सर्व विकारांसाठी सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती, आता मुंबई, पुणे , हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सुप्रसिद्ध लाईफ लाईन या अत्याधुनिक सेवा सुविधा असणाऱ्या हॉस्पीटल मध्ये किडनीच्या सर्व विकारांवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी कन्सल्टंट नेप्रोलॉजिस्ट म्हणुन डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती दी.१मार्च पासून करण्यात आली आहे.करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये २४तास ते उपलब्ध असणार आहेत. डॉ अविनाश पवार यांनी मुंबई येथील के इ एम हॉस्पिटल मधून नेप्रोलॉजी मध्ये एमबीबीएस केले आहे. एम डी मेडिसिन ही डिग्री शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन प्राप्त केली आहे तर डी एन नी नेप्रोलॉजी अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे पूर्ण केले आहे. किडनीचे आजारावरचे ४वर्षांचे प्रशिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथील डॉ संजय देशमुख आणि डॉ मंजुषा देशमुख यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मध्ये मेट्रोसिटी लेव्हल वरच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बीपी मुळे डायबिटीस मुळे होणारे किडनीचे विकार, सर्पदंश,मधुमेह यामुळे होणारे किडनीचे विकार, कि...