किडनीवरील सर्व विकारांवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती.


 किडनीवरील सर्व विकारांसाठी सुप्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती,

आता मुंबई, पुणे , हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सुप्रसिद्ध लाईफ लाईन या अत्याधुनिक सेवा सुविधा असणाऱ्या हॉस्पीटल मध्ये किडनीच्या सर्व विकारांवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी कन्सल्टंट नेप्रोलॉजिस्ट म्हणुन डॉ अविनाश पवार यांची नियुक्ती दी.१मार्च पासून करण्यात आली आहे.करण्यात आली आहे.

या हॉस्पिटलमध्ये २४तास ते उपलब्ध असणार आहेत.

डॉ अविनाश पवार यांनी मुंबई येथील के इ एम हॉस्पिटल मधून नेप्रोलॉजी मध्ये एमबीबीएस केले आहे. एम डी मेडिसिन ही डिग्री शासकीय रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन प्राप्त केली आहे तर डी एन नी नेप्रोलॉजी अपोलो हॉस्पिटल हैदराबाद येथे पूर्ण केले आहे.

किडनीचे आजारावरचे ४वर्षांचे प्रशिक्षण हैदराबाद येथे पूर्ण केले आहे.

त्यामुळे आता पंढरपूर येथील डॉ संजय देशमुख आणि डॉ मंजुषा देशमुख यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मध्ये मेट्रोसिटी लेव्हल वरच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बीपी मुळे डायबिटीस मुळे होणारे किडनीचे विकार, सर्पदंश,मधुमेह यामुळे होणारे किडनीचे विकार, किडनी ट्रान्सप्लांट करताना करण्यात येणारे डायलिसिस रक्तगट वेगळा असला तरीही रक्त बदलण्याची रीत, किडनीवरील सूज,मूतखडा,

आनुवंशिक किडनीचे विकार,इन्फेक्शन, क्रिएटी निन, चे प्रॉब्लेम , सोडियम, पोटॅशियम, युरिनचे प्रोटीन, इलेक्ट्रिलॉईड प्रॉब्लेम अशा सर्व विकारांवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी सुसज्ज अशा लाइफलाईन हॉस्पिटल तयार आहे,

अशा उपचारासाठी आता मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही, किडनी विकारावरील डायग्नॉस  आणि उपचार हे डॉ संजय देशमुख आणि डॉ मंजुषा देशमुख यांच्या सुप्रसिद्ध लाइफलाईन हॉस्पिटल मध्ये होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजना याद्वारे गरीब तसेच आर्थिक परिस्थिती सामान्य असलेल्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येणार आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.