दुचाकी अपघातात तुंगत येथील शेतकऱ्याचा मृत्यू


 तीन रस्ता (विसावा) येथे मोटारसायकल अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू 

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉली ची धडक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला, हा अपघात सोमवार दि.२३रोजी दुपारी २वाजता घडला.

तुंगत येथील धनाजी जगन्नाथ पवार, वय ४३ हे आपल्या मोटारसायकल वरून पंढरपूर कडे येत असताना तीन रस्ता, विसावा येथे असताना अचानक एका शेतातून ट्रॅक्टर रस्त्यावर आडवा आला या ट्रॅक्टर ला जोरात धडक बसल्याने धनाजी पवार यांचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

विशेष म्हणजे पवार यांनी हेल्मेट घातले असूनही अपघात झाला,

याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक भोसले अधिक तपास करत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.