ज्योतिर्मय योग आणि निसर्गोपचार केंद्र यांच्या वतीने जागतिक महिला दीन उत्साहात साजरा.


 ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र पंढरपूर   यांच्या वतीने जागतिक महिला दिन अतिशय उत्साहात साजरा .

 पंढरपूर(प्रतिनिधी )-

पंढरपूर येथील 

  ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या वतीने योग भवन येथे मंगळवार दि.१०रोजी संध्याकाळी   अतिशय उत्साही वातावरणामध्ये जागतिक महिला दिन साजरा   उत्साहात करण्यात आला.

 यावेळी 

ज्योतिर्मय योगाच्या योगसाधिकांनी टाळ दिंडी काढून यामध्ये पांडुरंग रुक्मिणी प्रत्यक्ष उभी करून भक्तिमय वातावरण निर्माण केले भक्ती योग दाखवून दिला 

त्यानंतर अनेक योगा साधिकांनी विविध गुणदर्शन करून यामध्ये देशभक्तीपर गीतांवर ती नृत्य केले त्याचबरोबर उत्तम प्रकारचं भारुड सादर केलं रोडगा वाहीन तुला या माध्यमातून संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी समाज प्रबोधन केले असं या भारुडातून सर्वांना संदेश दिला 

विविध राज्यांच्या राज्यातील विविध  परंपरा  व  वेशभूषा   परिधान करून भारतातील एकात्मतेचे दर्शन या नृत्यातून  घडवून दिले तसेच योगा डान्स मराठमोळ्या लावणी सादरीकरण या निमित्ताने महिलांनी केलं

लावणी सम्राट श्री हरी बारंगुळे उर्फ हर्षदा पाटील यांनी लावणी सादर करून महिलांना देखील नाचण्यास भाग पाडले आणि प्रचंड उत्साह आणि आनंदी वातावरण आपल्या नृत्य आणि  अदाकारीने सर्व महिलांना भुरळ घातली .

 या लावणी नृत्यांगणे सोबत महिलांनी देखील अदाकारी केली आणि त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता प्रचंड गर्दी या कार्यक्रमासाठी होती 

सर्व महिलांना एक उत्तम प्रकारचे व्यासपीठ या निमित्ताने मिळालेलं होतं.

या कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्र अध्यक्षा सौ ज्योती शेटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.