पंढरपूर येथे कॉरिडॉर विरोधात तहसील कचेरीवर भव्य मोर्चा.


 - पंढरपूर कॉरिडॉर विरोधात उस्फुर्त बंद व प्रचंड मोर्चा........

पंढरपूर (प्रतिनिधी)

 सोमवार दिनांक दोन मार्च रोजी पंढरपूर मंदिर परिसरामध्ये कॉरिडोरच्या विरोधात पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कडकडीत उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला व प्रचंड मोर्चा काढण्यात आला. महाद्वारातील नामदेव पायरी येथे संत श्री नामदेव महाराजांच्या पायरीचे वारकरी संप्रदायातील माऊली महाराज शिरवळकर वडगावकर महाराज देहूकर महाराज आदी मान्यवरांच्या हातून पूजन करून या मोर्चाला सुरुवात झाली. आज पर्यंत बाधित भागातील नागरिकांनी कॉरिडर विरोधात अनेक चळवळी केल्या त्यामध्ये आजचा मोर्चा हा सर्वात मोठा व भूतो न भविष्यती असा प्रसंग ठरला आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला यात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकच जिद्द कॉरिडोर रद्द जुलमी कॉरिडॉर रद्द करा.अशा घोषणा दिल्या जात होत्या. बाधित भागाशिवाय अन्यही नागरिक चांगल्या संख्येने उपस्थित होते.

 पंढरपुरात एकरांच्या मापात व डझनांच्या संख्येने फार मोठ्या सरकारी जागा बिगर उपयोगाच्या पडाकडून आहेत त्यावर शासनाने कॉरिडॉर सारखे प्रकल्प उभे करावे बाधितांच्या ज्या घरांमध्ये वारकरी बांधवांच्या सगळ्या सोयी होतात ती घरे अजिबात पडू नयेत. कॉरिडॉर सरकारी जागांवर करावा अशा पद्धतीच्या मुख्य मागण्या होत्या. मोर्चा तहसील कचेरी कडे जाताना चौका चौकात भाषणे झाली संत प्रल्हाद महाराज बडवे गोपाळकृष्ण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,वीर माता जिजामाता पुतळा, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा,घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या या ठिकाणी माल्यार्पण करण्यात आले. चांगल्या उत्साहात व शिस्तबद्ध रित्या हा मोर्चा तहसीलदार कचेरी येथे आला त्या ठिकाणी बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील,, नगरसेवक शिंदे नाईक किरण घाडगे, वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज इत्यादींची भाषणे झाली. या ठिकाणी माढ्याचे आमदार श्री अभिजीत आबा पाटील हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी आपले विचार मांडले त्यांनी पाडापाडी न करता इतर मोकळ्या जागांवर कॉरिडोर राबवावा.असे आवाहन केले.  तहसीलदार लंगोटे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यांनी ते राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.

 मोर्चामध्ये ठिकठिकाणी सौ सुलभा वट्टमवार ताई, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉक्टर प्राजक्ता बेणारे, सौ बिडकर आदी महिला मंडळींचे भाषणे झाली.

 कॉरिडॉर विरोधात पहिल्यांदाच एवढा मोठा बंद व महामोर्चा काढण्यात आला व बाधित भागातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून  गावातूनही इतर भागातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.

 राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कॉरिडर साठी तरतूद होणार अशी चर्चा असताना कॉरिडोरला पंढरपुरातून हा फार मोठा विरोध दिसून येत आहे. निश्चितच शासनाला या उत्स्फूर्त बंदची व महामोर्चाची दखल घ्यावी लागणार आहे. या मोर्चात नगरशेठ नानासाहेब कवठेकर नगरसेवक ओंकार जोशी सह अनेक नगरसेवक श्री रा. पां. कटेकर, उद्योजक


संजय जव्हेरी, विवेक जव्हेरी,विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते

 मोर्चासाठी चांगला पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी श्री. गणेश लंके, वैभव बडवे, अनिल गवळी, प्रशांत खंडागळे, यशवंत बेणारे,उंडाळे वकील, आदी पदाधिकारींनी परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.