भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने मोफत दिव्यांग शिबिर यशस्वी,२०४ दिव्यांग बांधवांना मिळाले हात पाय.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने पंढरीत मोफत दिव्यांग शिबिर यशस्वी,
२०४दिव्यांग बांधवांना मिळाले हात, पाय
पंढरपूर (प्रतिनिधी) जे का रंजले , गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यासी साधू ओळखावा
असे संत वचन आहे या वचनाप्रमाणे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात लोकोपयोगी समाजसेवा करणाऱ्या भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने रविवार दि२२मार्च रोजी गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दिव्यांग बांधवांना हात आणि पाय मोफत बसवून देण्यात आले.
या मोफत दिव्यांग शिबिरात राज्यभरातून दिव्यांग बांधव सहभागी झाले होते,
दिव्यांग शिबिराच्या सुरुवातीला पुणे दिव्यांग केंद्र चे विनय खटावकर यांनी मार्गदर्शन केले,
नरसेवा हीच नारायण सेवा, असे ते म्हणाले,
भारत विकास परिषदेचे कार्य आणि उद्दिष्ट यावर त्यांनी सांगितले.
सुमारे २०४दिव्यांग व्यक्तींना मोफत हात आणि पाय बसविण्यात आले. वसमत, जालना, धुळे,जळगाव जिल्ह्यातील लोक या शिबिरात आले होते,
या शिबिरात भोजनाची सोय करण्यात आली होती.
याआधी दि.१४फेब्रुवारी रोजी या दिव्यांग लाभार्थी रुग्णांचे मापे घेण्यात आली होती,
सुमारे ५०हजार रुपये किंमतीचे हात पाय असून आधुनिक पद्धतीने बनविण्यात येतात आता या लोकांना ईतर सर्वसामान्य लोकांप्रमाणे हात, पाय वाकविता येतील.
या दिव्यांग शिबिराचे आयोजन पुणे येथील गेल महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सी, पुणे दिव्यांग केंद्र, भारत विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्षा सौ स्मिता कोर्टीकर, पंढरपूर, सचिव मंदार केसकर, कोषाध्यक्ष सुनील परळीकर, दिव्यांग केंद्र पुणे चे विनय खटावकर, डॉ वर्षा काणे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री विनयची खटावकर यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कर्मयोगी नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व पुणे येथील स्वयंसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेन्द्र काणे, अध्यक्ष सौ स्मिता कोर्टीकर, डॉ वर्षा काणे, सचिव मंदार केसकर, सौ मैत्रेयी केसकर,कोषाध्यक्ष सुनील परळीकर, मिलिंद वाघ ,, सतीश कोर्टीकर,राजेंद्र केसकर, डॉ अनिल पवार, अजित कुलकर्णी, आर डी देशपांडे, आयाचित, राजेंद्र केसकर,अमित शिरगावकर सौ श्रेया शिरगावकर, सौ भाग्यश्री लिहिणे, डॉ मृणाल गांधी,
सौ अनुराधा हरिदास, प्रीती वाघ, शमिका केसकर, मंजुषा वाघ सौ रेखाकिशोरी टाक, माधुरी पवार, प्रणिता देशपांडे, विवेक परदेशी, सचिन पंढरपूरकर,भारत गदगे , सौ मंजुषा गदगे ,दत्तात्रय तरळगट्टी, विश्वास पाटील, चैतन्य उत्पात, मनोज कुलकर्णी, सचिन बेणारे, पंढरपूरकर , पुण्याहून आलेले श्री व सौ अभ्यंकर, कुलकर्णी व काणे हॉस्पिटल स्टाफ, सर्व सदस्यांनी
शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
चौकट.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील केवळ दहा वर्षांची शेतकरी कुटुंबातील चिमुरडी जान्हवी रघुनाथ येळे या मुलीचा हात ती केवळ तीन वर्षांची असताना तिचा हात कडबा कुट्टी मशीन मध्ये गेला आणि तिने हाताचा पंजा गमावला, वाखरी येथील प्राथमिक, भारत विकास परिषद सदस्य शिक्षक मनोज कुलकर्णी यांनी या मुलीच्या पालकांना या दिव्यांग शिबिराची माहिती दिली होती,
आज या मुलीला तिचा हात परत मिळाला,
जान्हवी हिने डोळ्यात आनंदाश्रु आणून भारत विकास परिषद शाखा पंढरपूर चे आभार मानले.
चौकट २
भारत विकास परिषद शाखा पंढरपूर यांच्या वतीने आयोजित मोफत दिव्यांग शिबिरासाठी वसमत येथील एक दिव्यांग व्यक्ती पहाटे तीन वाजता आले होते,
याच दिव्यांग बांधवांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर पाहण्यासाठी जळगावहून भारत विकास परिषदेचे अध्यक्ष चोरडिया व त्यांचे सहकारी आले होते.


Comments
Post a Comment