Posts

Showing posts from December, 2023

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेतले.

Image
 पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन             प्रतिनिधी पंढरपूर, -  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.     याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रणव परिचारक, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच मोहन डोंगरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.       यावेळी मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ७३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला अ...

अभूतपूर्व गर्दी, शिवपुराण कथेने आषाढी वारी ची आठवण.

Image
 *अभूतपूर्व गर्दी, शिव महापुराण कथा सोहळ्याने आषाढीची आठवण* *शिव महापुराण कथा सोहळ्यात केल्या पोळ्या,खरकटे काढले..भाविकांच्या सेवेत अभिजीत पाटील तल्लीन झाले!* पंढरपूर प्रतिनिधी :  चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा चौथा दिवस अलोट गर्दी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला.. सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराणाच्या माध्यमातून असंख्य भाविकांना जगण्याचे ज्ञान आणि भक्तीचा भाव मिळत आहे.. कथेची लोकप्रियता दिवसागणिक वाढती असून भाविकांची संख्या आजही वाढती राहिली.. यजमान श्री.अभिजीत पाटील यांनी केलेली भाविकांची सेवा, व्यवस्थापन आणि चोख आयोजनामुळे एवढी संख्या असूनही भाविकांना कथेचा आनंद घेता येतो आहे..  परंपरेप्रमाणे सकाळी आरती व पूजनाने कथेची सुरुवात करण्यात आली. पंढरपूर येथील माजी व आजी नगरसेवकांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी शिवसेवा आणि जनसेवेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.. भाविकांची सेवा करताना महाप्रसादाच्या स्वयंपाकापासून, वाढप व्यवस्था, मैदानाची सफाई, शिव स्वरूप धारण करण्याच...

प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन बैठकीत आ. आवताडे आक्रमक.

Image
 मतदारसंघातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी आ आवताडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत आक्रमक पालकमंत्र्यांकडून कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना मंगळवेढा/प्रतिनिधी  नैसर्गिक दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस, विविध रोगांचा व कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतकरी  पीकविमा व शासकीय मदतीपासून वंचित आहेत,अथक प्रयत्नांतून सुरु केलेली मंगळवेढा तालुक्यातील ४० गावची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतर गावांना पिण्याचे पाणी मिळत आहे, परंतु या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या विजेचे एक ते सव्वा कोटी रुपये वीज बिल प्रलंबित होते त्यापैकी १० ते १५ लाख रुपये बिलाची रक्कम भरण्यात आलेली आहे. उरलेली बिल टंचाई मधून भरून ही योजना अखंडपणे सुरू ठेवा जर ही योजना विज बिलाअभावी बंद पडली तर तालुक्याच्या दक्षिण भागातील ४० ते ५० गावांमध्ये टँकर सुरू करावे लागणार आहेत आणि हा खर्च पुन्हा प्रशासनाला परवडणारा नसून मुबलक पाणीही मिळणार नाही त्यामुळे जिल्हा परिषद टंचाई अंतर्गत आवश्यक निधीची तरतूद करून वीज बिलाचा प्रश्न मार्गी...

आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते पहिल्या मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वाटप.

Image
 मंगळवेढा येथील पहिल्या मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे आमदार आवताडे यांच्या हस्ते वितरण  मंगळवेढा (प्रतिनिधी):  मराठा आरक्षण अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे वितरण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी बी.आर.माळी व तहसीलदार मदन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे घुले परिवाराकडे करण्यात आले. सदर प्रसंगी घुले परिवारातील आस्था मनोहर घुले, जयदेव मनोहर घुले व ओमराजे मनोहर घुले यांना या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिक्षण आणि नोकरी या क्षेत्रामध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी गल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे लढा सुरू आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार महोदय यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती. पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा मराठा समाजाची आरक्षण दाहकता माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे समाजाच्या या लढाईमध्ये मी नेहमीच समाज बांधवांच्या बरोबरीने असेन असा शब्द आमदार आ...

एकदा तरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहिजे.- पंडित प्रदीप मिश्रा.

Image
 *एकदा तरी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहिजे* - पंडित प्रदीप मिश्रा *आजी माजी सैनिकांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली* *॰अभिजीत पाटील शिव स्वरूपात॰समर्पित भावनेने प्रत्येक कार्यातील पुढाकाराची सर्वत्र चर्चा॰* प्रतिनिधी :  पंढरपूर नगरीत श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सिंहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही विशेष ठरत आहे तो यजमान अभिजीत पाटील यांचा उस्फुर्त सहभाग.... जेवण बनविण्यापासून ते स्वच्छता कार्यापर्यंत सर्व बाबतीत त्यांचा पुढाकार दिसून येत आहे. भव्य मंडपामध्ये प्रत्येकाच्या भोजनाची आस्थेवाईक चौकशी करण्यापासून ते शेवटचा माणूस झोपेपर्यंत  अभिजीत पाटील एका आदर्श यजमानाच्या भूमिकेत अत्यंत समर्पित भावनेने काम करताना दिसत आहेत. आज दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर भगवान महादेवाचा वेश धारण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पार पडली त्यांच्या महादेव रुपाची सर्वत्र चर्चा रंगली आह...

अभिजीत पाटील ब्रम्हा, विष्णू,महेश वेशभूषेत अवतरले.

Image
 *अभिजीत पाटील ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या वेशभूष करत कथेच्या दुसऱ्या दिवशी अवतरले* प्रतिनिधी पंढरपूर/-  सुप्रसिद्ध शिवपुराण कथा सांगणारे सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून होत असलेल्या श्री हरिहर शिव महापुराण आज दुसरा दिवस पार पडला यामध्ये पंढरपूरकरांसह लाखो भाविकांनी गर्दी केली होती.. यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्या वेशभूषा मध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी शंकराची वेशभूषा करून हजारोची मने जिंकली.. दि.२५ते ३१ डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी १ वाजता होणार असून यजमान श्री.अभिजीत धनंजय पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. संपादक. चैतन्य उत्पात.

पत्रकार सुरक्षा समिती चे नूतन प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांचा सत्कार.

Image
 काणे ज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने नूतन प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे यांचा सत्कार. पंढरपूर (प्रतिनिधी)पत्रकार सुरक्षा समिती चे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने पंढरपूर येथील ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांचा काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे संचालक   डॉ सुरेंद्र काणे आणि डॉ वर्षा काणे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील,चैतन्य उत्पात, विश्वास पाटील, अमर कांबळे, रवी शेवडे, कबीर देवकुळे आदी पत्रकार उपस्थित होते.  यावेळी मनोगत व्यक्त करताना नूतन प्रदेशाध्यक्ष रामभाऊ सरवदे म्हणाले, आता मोठी जबाबदारी आली असून संपूर्ण राज्यातील पत्रकारांचे प्रश्न, अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून पंढरपूर पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने शहरात समाजोपयोगी उपक्रम सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात येतील.  संस्थापक यशवंत पवार यांनी जो विश्वास ठे...

स्वेरीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न.

Image
 स्वेरीत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’संपन्न ‘अॅडव्हान्स एनर्जी स्टोरेज: टेक्नॉलॉजी, इंटिग्रेशन अँड इम्प्लीमेंटेशन’ या विषयावर मिळाले तज्ञांचे मार्गदर्शन पंढरपूर-(प्रतिनिधी )अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) इंडिया यांच्यावतीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अॅडव्हान्स एनर्जी स्टोरेज: टेक्नॉलॉजी, इंटिग्रेशन अँड इम्प्लीमेंटेशन’ या विषयावर आयोजित केलेला एफडीपी तथा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ नुकताच संपन्न झाला. या उपक्रमाच्या निमित्ताने सर्व सहभागी प्राध्यापकांना विविध तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले.             स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि.१० डिसेंबर ते दि.१५ डिसेंबर २०२३ दरम्यान या ‘एफडीपी’चे ...

अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पंढरीत प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण.

Image
 *अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पंढरी नगरीत पंडित श्री.प्रदीप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन..* प्रतिनिधी :  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असताना आपल्याला दिसून येते. कधी छत्रपती संभाजी महाराज यांचे महानाट्य तर कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिंदेशाही यांचा आदर्श शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम तर कधी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंढरपूर मंगळवेढा येथे शिव व्याख्यानाचे आयोजन तर कधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केलेले आपण सर्वांनी बघितले आहे परंतु प्रथमच अभिजीत पाटील यांनी सांप्रदायिक पंढरीत शिवमहापुराण कथेचे अयोजन चंद्रभागा मैदान डीव्हीपी स्क्वेअर समोर २५डिसेंबर ते ३१डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेचे आयोजन केले आले आहे. पंढरपूर नगरीमध्ये आषाढी,कार्तिकी, माघी, चैत्री वारी सारखीच बरोबरच या कथेमुळे पंढरपूरमध्ये वारीचे स्वरूप निर्माण झालेले दिसून आलेले आहे. व्यापारी वर्ग, रिक्षावाले, हाॅटेल, महाप्रसाद दुकानदारांना यातुन चांगल...

ाध्यमतून भक्तिमय मेजवानी, प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण.

Image
 *अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून पंढरी नगरीत पंडित श्री.प्रदीप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथेचे आयोजन..* प्रतिनिधी :  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून कायमच नवनवीन उपक्रम राबवत असताना आपल्याला दिसून येते. कधी छत्रपती संभाजी महाराज यांचे महानाट्य तर कधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिंदेशाही यांचा आदर्श शिंदे यांचा लोकगीतांचा कार्यक्रम तर कधी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंढरपूर मंगळवेढा येथे शिव व्याख्यानाचे आयोजन तर कधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केलेले आपण सर्वांनी बघितले आहे परंतु प्रथमच अभिजीत पाटील यांनी सांप्रदायिक पंढरीत शिवमहापुराण कथेचे अयोजन चंद्रभागा मैदान डीव्हीपी स्क्वेअर समोर २५डिसेंबर ते ३१डिसेंबर पर्यंत सिहोरचे पंडित प्रदीप मिश्रा यांचे कथेचे आयोजन केले आले आहे. पंढरपूर नगरीमध्ये आषाढी,कार्तिकी, माघी, चैत्री वारी सारखीच बरोबरच या कथेमुळे पंढरपूरमध्ये वारीचे स्वरूप निर्माण झालेले दिसून आलेले आहे. व्यापारी वर्ग, रिक्षावाले, हाॅटेल, महाप्रसाद दुकानदारांना यातुन चांगल...

पंडित प्रदीप मिश्रा यांना शिव महापुराण कथेचे दिले आमंत्रण.

Image
 *पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांना दिले पाटील यांनी आमंत्रण* खुप दिवसांचे स्वप्न पुर्णु होणार:- पंडीत प्रदीप मिश्रा अमरावती येथे श्री.अभिजीत पाटील यांनी पंडीत मिश्रा यांची भेट घेऊन दिले आमंत्रण प्रतिनिधी/-  श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दि.२५ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन अभिजीत पाटील थेट अमरावतीत पोचले. अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री वारी भरत असून पंढरपूरची आर्थिक उलाढाल यावर बरेच अवलंबून असायचे परंतु श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पुजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असुन सदरचा कथा सोहळा दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये होणार आहे. सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक मंडळीनी सहभागी होण्याचे आ...

श्री माताजी निर्मलादेवी प्रशालेत बालसभा संपन्न.

Image
 श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक प्रशालेत चौथी वर्गाची 'बालसभा ' पंढरपूर (प्रतिनिधी)- श्री  माताजी निर्मलादेवी प्राथमिक प्रशालेत संस्थेच्या सचिवा . सौ सुनेत्रा पवार  यांच्या संकल्पनेतून  प्रशालेत इयत्ता चौथीच्या वर्गाची 'बालसभा'झाली. बाल सभा म्हणजे बालकांचा अधिराज्य असणे.या सभेचा चिमुकला अध्यक्ष चि. आयान मुलाणी हा होता. या बाल सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विनय उपाध्ये व प्रशालाचे मुख्याध्यापक श्री संतोष कवडे सर, सर्व शिक्षक, पालक वर्ग  उपस्थित होते.           प्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. चि.श्लोक पतंगे यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा जोश पूर्ण वातावरणात सादर केला. या पोवाड्यावर मुलांनी नाट्यकरण सादर केले. चि. श्लोक व अर्णव यांनी विनोदी बातम्या विनोदी प्रसंग सादर केले. पर्यावरण पूरक शपथ कु.रिया ओव्हाळ हिने सर्वांना दिली. इंग्रजी, मराठी कविता  हावभाव युक्त गाण्याच्या तालावर सादर करण्यात आल्या. मातीचे महत्त्व सांगणारी एकांकिका कु. रिया, सई,जीत व विराज यांनी सादर केली.             ...

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विकासात्मक निधी आणणाऱ्या आ. आवताडे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार.

Image
 पंढरपूर शहरातील नूतन प्रशासकीय इमारत बांधकाम, रस्ते विकास प्रकल्प, पाणी पुरवठा योजना व इतर विकासात्मक बाबींसाठी भरघोस निधी आणणाऱ्या आ आवताडेंचा प्रशासनाच्या वतीने झाला अभिनंदनपर सत्कार   पंढरपूर (प्रतिनिधी-) भारताची दक्षिण कशी असा अध्यात्मिक आणि सांप्रदायिक वसा आणि वारसा लाभलेल्या पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांची सर्व शासकीय व प्रशासकीय कामे एकाच छताखाली होण्यासाठी गेली अनेक वर्षे निधी मंजूरीच्या प्रतीक्षेत असलेल्या व पंढरपूर शहरांमध्ये साकार होणाऱ्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३२ कोटी, शहरातील विविध रस्ते विकास प्रकल्पसाठी १०४ कोटी त्याचबरोबर पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १०८कोटी व श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विकास आराखड्यासाठी १५० कोटी असा एकूण ३९५ कोटींचा ऐतिहासिक निधी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व नगरपरिषद मुख्याधिकारी जाधव यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांचा अभिनंदनपर करण्यात आला आहे. येथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व इत...

स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांना यू जी सी कडून स्वायतत्ता दर्जा.

Image
                       स्वेरीच्या शिरपेचात  मानाचा तुरा!* *स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसी कडून स्वायत्तता (ऑटोनॉमस) दर्जा प्रदान!* पंढरपूर-(प्रतिनिधी )‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट तथा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त' दर्जा अर्थात  'ऑटोनॉमस दर्जा' प्राप्त झाला आहे. हा दर्जा शै. वर्ष २०२४-२०२५ पासून शै. वर्ष २०३३-२०३४ अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे. युजीसी  (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे.'अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य  डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.            अलीकडेच ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह 'ए प्लस' ही ग्रेड दिलेली...

ायतत्ता (ऑटोनोमस) दर्जा.

Image
                       स्वेरीच्या शिरपेचात  मानाचा तुरा!* *स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसी कडून स्वायत्तता (ऑटोनॉमस) दर्जा प्रदान!* पंढरपूर-(प्रतिनिधी )‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट तथा स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त' दर्जा अर्थात  'ऑटोनॉमस दर्जा' प्राप्त झाला आहे. हा दर्जा शै. वर्ष २०२४-२०२५ पासून शै. वर्ष २०३३-२०३४ अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे. युजीसी  (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे.'अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य  डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.            अलीकडेच ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह 'ए प्लस' ही ग्रेड दिलेली...

बहार, स्वरसाधनेच्या मैफिलीचा.

Image
 बहार स्वरसाधनेच्या मैफिलींचा.. साधारणपणे कार्तिक वारी झाली की  स्वर साधना मंडळाच्या शास्त्रीय गायन,वादन,कथ्थक नृत्य या मैफिलींचे वेध लागत असत. अतिशय उच्च कोटीच्या विद्वान कलाकारांच्या गायनाच्या त्याच बरोबर वाद्य वादनाच्या आणि कथ्थक अथवा भरतनाट्यमच्या मैफिलीची सुरस मेजवानी पंढरपूरच्या रसिक गुणीजनांना मिळत असे. पंढरपूर हे आध्यात्मिक क्षेत्रासोबत अनेक चांगल्या कलांचे माहेरघर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जगन्नाथ बुवा पंढरपूरकर हे ज्येष्ठ शास्त्रीय गायक होते त्याचबरोबर  श्री.शंकरअप्पा  मंगळवेढेकर हे मृदुंग वादक होते. श्री.तात्या मंगळवेढेकर हे उत्तम शास्त्रीय गायक होते, त्याचबरोबर माऊली उत्पात हे लावणी सम्राट होते. शोभना उत्पात ह्या शास्त्रीय संगीताचे धडे देत असत. अशा पंढरपूरच्या सांगीतिक व आध्यात्मिक वातावरणात स्वर साधनेचा पाया रचला गेला. स्वर साधनेची उभारणी करताना पंढरपुरातील अनेक प्रतिष्ठित प्रतीतयश डॉक्टर,कलाकार,व्यापारी,गायनाची आवड असलेले राजकारणी यांचा सिंहाचा वाटा होता. यामध्ये मूळ पाया रचणारे श्री.दादा खडके तसेच श्री.काका खडके यांचं मोलाचं योगदान होतं. याच ...

म्हैसाळ योजनेचे पाणी टेल टू हेड मिळण्यासाठी आ. आवताडे यांची मागणी.

Image
 मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी "टेल टू हेड" मिळणेसाठी आ आवताडे यांची विधानसभेत मागणी  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर  पंढरपूर (प्रतिनिधी ) कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, शिरनांदगी, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, सलगर बु, सलगर खु, बावची, पौट, आसबेवाडी, लवंगी, शिवणगी, येळगी, सोड्डी, या १८ गावांना टेल टू हेड प्रमाणे पाणी मिळण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आपली मागणी लावून धरली होती. आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीवर सकारात्मकता दर्शवून हे पाणी संबंधित मंगळवेढा तालुक्यातील गावांना देण्यासंदर्भात आश्वासन दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीची बैठक सांगली येथे पार पडली होती. सदर बैठकीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...

पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची निवड.

Image
 *पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची निवड* पंढरपूर ( प्रतिनिधी )पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील होते या बैठकीत  राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली  *जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना* *राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी* *यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती* *राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता* *प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा* *पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना* *अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे* *पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे* *पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे* *खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी* *पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण* या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या सूचनेनुसार पत्रकार सुरक्षा समितीच...

पंढरीच्या डॉक्टरांचा विदेशात डंका.

Image
 *पंढरीच्या डॉक्टरांचा विदेशात डंका!*  प्रतिनिधी. पंढरपूर - ग्लोबल रिसर्च फोरम व आय. डी. एम. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी शारजाह यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत बिझनेस ग्रोथ चॅलेंजेस मेजर्स सोल्युशन्स इन ग्लोबल  परिदृष्य या विषयावर दुबई येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.       या परिषदेत पंढरीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व एस के एन इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य  डॉ. कैलासजी करांडे यांनी  त्या अंतरराष्ट्रीय परिषदेच्या सत्राचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते म्हणून परिषद गाजवली.  पंढरीच्या डॉक्टर करांडे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंढरीचा डंका वाजवला म्हणून येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता.            त्याबद्दल डॉ. कैलाशजी करांडे यांनी सांगितले की, सिंहगड इंजि. कॉलेजला पहिल्यांदा जेव्हा नॅक कमिटीने ए प्लस श्रेणी दिली होती तेव्हा पहिल्यांदा कलासाधना सांस्कृतिक मंडळाने मला विशेष गुणवत्ता पुरस्काराने गौरविले होते, तेव्हा पासून अनेक पुरस्काराची शृंखला सतत सुरु असून दे...

मनसे च्या मोर्चाची मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली दखल. करवाढ रद्द करण्याचे आदेश.

Image
 मनसेच्या मोर्चाची थेट मुख्यमंत्री यांनी घेतली दखल. करवाढ रद्द करण्याचे संबंधित विभागाला आदेश : दिलीप धोत्रे  पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर नगर परिषदेने मालमत्ता करात मोठी वाढ केल्याने सोमवारी मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेवर मोर्चा  काढण्यात आला होता. यानंतर सोमवारी रातोरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नागपूर येथे जाऊन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन करवाढीच्या माध्यमातून पंढरपुरातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली.  यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला करवाढ तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली. पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर मोठी वाढ केल्याने पंढरपुरातील नागरिकांनी पालिकेला लेखी तक्रारी दिल्या आहेत. तर विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन  विरोध केला आहे.  सदर करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मनसे व विठ्ठल परिवार यांच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पंढरपूर शहरातील नागरिक याचबरोब...

पंढरपूरचा आवाज थेट पोहचविला मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत.

Image
*पंढरपूरचा आवाज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला* अभिजीत पाटील. *पंढरपूर नगरपालिकेने जुलमी करवाढीच्या विरोधाचा अभिजीत पाटील आवाज उठवत पोचले थेट मुख्यमंत्रीपर्यंत* *करवाढीस स्थगितीस मिळावी अभिजीत पाटील यांनी केली विनंती* - चेअरमन अभिजीत पाटील प्रतिनिधी पंढरपूर/-   दि.१२ : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांनी पंढरपूरकराच्या प्रस्तावित जुलमी करवाढीच्या विरोधात मा. मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांना सदरच्या करवाढीस स्थगिती मिळणेकामी पंढरपूरकरांच्या वतीने लेखी पत्राद्वारे निवेदन दिले. पंढरपूरातील सर्व पक्ष, सर्व संघटना यांनी नगरपरिषदेच्या या जुलमी करवाढीच्या विरोधात मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूर यांना नागरिकांच्या व्यथा लेखी स्वरूपात मांडून निवेदन देण्यात आले. तसेच पंढरपूरातील सुज्ञ नागरिकांनीही शहराच्या विविध भागामध्ये सह्यांची मोहिम राबवून पंढरपूर नगरपरिषदेने या प्रस्तावित केलेल्या जुलमी करवाढीच्या विरोधात निषेध नोंदविल्याचे दिसून आले. पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपूर शहरातील सर्व करपात्र मालमत्ता धारकांसाठी दि.९ नोव्हेंबर, २०२३ रोजी काही वृत्तपत्रां...

जुलमी करवाढीवर आ. आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात वेधले लक्ष.

Image
 पंढरपूर नगरपरिषदेची जुलमी करवाढ व इतर स्थानिक प्रश्नांबाबत आमदार आवताडे यांनी विधिमंडळ सभागृहाचे वेधले लक्ष  पंढरपूर  प्रतिनिधी - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध स्थानिक प्रश्न तसेच निरनिराळ्या विकासात्मक बाबींची पूर्तता करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा आणि पंढरपूर नगरपरिषदेने केलेली अतिरिक्त जुलमी प्रस्तावित करवाढ आदी प्रश्नांवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पुरवणी मागणी वरील चर्चेत बोलताना आ. आवताडे यांनी पंढरपूर नगरपरिषदेने एका खाजगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून केलेल्या अतिरिक्त करवाढीमुळे  पंढरपूरकरांवरती पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, बांधकामाचा खर्च वाढला आहे त्यामुळे घरकुलाचा निधी वाढवून मिळावा तसेच ७/१२ मध्ये संगणकीकरण करत असताना संबंधित तलाठी यांचेकडून झालेल्या चुका दुरूस्त करण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याबाबत तसेच संजय गांधी निराधार लाभार्थी योजनेची उत्पन्नाची मर्यादा २१०००आहे त्यात वाढ करून ५०,००० करावी या या मुद्द्यांवर आमदार...

काँग्रेस पक्षाच्या भ्रष्ट खासदाराचे भा ज पा च्या वतीने दहन.

Image
 पंढरपूर येथे काँग्रेस पक्षाचे झारखंड येथील खासदार धीरज साहू यांच्या घरात बेहिशोबी करोडो रुपयांच्या नोटा सापडल्याने आज सोमवार दि ११ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करीत साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.  वादग्रस्त खासदार धीरज साहू यांच्या बंगल्यात तीनशे कोटी पेक्षा जास्त बेहिशोबी रक्कम दिसून आली, नोटा मोजताना दोन मशीन तुटल्या, तर चक्क पोत्यात नोटा भरून टेम्पो मधून न्याव्या लागल्या,  यावेळी साहू तसेच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. धीरज साहू यांच्या पुतळ्यावर रॉकेल टाकून दहन करण्यात आले. यावेळी डॉ प्राजक्ता बेणारे म्हणाल्या, सोनिया गांधी यांनी अशा भ्रष्टाचारी नेत्याना आपल्या पक्षात स्थान कसे दिले? ७० वर्षात काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी देश लुटण्याचे काम केले, पण जनता आता काँग्रेस पक्षाच्या लोकांना मते देणार नाही, बेगडी प्रेम दाखविणारे काँग्रेस पक्षाचे लोक कधीच देशप्रेमी होऊ शकणार नाही,  २०२४ साली केंद्रात आणि राज्यात देखील पुन्हा भा ज प चीच ...

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १३१ प्रकरणे निकाली,५ कोटी ९६ लाख ४४ हजार रुपयांवर तडजोड.

Image
 राष्ट्रीय लोकअदालतीत १३१ प्रकरणे निकाली ५कोटी ९६ लाख  ४४ हजार रुपयांवर तडजोड                 पंढरपूर ( प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये १३१  प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण ५ कोटी ९६ लाख ४४ हजार ८५४ रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.      जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.   या  लोकअदालतीसाठी एकूण ४ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे, दिवाणी न्यायाधीश एन.एस.बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश पी.पी. बागुल,  न्यायाधीश श्रीमती पी.एन.पठाडे यांनी काम पाहिले.          या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक व...

आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृत्रिम मोफत हात पाय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
 आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हात व पाय शिबिरासाठी लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधू वासवानी पुणे यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबिरासाठी मतदार संघातील लाभार्थी बंधू-भगिनींनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ३८४ इतक्या लाभार्थ्यांनी आपल्या अवयवाची तपासणी करून आवश्यक अवयवासाठी मोजमाप संबंधित संस्थेकडे दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले की, आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मंडळींनी त्यांच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता या लाभार्थी बंधू-भगिनींसाठी आपल्या संवेदनशील भावनेने या शिबिराचे आयोजन करून आमदार आवताडे यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा मानस ठेवला आणि त्यांनी या उपक्रमातून तो...

. आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृत्रिम हात व पाय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
 आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृत्रिम मोफत हात व पाय शिबिरासाठी लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधू वासवानी पुणे यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबिरासाठी मतदार संघातील लाभार्थी बंधू-भगिनींनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले. या शिबिरामध्ये जवळपास ३८४ इतक्या लाभार्थ्यांनी आपल्या अवयवाची तपासणी करून आवश्यक अवयवासाठी मोजमाप संबंधित संस्थेकडे दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले की, आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मंडळींनी त्यांच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता या लाभार्थी बंधू-भगिनींसाठी आपल्या संवेदनशील भावनेने या शिबिराचे आयोजन करून आमदार आवताडे यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा मानस ठेवला आणि त्यांनी या उपक्र...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणेसाठी १५० कोटी रुपये निधी.- आ. समाधान आवताडे.

Image
 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणे साठी १५० कोटी रुपयांचा निधी  आ. समाधान आवताडे यांनी केली होती वाढीव निधीची मागणी  प्रतिनिधी : पंढरपूर  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी राज्य शासनाने १५० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. नागपूर अधिवेशन काळात पुरवणी बजेट मध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांचा काया पालट होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हे दक्षिण काशी मानले जाते. येथील श्री विठ्ठल, रुक्मिणी आणि परिवार देवतांची मंदिरे शेकडो वर्षे पुरातन आहेत. काळाच्या ओघात त्यामध्ये वेळी वेळी रंग रांगोटी आणि दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र अलीकडे ही मंदिरे अधिक जीर्ण झाल्याचे, त्यांचे पुरातन स्वरूप हरवल्याचे दिसू लागले होते. त्यामुळे राज्य सरकारने श्री विठ्ठल रुक्मिणी आणि परिवार देवतांच्या मंदिरांच्या सुधारणे साठी यापूर्वीच ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे..मंदिर सुधारणेचा आराखडा मंजूर असून प्रत्यक्ष कामकाजास कार्तिकी यात्रेपासून सुरु...

औषध फवारणीमुळे पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील बागा जळाल्या, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

Image
 औषध फवारणीमुळे पंढरपूर व मोहोळ मधील द्राक्ष बागा जळाल्या शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान पंढरपूर-(प्रतिनिधी )आधीच नैसर्गिक बदलामुळे त्रस्त असलेल्या तालुक्यातील कासेगाव, अनवली व पुळूज तसेच मोहोळ तालुक्यातील आढेगाव या भागातील द्राक्ष उत्पादक, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी फवारलेल्या किटकनाशक फवारणीमुळे मोठे नुकसान झाले असून एकूण ५० एकरावरील बागा जळाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकां समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर फवारणी करण्यासाठी की नावाच्या किटकनाशक औषधाची फवारणी केली. मात्र सदर एकाच बॅचच्या पॅकिंगचे किटकनाशक औषधांमधून फवारणी केल्यामुळे कासेगावसह मोहोळ तालुक्यातील आढेगाव, पुळूज येथील शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा जळून गेल्या आहेत. यासह खरबूज, कलिंगडची बागही जळून गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या औषधाच्या फवारणीने पन्नास एकरापेक्षा जास्त बाग जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामध्ये अनवली येथील पोपट शिवदास घ...

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यासाठी ८९ कोटी रुपयांचा निधी.- आ. समाधान आवताडे.

Image
 *पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर - आमदार आवताडे* (प्रतिनिधी):  पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्ते व पुलाचे मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्ते, पुल व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयास ८९ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.  पंढरपूर व मंगळवेढा मतदारसंघातील दळणवळणच्या दृष्टिनी रस्ते, पूल गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे होते. सदर रस्त्याने दररोज दळणवळण करत असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास सुखकर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार आवताडे यांनी संबंधित विभागाकडे आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. आमदार आवत...