काँग्रेस पक्षाच्या भ्रष्ट खासदाराचे भा ज पा च्या वतीने दहन.


 पंढरपूर येथे काँग्रेस पक्षाचे झारखंड येथील खासदार धीरज साहू यांच्या घरात बेहिशोबी करोडो रुपयांच्या नोटा सापडल्याने आज सोमवार दि ११ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करीत साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

वादग्रस्त खासदार धीरज साहू यांच्या बंगल्यात तीनशे कोटी पेक्षा जास्त बेहिशोबी रक्कम दिसून आली, नोटा मोजताना दोन मशीन तुटल्या, तर चक्क पोत्यात नोटा भरून टेम्पो मधून न्याव्या लागल्या,  यावेळी साहू तसेच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

धीरज साहू यांच्या पुतळ्यावर रॉकेल टाकून दहन करण्यात आले. यावेळी डॉ प्राजक्ता बेणारे म्हणाल्या, सोनिया गांधी यांनी अशा भ्रष्टाचारी नेत्याना आपल्या पक्षात स्थान कसे दिले? ७० वर्षात काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी देश लुटण्याचे काम केले,

पण जनता आता काँग्रेस पक्षाच्या लोकांना मते देणार नाही, बेगडी प्रेम दाखविणारे काँग्रेस पक्षाचे लोक कधीच देशप्रेमी होऊ शकणार नाही,

 २०२४ साली केंद्रात आणि राज्यात देखील पुन्हा भा ज प चीच सत्ता येणार, असा विश्वास डॉ प्राजक्ता बेणारे यांनी व्यक्त केला.

यावेळी भा ज पा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे, सौ अपर्णा तारके, सौ रचीता सगर, सौ रेश्मा मोळक , बादल सिंह ठाकूर, अण्णासाहेब धोत्रे, धीरज म्हमाणे, संदीप माने, सुनील डोंबे, भैय्या कळसे, अनुप देवधर, अमोल धोत्रे, आबा पाटील, समाधान घायाळ, अक्षय माने, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.