एकदा तरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहिजे.- पंडित प्रदीप मिश्रा.


 *एकदा तरी पंढरपुरात येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले पाहिजे* - पंडित प्रदीप मिश्रा


*आजी माजी सैनिकांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली*


*॰अभिजीत पाटील शिव स्वरूपात॰समर्पित भावनेने प्रत्येक कार्यातील पुढाकाराची सर्वत्र चर्चा॰*



प्रतिनिधी : 


पंढरपूर नगरीत श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा दुसरा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला.


सिंहोर येथील सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुश्राव्य वाणीत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातही विशेष ठरत आहे तो यजमान अभिजीत पाटील यांचा उस्फुर्त सहभाग....


जेवण बनविण्यापासून ते स्वच्छता कार्यापर्यंत सर्व बाबतीत त्यांचा पुढाकार दिसून येत आहे. भव्य मंडपामध्ये प्रत्येकाच्या भोजनाची आस्थेवाईक चौकशी करण्यापासून ते शेवटचा माणूस झोपेपर्यंत  अभिजीत पाटील एका आदर्श यजमानाच्या भूमिकेत अत्यंत समर्पित भावनेने काम करताना दिसत आहेत.


आज दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर भगवान महादेवाचा वेश धारण करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि तीही त्यांनी समर्थपणे पार पडली त्यांच्या महादेव रुपाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.


दिवसाची सुरुवात अत्यंत मंगलमय वातावरणात पूजनाने झाली. त्यानंतर आजी माजी सैनिकांच्या हस्ते भगवान महादेवाची आरती करण्यात आली. देवभक्ती आणि देशभक्तीचे एकत्रित दर्शन आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाले. यानंतर महाराजांच्या सुश्राव्य कथेतून भगवान महादेव आणि विठ्ठलाचा महिमा वर्णन झाले. जो कोणी भारतात जन्माला आला आहे त्याने एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेच पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी अशिर्वाचनात केले. 


दि.३१ डिसेंबर पर्यंत ही कथा दररोज दुपारी १ वाजता होणार असून यजमान श्री.अभिजीत आबा पाटील यांनी अधिकाधिक संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.