पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची निवड.


 *पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची निवड*

पंढरपूर ( प्रतिनिधी )पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर अध्यक्ष दत्ताजी पाटील होते या बैठकीत 

राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली 

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*

*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*

*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*

*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*

*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*

*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*

*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*

*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*

*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*

*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*

*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*

या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांच्या सूचनेनुसार पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी साप्ताहिक ठिणगी चे संपादक जेष्ठ व अभ्यासू पत्रकार रामचंद्र सरवदे यांची निवड करण्यात आली 

*ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र आणून प्रश्न सोडवणार*

ग्रामीण भागातील पत्रकारांची अवस्था खूपच वाईट असून समस्या देखील मोठया प्रमाणात आहेत ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्र घेऊन प्रश्न सोडवणार असल्याचे पत्रकार सुरक्षा समिती चे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष  रामचंद्र सरवदे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले 

*पत्रकारांचे प्रश्न सोडण्यासाठी पत्रकारांची एकजूट असणे काळाची गरज*


 राज्यातील पत्रकारांचे प्रश्न  दिवसेंदिवस जटील होत असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक विषय शासन दरबारात धूळ खात पडले आहेत.  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर पत्रकारांची एकजूट असणे आवश्यक असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी यावेळी व्यक्त केले.

या बैठकिला पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार दैनिक मतदार चे संपादक अक्षय बबलाद पंढरपूर शहर प्रसिद्धी प्रमुख रामकृष्ण बीडकर राहुल रणदिवे संतोष चंदनशिवे नागेश काळे लखन साळुंखे अशपाक तांबोळी विनोद पोतदार उपस्थित होते.

*रामचंद्र सरवदे यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये जल्लोष*

रामचंद्र सरवदे हे गेली तीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी व समस्या त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत एका जेष्ठ व अभ्यासू पत्रकाराची पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाल्याने पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे हे नक्कीच पत्रकारांचे प्रश्न सोडवतील अशी भावना अनेक पत्रकारांनी बोलून दाखवली आहे.

संपादक

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.