स्वेरीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न.


 स्वेरीत ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’संपन्न

‘अॅडव्हान्स एनर्जी स्टोरेज: टेक्नॉलॉजी, इंटिग्रेशन अँड इम्प्लीमेंटेशन’ या विषयावर मिळाले तज्ञांचे मार्गदर्शन

पंढरपूर-(प्रतिनिधी )अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) इंडिया यांच्यावतीने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘अॅडव्हान्स एनर्जी स्टोरेज: टेक्नॉलॉजी, इंटिग्रेशन अँड इम्प्लीमेंटेशन’ या विषयावर आयोजित केलेला एफडीपी तथा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ नुकताच संपन्न झाला. या उपक्रमाच्या निमित्ताने सर्व सहभागी प्राध्यापकांना विविध तज्ञांकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

           स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि.१० डिसेंबर ते दि.१५ डिसेंबर २०२३ दरम्यान या ‘एफडीपी’चे आयोजन केले होते. यावेळी पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा.डॉ.मोहन आवारे यांनी मार्गदर्शन केले तसेच नंतर चर्चासत्रही झाले. दुसऱ्या सत्रात दुबईतील बिटमस इम्पेरियल युनिव्हर्सिटीच्या शार्घ दुबईचे  डॉ.अकबर अहमद यांनी ‘रिन्युवल एनर्जी इंटीग्रेशन’ यावर माहिती दिली. दूसऱ्या दिवशीच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात कुणाल खंडेलवाल यांनी इलेक्ट्रिक व्हेइकल इंटीग्रेशन वर माहिती देवून प्रात्यक्षिक, मॅनेंजमेंट आणि कंट्रोल यावर माहिती दिली. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डॉ.अर्चना ठोसर यांनी ‘एनर्जी स्टोरेज’ यासंदर्भात माहिती व विविध संकल्पना सांगितल्या तसेच त्यांनी सेफ्टी एन्व्हायरमेंट यावर प्रकाश टाकला. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात संगमनेर येथील अमृतवाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.किशोर बदाने यांनी ‘एनर्जी स्टोरेज टेक्नोलॉजी’ यावर माहिती देत त्याचे विविध प्रकार सांगून भविष्यात याची साठवणूक कशी करावी? यावर महत्वपूर्ण भाष्य केले. एफडीपीच्या प्रात्यक्षिकाचाच एक भाग म्हणून पाचव्या दिवशी माचनूर (ता.मंगळवेढा) येथील स्पार्टन टेक्नोलाजी या सोलर कंपनीला भेट देवून माहिती जाणून घेतली. एफडीपी कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशीच्या पहिल्या सत्रात जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.अशोक मतानी यांनी ‘पीव्ही सिस्टम्स एन्टीग्रेशन’ यावर माहिती दिली तर शेवटच्या सत्रात अभिप्राय (फिडबॅक) आणि संवाद कौशल्य (एन्टरॅक्शन सेशन) संपन्न झाले. यावेळी स्वेरीतील व इतर महाविद्यालयातील जवळपास ६० प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.मोहन ठाकरे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. नितिन कौटकर यांनी केले तर आभार संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने यांनी मानले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.