पंढरीच्या डॉक्टरांचा विदेशात डंका.
*पंढरीच्या डॉक्टरांचा विदेशात डंका!*
प्रतिनिधी. पंढरपूर - ग्लोबल रिसर्च फोरम व आय. डी. एम. इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी शारजाह यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत बिझनेस ग्रोथ चॅलेंजेस मेजर्स सोल्युशन्स इन ग्लोबल परिदृष्य या विषयावर दुबई येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत पंढरीतील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व एस के एन इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलासजी करांडे यांनी त्या अंतरराष्ट्रीय परिषदेच्या सत्राचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते म्हणून परिषद गाजवली. पंढरीच्या डॉक्टर करांडे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंढरीचा डंका वाजवला म्हणून येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता.
त्याबद्दल डॉ. कैलाशजी करांडे यांनी सांगितले की, सिंहगड इंजि. कॉलेजला पहिल्यांदा जेव्हा नॅक कमिटीने ए प्लस श्रेणी दिली होती तेव्हा पहिल्यांदा कलासाधना सांस्कृतिक मंडळाने मला विशेष गुणवत्ता पुरस्काराने गौरविले होते, तेव्हा पासून अनेक पुरस्काराची शृंखला सतत सुरु असून देशाबरोबर परदेशातही एस के एन कॉलेजचा डंका वाजत आहे. यासत्कार समारंभाचे आयोजित केल्याबद्दल त्यांनी कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक सर होते. परिचारक आपल्या भाषणात म्हणाले की, कैलाशजी करांडे सरांनी इंजिनियरिंगच्या शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे पंढरीचे शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक देशाबरोबर परदेशातही गाजत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंह चव्हाण सर यांनी केले तर अक्षय बडवे ,रणजीत पवार, डॉ किरण बहिर्वाडे यांची समयोचित भाषणे झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. राजेंद्र मोरे, , राजकुमार शहा, राजकुमार आटकळे, महेश अंबिके, सचिन भिंगे, राहुल सिद्धेवाडकर,अभिजीत देशापांडे. यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी ज्ञानेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment