Posts

Showing posts from August, 2024

संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक. डॉ सत्यनारायण.

Image
 संशोधन कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यावश्यक                                                     - वैज्ञानिक डॉ.बी. सत्यनारायण स्वेरीमध्ये ‘पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन २०२४’ साजरा पंढरपूर- प्रतिनिधी-‘इस्रोच्या ‘चांद्रयान-३’ या ऐतिहासिक मोहीमेमुळे जगाबरोबरच भारतातील युवा संशोधकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडला आहे. नवअभियंते व विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि स्वप्नांच्या पुर्ततेसाठी परिश्रम घ्यावेत. देशाच्या अंतराळ संशोधनामध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेरित असणे गरजेचे आहे. एकूणच संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे व  त्यायोगे  देशाच्या विकासाला हातभार लावणे अत्यावश्यक आहे.’ असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथील प्रख्यात वैज्ञानिक अधिकारी डॉ.बी. सत्यनारायण यांनी केले.          आयट्रिपलई, आयआयसी आणि एलाइट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील ...

घोटी येथे माजी शालेय विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहसंमेलन, जुन्या आठवणींना उजाळा.

Image
घोटी गावात शालेय जून्या मित्र मैत्रिणींचे स्नेहसंमेलन. घोटी प्रतिनिधी - शालेय अवखळ अल्लड जीवनातील निरागस मैत्री, शिक्षक, शिक्षिका यांच्याविषयी असणारे नाते कोण बरे विसरेल, अशाच नातेसंबंधांना उजाळा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील घोटी या गावात ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या वतीने  सुमारे 42वर्षानंतर गेट टुगेदर, म्हणजेच जून्या मित्र मैत्रिणींचे स्नेसंमेलन शुक्रवार दी 16ऑगस्ट रोजी दहिदुधाळ येथे आयोजीत करण्यात आले होते. घोटी येथील जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेतलेल्या 1970पासूनचे मित्र मैत्रिणी अत्यंत उत्साहाने या मैत्रीच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. घोटी भागातील दही दुधाळ या महादेवाच्या मंदिरात  हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या रम्य परिसरात सुंदर तळ्याकाठी अनेकांनी शालेय जीवनातील अनोख्या आठवणींना, विनोदी किस्से, शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा उजाळा घेऊन मन पुन्हा एकदा त्या सुखद काळातील रम्य रमणीयातेत नेले. ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या माध्यमातुन अध्यक्षा सौ जयश्री घाडगे व सहकारी घोटी गावाचा सर्वागीण विकास, जि प शाळेस भरीव मदत करीत आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास  घोटितील पूर्वीचे रहिवासी,...

मुस्तकिम बारसकर याची इन्स्टा आय टी सोल्युशन्स कंपनीत निवड.

Image
 स्वेरीच्या मुस्तकीम बारसकर यांची ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या कंपनीत निवड मिळाले वार्षिक रु. ४.८ लाखांचे पॅकेज पंढरपूरः प्रतिनिधी ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील मुस्तकीम महमदहनीफ बारसकर यांची कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.      पुणे येथील ‘इंस्टा आयसीटी सोल्युशन्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या  मुस्तकीम महमदहनीफ बारसकर या विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना वार्षिक रु. ४.८  लाख इतके पॅकेज मिळाले आहे. अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांना या कंपनीत इंटर्नशीपची संधी देखील मिळाली होती. विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक ...

एम आय डी सी लवकरच कासेगाव येथे होणार, आ. आवताडे यांच्या प्रयत्नांना यश.

Image
 *पंढरपूर एम आय डी सी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित* *पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभरणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांचे यश* पंढरपूर पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने 'औद्योगिक क्षेत्र ' म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एम आय डी सीच्या उभारणीला आता गती येणार आहे. लवकरच midc चे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, चार प्रमुख वाऱ्या वर उदरनिर्वाह करणारे गाव अशीही पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूर तालुक्यातील हजारो युवक रोजगाराच्या  शोधत पुण्या - मुंबईला जातात. स्थानिक पातळीवर एम आय डी सी असावी अशी मागणी अनेक दशकांपासून केली जात आहे. मात्र आजवर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी एम आय डी सी मंजूर झाली नाही. बऱ्याच वेळी स्थानिक राजकारणाच्या कुरघोडी मुळे एम आय डी सी उभारणीत खोडा घातला जात होता. परंतु आ. समाधान आवताडे यांनी गेल्या केवळ दोन वर्षात सातत्याने पाठपुरावा करून, कासेगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून घे...

बहिणींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो. अभिजीत पाटील.

Image
 *बहिणींच्या आनंद हाच आशीर्वाद मानतो* -अभिजीत पाटील. *महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी कायम प्रयत्न करणार* - अभिजीत पाटील. (माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे 'खेळ पैठणीचा' कार्यक्रम उत्साहात संपन्न) प्रतिनिधी/-  'खेळ पैठणीचा' कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद मानतो, असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले. सध्या विधानसभेच्या तोंडावर मतदारसंघांमध्ये भेटीगाठी व कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने अभिजीत पाटील आपला जनसंपर्क वाढवत असून विविध कार्यक्रम घेत असताना माढा तालुक्यात अभिजीत पाटील यांनी आपला चांगला चंग बांधलेला दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माढा केसरी म्हणून कुस्ती स्पर्धा टेंभुर्णी येथे घेण्यात आल्या होत्या. अभिजीत पाटील यांनी माढा तालुक्यातील माळशिरस तालुक्यात जोडलेल्या 14 गावांमध्ये देखील आपला जनसंपर्क वाढवत असल्याचे दिसून आले. नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित अभिजीत...

आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहोत.- अभिजीत पाटील.

Image
 *आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरलो आहे* - अभिजीत पाटील. (श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे निकाली कुस्ती मैदान संपन्न) (अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघांत जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू) प्रतिनिधी/-  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे 'माढा केसरी २०२४' निकाली कुस्ती मैदानाचे दिनांक १८ऑगस्ट रोजी टेंभुर्णी येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माढा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेतेगण तसेच कुस्तीमल्ल, वस्ताद व कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. यावेळी अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की; विधानसभेच्या आखाड्यात आपण मैदान मारण्यासाठी उतरत आहोत असे स्पष्ट सांगून विरोधकांना टोला लागलेला आहे.कधीकधी जोड नसल्यास अडवून कुस्ती मारावी लागते, कुस्ती हा बुद्धी, चातुर्य, चपळतेचा, साहस्येचा खेळ आहे. आपणा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद असेच मिळत राहो ज्याला जे लक्षात यायला लागले ते घ्यावं आपण या ठिकाणी कुस्ती मैदान मारायलाच आलो आहे असे अभिजीत पाटील यांनी म्हणत ...

रक्षाबंधन सणासाठी येणाऱ्या बहिण भावावर काळाची झडप, भीषण अपघातात दोघे जागीच ठार.

Image
 रक्षाबंधन सणासाठी येणाऱ्या बहिण भावावर काळाची झडप, कार अपघातात दोघे जागीच ठार. पंढरपूर –   नियती कधी कधी अत्यंत निष्ठुर होते, उद्या असणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिणीस कारमधून घेऊन येणाऱ्या भाऊ आणि बहीण यांच्यावर सणाआधीच मृत्यने झडप घातली.मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळा येथे स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता हा अपघात झाला आहे.  रक्षाबंधनासाठी   बहीण ऋतूजा  पुण्याहून खास सणासाठी आली होती.अपघातातील मयत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या राखीपौर्णिमा सणासाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली होती. भाऊ रोहित जाधव हा तिला आणायला गेला होता. तिला कारमधून घेऊन मंगळवेढा येथे घरी निघाला असता काळाने घाला घातला. पंढरपूर हून मंगळवेढा कडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच १३ बी एन ६६४९ ची पंढरपूर कडे येत असलेला आयशर टेंपो आर जे ३६ जी ए ८९७१ शी समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट मधील बहीण भाऊ या भीषण अपघ...

पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 110कोटी र. मंजुर.

Image
 पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी 110 कोटीच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता.  दर्शन मंडप व स्काय वॉकचा प्रश्न जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागत आहे  उच्चाधिकार समितीने 110 कोटीचा आराखडा मंजूर केला पंढरपूर  (प्रतिनिधी):- पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या मोठ्या वाऱ्यांना दहा ते वीस लाख भाविक दर्शनासाठी येतात व रांगेत उभे राहतात. वर्षभरात जवळपास एक कोटी भाविक पंढरपूर येथे येतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने 129 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस 2024 रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 110 कोटी चा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.      मुंबई य...

अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने सुस्ते येथे, खेळ पैठणीचा उत्साहात संपन्न.

Image
 *सुस्ते येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न* (गप्पा, गाणी, प्रश्नमंजुषा सह हळदी-कुंकू कार्यक्रमातून अभिजीत पाटीलांची विधानसभेची जोरदार तयारी) पंढरपूर दि.१६ऑगस्ट :  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांच्यावतीने नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या निवेदनाखाली खेळ पैठणीचा कार्यक्रम सुस्ते येथे उत्साहात संपन्न झाला.. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतुने कार्यक्रम घेत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत याच अनुषंगाने खेळ पैठणीचा कार्यक्रम घेत असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. सदर कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास बापू चव्हाण, पांडुरंग कदम, बाळासाहेब सालविठ्ठल, अनिल काका घाडगे, सरपंच विशाल कसबे, दिलीप दाजी रणदिवे, समाधान चव्हाण, उपसरपंच स्नेहा बोबडे, ...

स्वातंत्र्यदिनी निमीत्त डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात मोफत बालरोग व कावीळ तपासणी शिबिर संपन्न.

Image
 स्वातंत्र्यदिनानिमित्त* *पंढरीत डॉ शितल शहा यांच्या* नवजीवन रुग्णालयात कावीळ तपासणी शिबिर उत्साहात संपन्न. पंढरपूर प्रतिनिधी  पंढरपूर येथे भारताच्या 78 व्यास्वातंत्र्यदिनानिमित्त  गुरुवार दि . 15ऑगस्ट रोजी लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले डॉ शितल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात  बालरोग व कावीळ तपासणी महा शिबीर उत्साहात संपन्न झाले .सकाळीं 10ते सायंकाळीं 5या वेळेत कऱण्यात आले होते,पंढरपूर येथील 350ते 400 गरजू बालकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.अशी माहिती डॉ शितल शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन आय एम ए, आय ए पी व नवजीवन बाल रुग्णालय यांच्या सहकार्याने कऱण्यात आले  होते.असुन प्रमूख पाहूणे म्हणून तहसीलदार सचिन लंगुटे , डॉ संजय देशमुख,उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ महेश सुडके, , डॉ शितल शहा , डॉ  रवी आहेर उपस्थित होते. या बालरोग व कावीळ तपासणी शिबिरात लहान मुलांचे पोटाचे विकार, या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि योग्य मार्गदर्शन करुन समुपदेशन करण्यात आले. पुणे येथील सुप्रसिध्द रुबी हॉल हॉस्पिटल मधील डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ विष्णू ...

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

Image
 पंढरपूर येथे भर मध्यवस्तीत  सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांची धाड, तीन महीला अटकेत. प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर येथील उच्चभृ लोकांची वस्ती असणाऱ्या महावीर नगर परिसरात एका पडीक बंगल्याच्या आवारात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर पोलीसांनी धाड टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार दि.14ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कऱण्यात आली. यातील दोन महीला सोलापूर येथील असुन एक महीला पंढरपूर तालुक्यातील  कोर्टी या गावची आहे. महावीर नगर येथे अनेक वर्षापासून एक पडीक बंगला होता, या बंगल्याच्या आवारात तीन महीला अवैध वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग व निर्भया पथकाच्या पोलिसांना मिळाली, यावरुन सदर कारवाई करून तीन महिलांसह त्यांना मदत करणाऱ्या दोन पुरुषांना देखील अटक कऱण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हे अनैतिक प्रकार येथे चालू होते  पंढरपूर येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके,. निर्भया पथकाच्या पोलीस निरिक्षक मोनिका खडके, डी बी पथकातील विजय गायकवाड, सचिन इंगळे, नवनाथ माने,शहाजी मंडले, समधान माने यांच्या पथक...

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरीत डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात कावीळ तपासणी शिबिराचे आयोजन.

Image
 स्वातंत्र्यदिनानिमित्त  पंढरीत डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात कावीळ तपासणी शिबिराचे आयोजन.  पंढरपूर प्रतिनिधी -पंढरपूर येथे भारताच्या 77 व्या  स्वातंत्र्यदिनानिमित्त  म्हणजेच दि . 15ऑगस्ट रोजी लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात  बालरोग व कावीळ तपासणी महा शिबीराचे आयोजन सकाळीं 10ते सायंकाळीं 5या वेळेत कऱण्यात आले आहे अशी माहिती डॉ शीतल शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन आय एम ए, आय ए पी व नवजीवन बाल रुग्णालय यांच्या सहकार्याने कऱण्यात आले असुन प्रमूख पाहूणे म्हणून प्रांताधिकारी सचिन इथापे, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ महेश सुडके, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले, डॉ शीतल शहा हे असणार आहेत. या बालरोग व कावीळ तपासणी शिबिरात लहान मुलांचे पोटाचे विकार, या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि योग्य मार्गदर्शन करुन समुपदेशन देणार आहेत. पुणे येथील सुप्रसिध्द रुबी हॉल हॉस्पिटल मधील डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ विष्णू बिरादार, डॉ पवन हंचनाळे, डॉ विनीत शहा, डॉ सिद्धांत चव्हाण, डॉ अमोल जाधव, डॉ मध...

अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने उंदरगाव येथे पैठणीचा कार्यक्रम.

Image
 *उंदरगाव येथे पहिल्यांदाच ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला* *अभिजीत पाटलांच्या पुढाकारांना माढा तालुक्यातील उंदरगाव येथे नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न* प्रतिनिधी पंढरपूर/-  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी माढा तालुक्यात माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यामध्ये जंगजंग बांधला असून अभिजीत पाटील हे गावोगावी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेत अभिजीत पाटील आपला संपर्क वाढवत असताना दिसत आहेत.  विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित नागपंचमी व रक्षाबंधनानिमित्त अभिजीत आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उंदरगाव येथील अभिजीत पाटील यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले असता सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजु यांच्या उत्कृष्ट संयोजनातून दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलाविण्याचा हेतू सफल झाला. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावे या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.  यावेळी भाऊसाहेब महाडिक-देशमुख, ऋषिकेश क...

स्वेरी मध्ये डि फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू.

Image
 डी. फार्मसी प्रवेशासाठी  ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू  स्वेरीमध्ये सदर रजिस्ट्रेशनची मोफत सोय  पंढरपूरःप्रतिनिधी *गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर म्हणुन स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०८ ऑगस्ट २०२४) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार  दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.         शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये डी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई  येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५) म्हणून स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील...

स्वेरी मधील नऊ विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीत निवड.

Image
 स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या कंपनीत निवड पंढरपूरः प्रतिनिधी-‘विप्रो पारी प्रा. लि.’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.            ‘विप्रो पारी प्रा. लि.’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.  त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अमित अभिमन्यू पाटील, गोविंद ज्ञानेश्वर पवार, अभिजित विकास खुळे, अर्जुन विजयकुमार पाटील, आशुतोष दर्लिंग माने, अविष्कार गोरख उबाळे, रितेश गणेश चव्हाण, शिवराज तानाजी मगर, यश राजेश बागेवाडीकर या ९ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रु.३.८ लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे. ‘विप्रो पारी प्रा. लि.’ ही कंपनी १९९० साली स्थापन झाली असून सध्या ती रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या क्षेत्र...

वेदांताचे अभ्यासक बाळशास्त्री हरिदास यांचे निधन.

Image
 वेदांताचे अभ्यासक बाळशास्त्री हरिदास यांचे निधन पंढरपूर प्रतिनिधी- वेदांताचे अभ्यासक व संत साहित्याचे लेखक पांडुरंग गणेश तथा बाळशास्त्री हरिदास (वय-92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. श्री विठ्ठलाचे सेवाधारी असणाऱ्या बाळशास्त्री हरिदास यांनी पन्नास वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन तसेच देवाच्या नित्य उपचारामध्ये सेवा बजावली होती. येथील नगर वाचन मंदिर, आपटे उपलब्ध प्रशाला, याज्ञवल्यक आश्रम या संस्थेचे ते विश्वस्त होते. वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.गोफण  परिवाराचे ते हितचिंतक होते. हरिदास परिवाराच्या दुःखात गोफण परिवार सहभागी आहे  संपादक. चैतन्य उत्पात.

स्वेरीच्या एकवीस विद्यार्थ्यांची, भारत फोर्ज, कंपनीत निवड.

Image
 स्वेरीच्या २१ विद्यार्थ्यांची ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या कंपनीत निवड पंढरपूरः  प्रतिनिधी- ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.              ‘भारत फोर्ज लिमिटेड’ या भारतीय बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून शरयू शेखर गरड, भाग्यश्री ऋषिकेश पाटील, आशुतोष दर्लिंग माने, शिल्पा भाऊ भुसनर, स्नेहल संजय कोरे, सागर उमेश पाटील, प्रमोद नागनाथ कोरके, प्रज्ञा संजय माने, अमित अभिमन्यू जाधव, रोहन नवनाथ सुरवसे, पल्लवी दत्तात्रय कोकरे, पल्लवी सुरेश बचुटे, श्रेया काशिनाथ शिंदोळ, पवन राजेंद्र शिंदे, शिवप्रसाद पांडुरंग कारंडे, तुषार मोहन मेटकरी, सौरभ धनाजी घ...

रिअल हिरो, रिअल किंगमेकर श्री उमेश मालक परिचारक.

Image
 रिअल हिरो, रिअल  किंग मेकर श्री उमेश मालक परिचारक. संख्यात्मक राजकारणाच्या बाजारात गुणात्मक राजकारण आणि समाजकारण यांच्या योग्य समन्वय साधणारे हरहुन्नरी जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे श्री उमेश मालक परिचारक. दि.9ऑगस्ट रोजी उमेश त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सदर लेखप्रपंच  घरातूनच राजकारण आणि समाजकारण यांचा वारसा लाभलेले उमेश मालक यांनी मोठ्या मालकांसोबत अनेक लोक पाहिले, राजकारणात कायम सावली सारखी साथ त्यांनी मोठे मालक माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना दिली.तसेच माजी आमदार, मोठे बंधू  प्रशांत मालक परिचारक यांनाही राजकीय कारकिर्दीत खूप मोठी साथ दिली. रामाच्या पाठीशी जसा लक्ष्मण होता तद्वतच उमेश मालकांनी कर्तव्य पार पाडले. विविध राजकीय घडामोडी , निवडणुका यशस्वी पणें हाताळल्या,परिचारक घराण्यातील रिअल किंगमेकर, म्हणणे उमेश मालक. निवडणुका जिंकल्याचा आनंद कार्यकर्ते नेहमीच उत्साहात साजरा करतात. पण ते जिंकण्याचे कसब असणारे, त्यासाठी लागणारी मेहनत, बुद्धिमत्ता पणाला लावणारे उमेश मालक नेहमीच शांत असतात. मी पणाचा अजिबात लवलेश नसलेले उमेश मालक फार थोड्या लोकांना माहीत आहेत.  ...

पंढरीत भा ज पा च्या वतीने राष्ट्रिय हातमाग दीन, साजरा.

Image
 पंढरीत भा ज पा च्या वतीने, राष्ट्रीय हातमाग दिन,साजरा. प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर येथे बुधवार दी 7ऑगस्ट रोजी भा ज पा महीला आघाडी यांचा वतीने  'राष्ट्रीय हातमाग दिन'  साजरा करण्यात आला. 76वर्षांपुर्वी  आजच्या दिवशी स्वदेशी चळवळीचा शुभारंभ झाला, आणि ७ ऑगस्ट 2015 रोजी हातमाग दिन हा चेन्नई मध्ये घोषित झाला.  आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हातमाग वस्तू विकत घेण्याची लाट ही निर्माण झाली.  यामध्ये खादी किंवा आपल्या भारतामध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तू ह्या घरोघरी पोहोचल्या, वास्तविक ०७ ऑगस्ट १९४५  हा स्वदेशी चळवळीचा दिवस असल्याने,या माध्यमातून देशाचे पंतप्रधान  .नरेंद्र मोदी हे स्वदेशी वस्तूंना आणि त्याचबरोबर आपल्या लोकांच्या कामाला चालना मिळावी आणि ते स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहावेत या साठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात.  आज पंढरपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चा त्याचबरोबर जिल्हा संयोजक  या सर्वांच्या वतीने 'हातमाग दिन' साजरा करण्यात आला.  यावेळी पंढरपुरातील सर्वात जुने खादीचे दुकान म्हणजेच 'खादी ग्रा...

क्रांतीदिनी पत्रकार सुरक्षा समिती चे उपोषण, प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार मैदानात.

Image
 *क्रांतीदिनी पत्रकार सुरक्षा समितीचे उपोषण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुन्हा उतरणार रस्त्यावर* सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले मारहाण धमकी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या संदर्भात  स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात  पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत  महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण चे प्रमाण वाढले असून राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला न...

क्रंतिदिनी पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने उपोषण, प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार मैदानात.

Image
*क्रांतीदिनी पत्रकार सुरक्षा समितीचे उपोषण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुन्हा उतरणार रस्त्यावर* सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले मारहाण धमकी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या संदर्भात  स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात  पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत  महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण चे प्रमाण वाढले असून राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही...

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. आ.समाधान आवताडे.

Image
 *पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे*  आ. समाधान आवताडे यांचेकडून प्रशासकीय बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना  पंढरपूर /प्रतिनिधी   उजनी आणि वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वरील धरणातून उजनीकडे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह मोठा आहे. पावसाच्या पाण्यामुळे पाणी अधिक वाढत आहे. यामुळे भीमा नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील प्रशासनाने पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे. अशा सूचना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहे.       उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे.यासाठी  पंढरपूर येथील प्रांत कार्यालय येथे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी प्रशासनाची बैठक घेण्यात आली. यावेळी वरील सूचना देण्यात आल्या आहेत.          सदरच्या बैठकीसाठी  पंढरपूरचे  प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजक...

स्वेरी कॉलेज च्या तीन विद्यार्थिनीची पर्सिस्टंट सिस्टिम्स या कंपनीत निवड.

Image
 स्वेरीच्या तीन विद्यार्थिनींची ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड मिळाले प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाखांचे पॅकेज पंढरपूरः प्रतिनिधी-‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील निकिता पोरे, नुपूर पवार व प्रज्ञा रेपाळ या तीन विद्यार्थिनींची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.     ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागातील निकिता ज्ञानेश्वर पोरे, नुपूर निलेश पवार व प्रज्ञा अनिल रेपाळ या तीन विद्यार्थिनींची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. ५.०१ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ ही कंपनी ३४ वर्षे जुनी असून १९९० साली स्थापन झाली आहे. या कंपनीमध्ये २३ हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपन...

लवकरच पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागेल. विनायक पाथरुडकर

Image
 लवकरच पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागेल : विनायक पाथरूडकर  पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार : किरण जोशी पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रधान पंढरपूर, दि. 4 ( प्रतिनिधी ) पत्रकारांना काम करताना मोठा दबाव असतो. मात्र ही स्पर्धा आहे ते टाळता येत नाही. राजकीय नेत्यांच्या मनामध्ये काय चालू आहे ते कोणालाच कळत नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी त्यांची कायम सकारात्मक भूमिका असते. पंढरपुरातील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंढरपुरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेतल्यास पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मिटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माध्यम सल्लागार, जेष्ठ पत्रकार विनायक पाथरूडकर यांनी पंढरपूर येथील पत्रकारांना दिला.  पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते....

पंढरपूर येथे डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन.

Image
 *पंढरपूर येथील नवजीवन रुग्णालयात मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन.  पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर येथील नवजीवन बाल रुग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दी 4ऑगस्ट रोजी कऱण्यात आले होते . आय एम ए, आय ए पी, आर बी एस के, आणि पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने या मोफत बाल हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर नवजीवन बाल रुग्णालयाचे सर्वश्री डॉ शितल शहा, प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी सचिन इथापे, पुणे येथील सुप्रसिध्द बाल हृदयरोग तज्ञ डॉ संतोष जोशी,, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले, उप जिल्हा रुग्णालय प्रमुख डॉ महेश सुडके आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या चाळीस वर्षांपासून केवळ लहान मुलांच्या सेवेत देव पाहून आपले सर्वस्व, आयुष्य बाल रुग्ण सेवेसाठी अर्पित केलेलें व्रतस्थ, धीरोदात्त व्यक्तिमत्त्व असणारे डॉ शीतल शहा यांनी या शिबिराच्या माध्यमातून दोनशे पन्नास पीडित बालकांची मोफत तपासणी करून समुपदेशन केले. सुप्रसिध्द डॉ संतोष जोशी यांनी शिबिराला आलेल्या बालकांची तपासणी करून पालकांना विशेष सूचना, कोणती काळजी घ्यायची याविषयी स...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित.

Image
 मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची चित्रफीत पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शित. पंढरपूर  प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील ऐतिहासिक मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून या योजनेच्या माहितीची चित्रफीत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते सोलापूर येथे प्रदर्शित करण्यात आली यावेळी आमदार समाधान आवताडे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,अधीक्षक अभियंता बगाडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर अंकुश पडवळे पांडुरंग चौगुले यांचेसह  24 गावातील पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या कामाला मंजुरी मिळवण्याचा ऐतिहासिक निर्णय समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून घेतला असून त्यांच्या या प्रयत्नामुळे तालुक्यातील शेतकरी शेतात लवकरच पाणी पाहणार आहेत, लवकरच या योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले .ही...

देव जेवला हो.

Image
 *देव जेवला हो* नुकताच पहिलीत प्रवेश घेतला होता. अवघं सहा वर्षांचं वय. चिंकहिलला प्राथमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आई वडिलांनी मला पंढरपूरला आज्जी जवळ ठेवले होते. मुक्ताबाईच्या मठातली आदर्श प्राथमिक विद्यालय ही माझी शाळा. तिथे गेल्यावर प्रथम आई तात्यांच्या आठवणींनी डोळ्यात आषाढ सरी कोसळत!! घरी आले की कोंडीबाच्या मागे मला चिंकहिलला घेऊन चल असा लकडा लावत असे. कोंडीबा 'चला ताई' असे म्हणत मला धुंडामहाराजांच्या मठापर्यंत नेऊन परत घरी घेऊन येत असे. दर शनिवारी तात्या माझ्या साठी पंढरपूरला येत असत. एकदा ते आल्यावर त्यांना शाळेत नुकतंच शिकवलेलं  *देव जेवला हो देव जेवला* *या या डोळ्यांनी मी पाहिला* हे गाणं नृत्य अभिनय करून दाखवलं. ते भलतेच खुश झाले. मला जवळ घेऊन कौतुक करायला लागले. एकदा शाळेला सलग चार दिवसांची सुट्टी होती. मग ते मला चिंकहिलला घेऊन आले. त्या काळात नुकताच चपट्या गुंडाळणाऱ्या फितीचा रेकाॅर्डर निघाला होता. तो आणून खूप कौतुकानं त्यांनी माझं गाणं रेकॉर्ड केलं.  त्यांना जेव्हा माझी आठवण येत असे तेव्हा ते गाणं ते ऐकत असत. त्यांनी मला 'हे गाणं कुणाचं आहे माहित आहे का?'...

पुढील चार महिन्यानंतर मीच आमदार होणार. अभिजीत पाटील.

Image
 Tital    *पुढील चार महिन्यानंतर मीच आमदार होणार* - अभिजीत पाटील *पंढरपुरात ४०सह भला मोठा हार व हजारोच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गर्दी करून अभिजीत पाटलांचा केला वाढदिवस* *शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे* -  अभिजीत पाटील (वाढदिवसानिमित्त माढा व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला)  प्रतिनिधी पंढरपूर/-   श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत जल्लोषपूर्ण व थाटामाटात वाढदिवस साजरा केला असून यामध्ये त्यांनी दिवसभराच्या भेटीगाठी नंतर, पंढरपूर येथील आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी सर्व समर्थक व कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला.  विधान भवनाचे छायाचित्र असलेला फलक व मोठा केक कापून अभिजीत आबा पाटील व त्यांच्या सर्व कारखान्याच्या संचालक व सर्व समर्थकांनी मिळून वाढदिवस साजरा केला यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मोठी मदत झाल्यामुळे, सर्व आमच्या विठ्ठल परिवारातील समर्थकांना व कार्यकर्त्यांना ऊर्जितावस्था प्रा...

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन.

Image
 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन. पंढरपूर प्रतिनिधी -श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांच्या 39व्या वाढदिवसा निमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कुस्ती स्पर्धा,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महा आरोग्य शिबीर, गोरगरीब जनतेसाठी डोळे तपासणी शिबिर, आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अभिजीत आबा यांनी आपल्या  कुशल नियोजन आणि विकासाच्या दूरदृष्टीने  हजारो युवकांना रोजगानिर्मिती करुन त्यांना स्वावलंबी बनविले आहे. आज संपूर्ण राज्यात सहा साखर कारखाने यशस्वी पणे चालवून सहकारातील एक उत्तम आदर्ष दिला आहे. पंढरपूर येथे डी व्हि पी उद्योग समूह आलिशान मल्टीप्लेक्स थिएटर उभे करुन पंढरीच्या वैभवात भर टाकली, नव्या युगाला साजेसे मॉलयुग आणले, कोरोना काळात स्वखर्चाने हॉस्पिटल उभे करुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविले, हॉस्पिटलना ऑक्सिजन सिलिंडर तयार करून पुरविले . युवापिढी चे आयडॉल, युथ आयकॉन म्हणुन पंढरपूर तालुक्यांत...