क्रंतिदिनी पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने उपोषण, प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार मैदानात.

*क्रांतीदिनी पत्रकार सुरक्षा समितीचे उपोषण प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुन्हा उतरणार रस्त्यावर*

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा  ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना  राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना  राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती  राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले मारहाण धमकी खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या संदर्भात  स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात  पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले अनेक वर्षांपासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत  महाराष्ट्र राज्यात पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण चे प्रमाण वाढले असून राज्यात पत्रकार सुरक्षित राहिलेला नाही  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 

*पत्रकार सुरक्षा समितीचे शुक्रवार  दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन गेट जिल्हा परिषद येथे सकाळी १० वाजता उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे*

*प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पुन्हा रस्त्यावर उतरणार*

 राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष  यशवंत पवार हे नेहमीच  पत्रकारांच्या अडचणीत धावून जाऊन  पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत 

 राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  1 मे कामगार दिन रोजी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांना सोबत घेऊन उपोषण केले होते.

 राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  हे पत्रकारांना सोबत घेऊन शुक्रवार दिनांक 9/8/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर  पुनम गेट येथे पत्रकारांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून उपोषण करणार आहेत.

 राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर सर्वच पत्रकार बांधवांनी  या उपोषणास उपस्थित राहून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याचं आवाहन देखील पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी केलं आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

 

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.