रिअल हिरो, रिअल किंगमेकर श्री उमेश मालक परिचारक.


 रिअल हिरो, रिअल  किंग मेकर श्री उमेश मालक परिचारक.


संख्यात्मक राजकारणाच्या बाजारात गुणात्मक राजकारण आणि समाजकारण यांच्या योग्य समन्वय साधणारे हरहुन्नरी जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे श्री उमेश मालक परिचारक. दि.9ऑगस्ट रोजी उमेश त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सदर लेखप्रपंच 


घरातूनच राजकारण आणि समाजकारण यांचा वारसा लाभलेले उमेश मालक यांनी मोठ्या मालकांसोबत अनेक लोक पाहिले, राजकारणात कायम सावली सारखी साथ त्यांनी मोठे मालक माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना दिली.तसेच माजी आमदार, मोठे बंधू  प्रशांत मालक परिचारक यांनाही राजकीय कारकिर्दीत खूप मोठी साथ दिली. रामाच्या पाठीशी जसा लक्ष्मण होता तद्वतच उमेश मालकांनी कर्तव्य पार पाडले. विविध राजकीय घडामोडी , निवडणुका यशस्वी पणें हाताळल्या,परिचारक घराण्यातील रिअल किंगमेकर, म्हणणे उमेश मालक.


निवडणुका जिंकल्याचा आनंद कार्यकर्ते नेहमीच उत्साहात साजरा करतात. पण ते जिंकण्याचे कसब असणारे, त्यासाठी लागणारी मेहनत, बुद्धिमत्ता पणाला लावणारे उमेश मालक नेहमीच शांत असतात.


मी पणाचा अजिबात लवलेश नसलेले उमेश मालक फार थोड्या लोकांना माहीत आहेत.


 मोठा जनसंपर्क आणि माणस सांभाळण्याची हातोटी त्यांच्यात आहे. मालक अस्सल पंढरपूरकर आहेत. समोरचा माणूस कितीही तणावात असला तरी मालक आपल्या बोलण्याने त्याचे टेन्शन घालवणार.


अनेक राजकीय आणि समाज जीवनातील विनोदी किस्से मालक रंगवून सांगतात. माणूस प्रिय व्यक्तिमत्व ही त्यांची राजकारणा पलिकडची खरी ओळख.निसर्ग आणि शेती यांची तरुण वयापासून मालकाना आवड. खर्डी येथील त्यांच्या शेतात विविध प्रयोग, नवनवीन पिके,फळझाडे त्यांनी लावली आहेत. ऊस,द्राक्ष, डाळींब, केळी,आंबा,स्ट्रॉबेरी,आवळा,पपई आदी फळझाडे हमखास शेतात दिसून येतात. ही झाडे खुद्द मालकांनी लावली आहेत.


ग्रीन हाऊस मधील फुलशेती, येथील जरबेरा व ईतर फुले निर्यात होतात .


ऊस उत्पादन आणि साखर कारखानदारी यांची अत्यंत चिकित्सक व सखोल अभ्यास असलेले उमेश मालक जिल्ह्यात एकमेव असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही.

दाखविला.

आपल्या बरोबर ईतर शेतकऱ्यांना ही प्रयोगशील शेती करण्याचे प्रोत्साहन त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना दीले आहे.


परोपकार, दिलदार वृत्तीने समाजातील सर्व क्षेत्रात त्यांचे असंख्य मित्र आहेत.


अनेकांना ठाऊक नसेल पण मालक उत्तम वाचक आहेत.


एवढ्या बिझी शेड्युल मध्ये वेळ काढून अनेक महापुरुषांची चरित्रे,आत्मकथा, कादंबऱ्या वाचल्या आहेत,


तालुक्यात विकासाचे राजकारण करताना अनेक संस्था, पतपेढी उभ्या करून हजारो युवकांना,शेतकऱ्यांना, कामगारांना रोजगार मिळवून दिला. वाहतूक संस्था, पंढरपूर तालुका दूध उत्पादक संघ, सहकारी सोसायट्या आदी माध्यमातून हजारो लोकांना काम दीले.


२०१० साली बिल्डर्स अँड डेवलपर्स या नवीन व्यवसायात प्रवेश करून अल्पावधीत मोठी झेप घेतली. पंतनगर सारखा उत्कृष्ठ व देखणा गृहप्रकल्प केला. या क्षेत्रात जागा विकसित करून पंढरपूर शहराच्या वैभवात भर टाकली.


विविध क्लिष्ट सोपस्कार टाळून युवकांना त्वरित कर्ज मिळवून देण्यासाठी कर्मयोगी पतसंस्था स्थापन केली. या माध्यमातून १०० कोटी पेक्षा जास्त व्यवसाय होत आहे.


पांडुरंग साखर कारखाना पंढरपूर तालुक्यापासून दूर असूनही ईतर कारखान्याच्या पेक्षा जास्त दर मिळवून दिला.


अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे अत्याधुनिक युटोपियन शुगर्स, हा साखर कारखाना निर्माण केला.


एवढे प्रगत तंत्रज्ञान वापरून कारखाना यशस्वीरित्या चालविला आहे की साखर कारखाना दारीतील अनेक तज्ज्ञ व तंत्रज्ञ उमेश मालकांचा सल्ला घेण्यासाठी येतात.


निसर्गाची आवड असल्याने ते वनीकरण,वृक्षारोपण, संवर्धन यात रमतात. यामुळेच कदाचित त्यांचे राहणे, वागणे सहज, सुलभ असते. आणि हेच लोकांना भावते,आवडते.


कसलाही प्रश्न असू द्या, मालक तो सोडविणारच या विश्वासानेच लोक त्यांच्याकडे येतात.


तालुक्यातील गरीब जनतेचे कैवारी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


समाजातील सर्व घटक, बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असते.


यामुळेच २००६ साली जेव्हा नदीला पूर आला होता त्यावेळी गाडीतून मंगळवेढा कडे जाताना पुरात बुडणाऱ्या एका युवकाला मालकांनी वाचविले, पाणी वर येऊ लागल्याने हा तरुण एका मंदिराच्या शिखरावर बसून अडकून पडला होता.


यावेळी पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्या युवकाला जीवदान दिले.


संकट काळात पहिली आठवण येते ती परिचारक घराण्याची .

मागील वर्षी ची एक घटना आहे,तालुक्यातील ग्रामीण भागातील काही लोक मुलीला साप चावल्याने जीप करुन वाड्यावर आले,

तेव्हा रात्रीची उशिराची वेळ असूनही उमेश मालकांनी शक्य तेवढी मदत केली.

दुसऱ्या दिवशी ती माणसं मालकांच्या एका कार्यकर्त्याला भेटली,

आणि त्याने त्या मुलीची विचारपूस केली तेव्हा ,

ती लोक म्हणाली, खरं तर आम्ही मालकाच्या विरोधी पार्टीतील माणसं, लई तरास दिला आम्ही त्यांना, पण अशा संकटकाळात जायचे कुठे हेच कळेना, मग वाड्यावर आलो, मालकांनी लई मदत केली .

 असे हे परोपकारी वृत्ती चे परिचारक घराणे, उमेश मालक पण हाच समृध्द वारसा चालवीत आहेत.

आज दि 9ऑगस्ट मालकांचा वाढदिवस 

श्री उमेश मालक परिचारक यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

आगामी यश आपलेच आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.