रक्षाबंधन सणासाठी येणाऱ्या बहिण भावावर काळाची झडप, भीषण अपघातात दोघे जागीच ठार.
रक्षाबंधन सणासाठी येणाऱ्या बहिण भावावर काळाची झडप, कार अपघातात दोघे जागीच ठार.
पंढरपूर – नियती कधी कधी अत्यंत निष्ठुर होते,
उद्या असणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिणीस कारमधून घेऊन येणाऱ्या भाऊ आणि बहीण यांच्यावर सणाआधीच मृत्यने झडप घातली.मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत कासार मळा येथे स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बहीण भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता हा अपघात झाला आहे.
रक्षाबंधनासाठी बहीण ऋतूजा पुण्याहून खास सणासाठी आली होती.अपघातातील मयत ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या राखीपौर्णिमा सणासाठी ती एस टी बसने पंढरपूरला आली होती. भाऊ रोहित जाधव हा तिला आणायला गेला होता. तिला कारमधून घेऊन मंगळवेढा येथे घरी निघाला असता काळाने घाला घातला.
पंढरपूर हून मंगळवेढा कडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच १३ बी एन ६६४९ ची पंढरपूर कडे येत असलेला आयशर टेंपो आर जे ३६ जी ए ८९७१ शी समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट मधील बहीण भाऊ
या भीषण अपघातात भाऊ रोहित तात्यासो जाधव वय 25,बहिण ऋतुजा तात्यासो जाधव वय 19 दोघे रा. मंगळवेढा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना त्वरीत पंढरपूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचाराआधीच डॉ नी ते मृत पावले असल्याचे सांगितले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment