घोटी येथे माजी शालेय विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहसंमेलन, जुन्या आठवणींना उजाळा.

घोटी गावात शालेय जून्या मित्र मैत्रिणींचे स्नेहसंमेलन.


घोटी प्रतिनिधी -

शालेय अवखळ अल्लड जीवनातील निरागस मैत्री, शिक्षक, शिक्षिका यांच्याविषयी असणारे नाते कोण बरे विसरेल,

अशाच नातेसंबंधांना उजाळा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील घोटी या गावात ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या वतीने 

सुमारे 42वर्षानंतर गेट टुगेदर, म्हणजेच जून्या मित्र मैत्रिणींचे स्नेसंमेलन शुक्रवार दी 16ऑगस्ट रोजी दहिदुधाळ येथे आयोजीत करण्यात आले होते.

घोटी येथील जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेतलेल्या 1970पासूनचे मित्र मैत्रिणी अत्यंत उत्साहाने या मैत्रीच्या सोहळ्यात सहभागी झाले होते.

घोटी भागातील दही दुधाळ या महादेवाच्या मंदिरात 

हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या रम्य परिसरात सुंदर तळ्याकाठी अनेकांनी शालेय जीवनातील अनोख्या आठवणींना, विनोदी किस्से, शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा उजाळा घेऊन मन पुन्हा एकदा त्या सुखद काळातील रम्य रमणीयातेत नेले.

ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या माध्यमातुन अध्यक्षा सौ जयश्री घाडगे व सहकारी घोटी गावाचा सर्वागीण विकास, जि प शाळेस भरीव मदत करीत आहेत.

त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास  घोटितील पूर्वीचे रहिवासी, हितचिंतक सर्वतोपरी मदत करीत आहेत.

करमाळा व माळशिरस तालुक्याचे गट विकास अधिकारी व घोटी गावचे आदर्श सुपुत्र मनोज राऊत, पुणे येथील इंजिनीयर कानिफनाथ राऊत, डॉ तुकाराम झगडे, अनिल थोरात, हिराजी राऊत

अजित राऊत, जयश्री घाडगे, पंढरपूर येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक एकनाथ ननवरे, इंदापूर येथील ऑटोमोबाईल उद्योजक प्रकाश बलदोटा , सुहास बलदोटा, विकास बलदोटा,

मनीषा अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ तुकाराम झगडे यांनी शालेय जीवनात किती संघर्ष करत डॉ पदापर्यंत त्यांनी मारलेली मजल हा प्रवास अनेकांचे डोळे अश्रूंनी भरणारा होता.

खरचं त्यांच झगडे हे आडनाव सार्थ आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे दुधे गुरुजी, कोरे, डोळे बाई, आदलिंगे गुरुजी, आदलींगे बाई, देवकर गुरुजी, मोमीन बाई 

या मान्यवरांचे पाद्यपूजन 

करून सुरुवात कऱण्यात आली.

या अनोख्या सत्काराने माजी शिक्षक भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय परंपरे प्रमाणे गुरूंच्या पाद्यपुजनाने झाली..दीपप्रज्वलन ,प्रास्ताविक ऋणानुबंध फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ जयश्री घाडगे यांनी केले.सर्व माजी शिक्षक यांनी त्यांच्या मनोगत मध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला..घोटी गावचे सुपुत्र मनोज राऊत BDO साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने प्राथमिक शाळा घोटी चे माजी विद्यार्थी मेहनत घेत होते...या मध्ये  उपाध्यक्ष प्रकाश बलदोटा, सचिव अनिल थोरात,  विठ्ठल म्हेत्रे (मेजर) अजितसिंह राऊत,वैशाली अवघडे अंबादास खरात,विमल म्हेत्रे,सुरेखा मेढे,रेवणनाथ पाटील,साधना राऊत,शैला नवले,आशा म्हस्के ,लता बोराडे, कांतीलाल पाटील,प्रल्हाद ननवरे, सुरेंद्र पाटील,रमेश ननवरे,नवनाथ राऊत, डॉ तुकाराम झगडे,राजाराम दुधे,विकास बलदोटा, हिराजी राऊत,तुषार राऊत,यांनी मेहनत घेतली.. कार्यक्रमात पंढरपूर येथील अन्नदाते सह सचिव एकनाथ ननवरे व आशा ननवरे यांनी सुग्रास भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.

या कार्यक्रमात पंढरपूर येथील चैतन्य उत्पात,. महेश उर्फ आदिक राऊत,

महादेव राऊत, प्रवीण कुलकर्णी, प्रसाद पाठक शशिकांत हरदाडे, सुरेखा मेढे, सुशीला शेरतोटे , आशा म्हस्के, सुनीता धोंडे, अलका कोकाटे, मंगल आदलिंगे, आशा ननवरे, सुजाता नन वरे, लक्ष्मी ननवरे, सुकन्या ननवरे, छबाबाई घाडगे, लता बोराडे, राणी क्षीरसागर, शैलजा जवळे, महानंदा लावंड , कमल काळे, राणी बदर, कल्पना राऊत, कौशल्या शेंडे, साधना राऊत, रेवती म्हेत्रे, विमल म्हेत्रे, रूक्मिणी म्हेत्रे, मैना दाभाडे, लता झगडे, अनिता चव्हाण, सुनंदा राऊत, गुलछडी जाधव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्र संचालन प्रा.चांगदेव कळसाईत 

प्रास्ताविक सौ जयश्री घाडगे

आभार प्रदर्शन अंकिता ननवरे यांनी केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

 

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.