मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भव अभियानाचा आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते शुभारंभ.
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्मान भव:अभियानाचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते शुभारंभ मंगळवेढा (प्रतिनिधी): जगातील सर्वात मोठ्या हेल्थकेअर आयुष्मान भव: योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आरोग्य विभागाने सेवातत्पर रहावे अशा सूचना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या आहेत. आयुष्मान भव: या आरोग्य सप्ताह अभियानाचा शुभारंभ आमदार आवताडे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी आमदार आवताडे हे बोलत होते. पुढे बोलताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, १३ सप्टेंबर पासून देशात 'आयुष्मान भवः' मोहिमेस सुरुवात झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवर या मोहिमेचा शुभारंभ केला. देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली आयुष्मान भव: मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभर पसरत आहे. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी 'आयुष्मान भव:' ही महत्वांकाक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जा...