दुचाकीच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू.


 दुचाकीच्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील कराड रोडवर सरकारी गोडाऊन जुना कराड नाका परिसरात मोटरसायकल धडकून झालेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत.

शहर पोलिस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि २८सप्टेंबर रोजी रात्री पावणे एक वाजता गीतांजली उर्फ पिंकी आनंद सोमासे या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आपले हॉटेल बंद करून पती व दोन लहान मुले यांच्या बरोबर मोटारसायकल (एम एच १३, ए एन ३३२० )वरून गाताडे प्लॉट येथील आपल्या घराकडे येत असताना कराड नाक्याकडून  येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरून वेगात येणाऱ्या ओंकार सुर्यवंशी (रा.पुणे,) दुचाकी क्र.(एम एच १३, इ ए ९३८६) याची जोरदार धडक बसल्याने गीतांजली उडून पडल्या, या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाल्याने त्यांचा पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात गीतांजली यांचे पती आनंद मुलगी राजनंदिनीं, मुलगा राजशेखर जखमी झाले.

उप जिल्हा रुग्णालयातील सिस्टर धिंगे यांनी फिर्याद दाखल केली असून सपोनी सोनकांबळे आधीक तपास करीत आहेत.

पंढरपूर शहर व परिसरात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

रस्ते गुळगुळीत असल्याने सर्व प्रकारची वाहने सुसाट वेगाने धावत असतात.

या आठवड्यात दोन महाविद्यालयीन युवकांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.