पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.
पंढरपूर येथे भर मध्यवस्तीत सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांची धाड, तीन महीला अटकेत. प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर येथील उच्चभृ लोकांची वस्ती असणाऱ्या महावीर नगर परिसरात एका पडीक बंगल्याच्या आवारात सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय वर पोलीसांनी धाड टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार दि.14ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कऱण्यात आली. यातील दोन महीला सोलापूर येथील असुन एक महीला पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावची आहे. महावीर नगर येथे अनेक वर्षापासून एक पडीक बंगला होता, या बंगल्याच्या आवारात तीन महीला अवैध वेश्याव्यवसाय करीत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग व निर्भया पथकाच्या पोलिसांना मिळाली, यावरुन सदर कारवाई करून तीन महिलांसह त्यांना मदत करणाऱ्या दोन पुरुषांना देखील अटक कऱण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून हे अनैतिक प्रकार येथे चालू होते पंढरपूर येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके,. निर्भया पथकाच्या पोलीस निरिक्षक मोनिका खडके, डी बी पथकातील विजय गायकवाड, सचिन इंगळे, नवनाथ माने,शहाजी मंडले, समधान माने यांच्या पथक...

Comments
Post a Comment