डॉ प्राजक्ता बेणारे यांची भा ज पा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड.


 पंढरपूर येथील डॉ प्राजक्ता बेणारे  यांची भा ज प महीला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील डॉ प्राजक्ता बेणारे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा सोलापूर नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

माजी आमदार  श्री प्रशांत परिचारक,उपमुख्यमंत्री श्री  देवेंद्र फडणवीस, भा ज पा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे,  सौ चित्रा वाघ,  अक्कलकोट चे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूर - मंगळवेढा चे आमदार श्री समाधान दादाआवताडे यांच्या विचार विनिमयातून निवडी करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंगळवेढा येथील सुदर्शन मसु यादव,

अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष पदी पंढरपूर येथील प्रा. चांगदेव कांबळे, ओ बी सी मोर्चा (ग्रामीण) अध्यक्षपदी मंगळवेढा येथील विवेक खिलारे, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी अक्कलकोट येथील फैजमहंमद गणी कोरबू , किसान मोर्चा अध्यक्षपदी दक्षिण सोलापूर येथील जगन्नाथ गायकवाड, भटके विमुक्त अध्यक्षपदी मोहोळ येथील शशिकांत गावडे, तर आदिवासी मोर्चा अध्यक्ष पदी मोहोळ येथील ज्ञानेश्वर भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ प्राजक्ता बेणारे या मागील तीन वर्षांपासून पंढरपूर शहर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. तसेच शहर उपाध्यक्ष या पदावर देखील त्यांनी कार्य केले होते. उत्तम संघटन कौशल्य, उत्कृष्ठ नेतृत्व या गुणांमुळे जिल्हा पातळीवर कार्य करून कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीच्या वृत्ताने सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.