श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन.


 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सव संगीत महोत्सवाचे आयोजन बुधवार दि २० ते मंगळवार दि.२६ सप्टेंबर या कालावधीत  येथील श्री संत तुकाराम भवन येथे करण्यात आले आहे.

बुधवारी स्वरविठ्ठल हा अभंगवाणी कार्यक्रम पंढरपूर येथील वैभव केंगार, राम अनवते, सोपान मोरे हे सादर करणार आहेत.

गुरुवार दि२१ रोजी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाकलाविष्कार असणारा, मराठमोळी परंपरा, हा कार्यक्रम मुंबई येथील कलारंजन प्रस्तुत उदय साटम सादर करणार आहेत. शुक्रवार दि २२ रोजी शास्त्रीय गायन उमरगा येथील संगीत विशारद विजयकुमार बनसोडे , हे सादर करणार आहेत.

शनिवार दि.२३ रोजी पुणे येथील ख्यातनाम सिनेअभिनेत्री,नृत्यांगना बिनधास्त, फेम शर्वरी जमेनीस , कथ्थकरंग हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे.

रविवार दि २४ रोजी स्व. गायिका  लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी इंद्रधनुषी गीतांची मुक्त उधळण असणारा, भावलता हा कार्यक्रम पुणे येथील मालविका दीक्षित व मनीषा निश्चल या सादर करणार आहेत.

सोमवार दि २५ रोजी भक्तिरंग हा कार्यक्रम पुणे येथील पं अजय चक्रवर्ती व पं अनुप जलोटा यांचे शिष्य अमोल निसळ हे सादर करणार आहेत.

शेवटच्या दिवशी मंगळवार दि २६ रोजी स्वर ज्ञानेश्वरी हा कार्यक्रम इंडियन आयडॉल फेम ज्ञानेश्वरी गाडगे, मुंबई होणार आहे.

तरी सर्व रसिक श्रोते व श्री गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र शेळके , मंदिरे समिती सह  अध्यक्ष ह भ प  गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले आहे. हे सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ७:३० ते १० या वेळेत होतील.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.