माजी नगराध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड यांचे निधन.
माजी नगराध्यक्ष ,व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड यांचे निधन
पंढरपूर( प्रतिनिधी )--
पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, पंढरपूर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड
( वय ७८ ) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. पंढरपूर माहेश्वरी सभा, डोंगरे महाराज अन्नछत्र, मूकबधिर विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, गोरक्षण यासह अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे ते अत्यंत निकटचे, विश्वासू सहकारी होते.पंढरपूर नगरपालिकेचे नगराधयक्ष म्हणून त्यांनी १९९२- ९३ साली काम पाहिले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कै. भट्टड यांच्या पार्थिवावर उद्या (ता १३) सकाळी साडेआठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment