Posts

Showing posts from August, 2023

मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

Image
 मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अभिजीत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट *मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकांसाठी मागितला भरघोस निधी* *उपसा सिंचन योजनेची जबाबदारी घेतली अभिजीत पाटील यांनी खांद्यावर* पंढरपूर(प्रतिनीधी) मंगळवेढ्यातील ३५ गावच्या  उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दि.३१ ऑगस्ट२०२३ रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.अजितदादा पवार यांना भेटून उपसा सिंचन तात्काळ मार्गी लावण्याची विनंती केली तसेच मंगळवेढातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी मागणीचे निवेदन ही दिले आहे.   मंगळवेढातील ३५ गावांपैकी २४ गावांची उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून उर्वरित गावे तांत्रिक बाबींमुळे शासनाच्या लाल फितीत अडकल्या असल्याने उपसा सिंचन योजनातील त्रुटी पूर्ण करून अर्थमंत्री या नात्याने उपसा सिंचन योजनेसाठी भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी अभि...

आ. समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून एस टी च्या १६ फेऱ्या वाढविल्या.

Image
 आ आवताडे यांच्या प्रयत्नांतून एस. टी.महामंडळाच्या १६ नवीन फेऱ्या पंढरपूर  प्रतिनिधी - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विविध गावांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून एस.टी.गाड्यांच्या नवीन १६ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान या नवीन गाड्यांच्या फेऱ्या सुरु होण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आ आवताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्क व प्रवास सुविधेचे प्रभावी माध्यम म्हणून लालपरी गाव-खेड्यातील नागरिकांशी आत्मीयतेचे नाते टिकवून आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून या फेऱ्या सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. पवित्र श्रावण महिन्यातील पुरुषोत्तम अधिक मास हा मंगल महिना सगळीकडे साजरा होत आहे. या महिन्याच्या निमित्ताने अनेक महिला-भगिनी राज्यभर देवदर्शनासाठी जात असतानाच या फेऱ्या सुरु झाल्याने भाविकांची व शालेय विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय होणार आहे. आ आवताडे यांच्या म...

चेअरमन अभिजीत पाटील यांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली.

Image
 *जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चेअरमन अभिजीत पाटील यांचा पुढाकार* पालकमंत्री ना. विखे पाटील यांची भेट घेत पंढरपूर मंगळवेढा भागात चारा डेपो सुरू करण्याची केली मागणी पंढरपूर  ( प्रतिनिधी) सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र बिकट अवस्था झाल्याने जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दि.३०ऑगस्ट रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले. तसेच पाण्यामुळे पिके करपू लागली आहेत. भिमा नदी पात्र कोरडे असुन नदी व कॅनोलला पाणी सोडावे याबाबत ही चेअरमन अभिजीत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. येत्या दोन दिवसांत बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले असून सकारात्मक विचार होईल असा विश्वास व्यक्त केला. कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी आहोत.. चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी प्रयत्न करीन आहोत असे अभिजीत पाटील यांनी बोलताना सा...

खा. सुप्रिया सुळे यांनी बांधली अभिजीत पाटील यांना राखी.

Image
 रक्षाबंधनच्या निमित्ताने पवार आणि अभिजीत पाटील नाते अधिक मजबूत *सुप्रिया सुळे यांनी चक्क चेअरमन अभिजीत पाटलांच्या हातावर बांधली राखी* पंढरपूर  (प्रतिनिधी) राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीत दोन भाग पडले होते. अशातच विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठेने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतीत मिळालेले फलित म्हणून थेट अभिजीत पाटील यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खा.सुप्रिया सुळे यांनी राखी बांधले असल्याने निष्ठा मजबूत झाली आहे. ही राखी म्हणजे पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  अभिजीत आबा पाटील मुंबई यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी अभिजीत पाटील यांना राखी बांधली आहे. राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीत सत्तेकडे न झुकता केवळ पवार यांच्यावर मनापासून निष्ठा ठेवली आहे. यामुळे अवघ्या सोलापूर जिल्ह्यातील पवार गटाची महत्वाची जबाबदारी चेअरमन यांच्यावर येणार असून पंढरपूर हे स...

स्वेरीच्या २३ विद्यार्थ्यांची रिलायन्स फार्मासुटिकल्सकंपनीत निवड.

Image
 स्वेरी फार्मसीच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या कंपनीत निवड पंढरपूर-( प्रतिनिधी) ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मधील तब्बल २३ विद्यार्थ्यांची ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.          फार्मसी क्षेत्राशी संबंधीत असलेल्या आणि मुख्य शाखा अहमदाबाद (गुजरात) येथे असलेल्या  ‘रिलायन्स फार्मास्युटिकलस्’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने अंतिम फेरीतून फार्मसी विभागातील सागर भाऊसाहेब बेलदार, प्रमोद बाबू बिराजदार, प्रशांत शिवाजी दुधभाते, गंगासागर अशोक गोरंटी, केदारनाथ हनुमंत काकडे, ओंकार ज्ञानदेव काकडे, सुरज रामकृष्ण काळे, नागेश नवनाथ खाडे, संकेत बाळासाहेब खंदारे, अजित दाजी खिलारे, अभिषेक रावसाहेब मगर, परवेज प्यारेलाल मुजावर, प्रज्वल अण्णा नागणे, विश्वजीत राजकुमार पाटील, ऋत्विक शिवाजी पिंगळे, सिद्धेश्वर विठ्ठल रोंगे, सिद्धेश्वर सुनील साखरे, प्रभू हनुमंत साठे, रोहन रा...

लग्न करून देत नाही, म्हणून मुलाची वडिलांना बेदम मारहाण.

Image
लग्न करून देत नाही, म्हणून मुलाची वडिलांना बेदम मारहाण.  पंढरपूर  (प्रतिनिधी )- पंढरपूर  येथील एका युवकाने वडील आपले लग्न लावून देत नाहीत या कारणावरून चिडून बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुलास अटक करण्यात आली आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भुजबळ यांनी माहिती दिली. गोपीचंद उर्फ जितू हुकूम कदम( वय,२८ , रा. भगवाननगर,पंढरपूर) या युवकाने रविवार दि२७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडील हुकूम माणिक कदम( वय,५६ रा. भगवाननगर,पंढरपूर) यांना, तुम्ही माझे लग्न करून देत नाही, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत शहाबादी फरशी तुकड्याने व लाकडी फळीने बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर जबर मार लागला असून उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पंढरपूर शहर पोलिसांनी  मुलगा गोपीचंद कदम यास अटक केली असून सोमवारी कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी  कलम ३०७ लावण्यात आले असून हत्येचा प्रयत्न अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास स पो नि प्रकाश भुजबळ करीत आहेत. ...

लंपीचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांत जनजागृती करावी.- तहसीलदार सुशील बेल्हेकर.

Image
 लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करावी                                                                              - तहसिलदार सुशिल बेल्हेकर पंढरपूर (प्रतिनिधी): तालुक्यात सध्या काही भागात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असून, पशुपालकांनी  याबाबत वेळीच काळजी घ्यावी. तसेच आजाराचे प्राथमिक लक्षणे ,त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत  पशुसंवर्धन विभगगाने पशुपालकांमध्ये जनजागृती करावी.व्यापक जनजागृतीसाठी समाजिक माध्यमांचाही वापर करावा अशा सूचना तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिल्या. शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे लम्पी  रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व करावयाच्या उपाययोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस.एस भिंगारे ,पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.प्रियंका जाधव...

तावशी येथे घरावर धाडसी दरोडा.

Image
 तावशी येथे घरावर धाडसी दरोडा. पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ वाजून ४५मिनिटांनी गणेश सुभाष आसबे यांचे राहते घरी चोरट्यांचा धाडसी दरोडा पडला . गणेश असबे हे नोकरी निमित्त अमरावतीला असतात त्यांचे घरी त्यांची पत्नी सौ करिष्मा आसबे व आई कस्तुरा असबे या दोघीच घरी असतात सदर घटनेवेळी करिष्मा असबे या भांडी घासत असताना त्यांचे तोंड दाबून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू अंदाजे तीन तोळे त्यामध्ये अडीच अडीच ग्रॅमच्या दोन अंगठ्या पाच ग्रॅमची एक अंगठी एक ठुशी व मंगळसूत्र असा एकूण तीन तोळे सोने लंपास केले संध्याकाळी पावणे नऊ वा. पडलेल्या दरोडेने ग्रामस्थ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर दरोडे ची बातमी ग्राम सुरक्षा दलाच्या मार्फत आले असता शेकडोंच्या संख्येने जमाव गणेश आसबे यांच्या घराकडे जमा झाला . घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार सचिन आटपाडकर प्रशांत शिंदे यांचे यांचे सह तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोच झाले . इतक्या लवकर हा धाडसी दरोडा पडल्याने ग्रामस्थांसह पोलिसहि चक्रावले आहेत . ...

धाडस आणि परिश्रमाने यश नक्की मिळते.- अभिजीत पाटील.

Image
 धाडस आणि परिश्रमाने  यश नक्की मिळते                                                     -चेअरमन व उद्योजक  अभिजित पाटील. ‘माझी उद्योजक जगतातील वाटचाल’ या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन  पंढरपूर-(प्रतिनिधी) ‘क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी व्हायचे असेल तर खडतर परिश्रम हे करावेच लागतात. शिक्षण घेत असताना  ‘आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो’ या भावनेने मी माझे सामाजिक कार्य सुरू केले आणि मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीत वेळप्रसंगी उचललेल्या धाडसी पावलांमुळे मला यश मिळत गेले. कोरोनाच्या काळात आईच्या आजारामुळे ऑक्सिजनचे महत्त्व समजले. परिस्थिती बिकट होती म्हणून त्या परिस्थितीत ऑक्सिजनमुळे कोणी माणूस कुटुंबापासून दुरावू नये यासाठी सर्वप्रथम रुग्णालये स्थापन केली आणि त्यात मोफत उपचाराची सोय केली. तेंव्हापासून माझी ऑक्सिजनमुळे नव्याने ओळख निर्माण झाली. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर परिश्रमाबरोबरच सोबतीला धाडस हा गुण देखील महत्वाचा ...

शालेय जीवनातील धेयनिश्चिती हाच यशाचा धागा.- रोहिणी बानकर.

Image
 *शालेय जीवनातील ध्येय निश्चिती हाच यशाचा पाया- रोहिणी बानकर पंढरपूर (प्रतिनिधी) शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने कठोर परिश्रम व मेहनतीने सातत्याने पुढे जात राहणे हाच यशाचा पाया असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले त्या विनादप्तर शाळा उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे बोलत होत्या.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे होते . विचारपीठावर संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष गुळवे ,प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे  सहशिक्षक  संजय कुलकर्णी,सीमा बाबर हे  उपस्थित होते . यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की स्पर्धा परीक्षांचा पाया हा शालेय शिक्षणात असून चांगली सुसंगती शालेय वयात असेल तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास निश्चित होतो.तंत्रज्ञानाचा संधी म्हणून आपण  योग्य वापर केला पाहिजे . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्...

पंढरीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायी, वासरांना जीवदान.

Image
 पंढरीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायी, वासरांना मिळाले जीवदान. हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने केली कारवाई. पंढरपूर (प्रतिनिधी)श्री शिवप्रतिष्ठान,हिंदुस्तान आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी शुक्रवार दी.२५ ऑगस्ट रोजी पहाटे  कत्तलखान्यात नेण्यात येणार २६ जनावरे पोलिसांच्या सहकार्याने पकडुन मुक्या जीवांची सुटका केली. पंढरपूर येथे पहाटे ही कामगिरी करण्यात आली.  एम एच ४२  एम ४२७६ या टेंपो मधून फलटण तालुक्यातील कत्तलखान्यात  कत्तली साठी २२ वासरे व ४ गाईंना नेण्यात येत होते. पंढरपूर मध्ये पकडून अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले यात एक गाई मृत्य पावली. या वेळी कारवाई साठी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब, पोलीस निरीक्षक अरुण फुगे साहेब, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत , पोलीस हेडकॉन्स्टेबल बिप्पीनचंद्र ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल कांबळे,  पोलिस कॉन्स्टेबल अंकुश माळी या प्रशासनातील मंडळी ने चे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले . ही कारवाई गोरक्षक करणं धोत्रे, धनाजी ताड, शिवम वाघमारे, सुनील काका अभंगराव, अवधूत घाटे, शुभम पवार सौरभ थिटे,, राम काळे, आदित्य रण...

शासन आपल्या दारी, उपक्रमाच्या जागेची पाहणी.

Image
 शासन आपल्या दारी उपक्रमाच्या जागेची पाहणी             शासन आपल्या दारी हा उपक्रम पंढरपूर येथे दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी होणार पंढरपूर (प्रतिनिधी): विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे  जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून पंढरपूर येथील वाखरी हद्दीतील वाखरी-कोर्टी बाह्यवळणरस्ता येथील जागेची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.  शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी किमान ३०ते ३५हजार लाभार्थी येणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान शासकीय योजनांची माहिती देणारे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत.  सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यस्थळी वॉटरप्रुफ मंडप उभारणी, आसन व्यवस्था, वाहनतळ, आरोग...

संभाव्य पाणीटंचाईबाबत उपाययोजना कराव्यात.- प्रांताधिकारी गजानन गुरव.

Image
 संभाव्य पाणी टंचाईबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात                                                                       प्रांताधिकारी गजानन गुरव            पंढरपूर, -( प्रतिनिधी):- सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा 13.50 टक्के इतका आहे. सद्य:स्थितीत भीमा नदी पात्रातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे. या नदीपात्रातून सांगोला , पंढरपूर नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील कासेगांव व शिरभावी पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा केला जातो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता संबधित यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.              पाणी टंचाई व पाणीपुरवठा व्यवस्थापनाबाबत प्रांताधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसिलदार सुशिल बे...

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी २५१५ प्रलंबित योजनेतून प्रलंबित असणारा १ कोटी रुपये निधी मंजूर- आ. समाधान आवताडे.

Image
 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी २५१५ योजनेतून प्रलंबित असणारा १ कोटी निधी मंजूर - आ आवताडे  पंढरपूर  (प्रतिनिधी)  ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेत वाढ होऊन सार्वत्रिक विकास होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या २५१५ योजनेतून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील २३ गावांसाठी मंजूर असलेला परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये प्रलंबित असणारा १ कोटी विकास कामांच्या निधीला ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. राज्यातील गावांतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या विकास पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये २५१५ या  योजनेअंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांच्या धोरणात्मक विकासासाठी निधीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तदनंतर  राज्यामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आ.आवताडे यांनी या निधीस...

पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई.. पाच लाख ४३ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या दुचाकी जप्त. दोन चोरटे जेरबंद.

Image
 पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई;  पाच लाख ४३ हजार रुपये किमतीच्या १५ मोटरसायकल  जप्त, दोन संशयित चोरट्यांना अटक.           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगीरी करत गुप्त माहितीदाराच्या मदतीने  पाच लाख ४३ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या १५ दुचाकी जप्त करून दोन भुरट्या चोरास गजाआड केलं आहे,  योगेश सोमनाथ गुटाळ, रा, पटवर्धन कुरोली, ता. पंढरपूर आणि अनंत मसू कांबळे . रा.आवे. ता. पंढरपूर यांना जेरबंद करण्यात आले आहे.पोलिसांनी चोरीच्या पंधरा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत, पंढरपूर शहर परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, चोरीच्या वाढत्या घटना पाहता दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पंढरपूर परिसरात वावर असल्याची शक्यता शहर परिसरातील नागरिकांना होत होता.पण पोलिसांना गुंगारा देत हे दुचाकी चोर राजरोसपणे दुचाकी चोरून त्याची विक्री करत होते. अखेर शहर पोलिसांच्या पथकाने बारकाईने तपास करून दुचाकी चोरीस जाणाऱ्या परिसराची पाहणी करून सूक्ष्म निरीक्षण करत गुप्त माहितीच्...

रिअल किंगमेकर - श्री उमेश मालक परिचारक.

Image
 रिअल कींगमेकर -उमेश मालक परिचारक. संख्यात्मक राजकारणाच्या बाजारात गुणात्मक राजकारण आणि समाजकारण यांच्या योग्य समन्वय साधणारे हरहुन्नरी जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे श्री उमेश मालक परिचारक. दि.२१ ऑगस्ट रोजी उमेश त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त सदर लेखप्रपंच  घरातूनच राजकारण आणि समाजकारण यांचा वारसा लाभलेले उमेश मालक यांनी मोठ्या मालकांसोबत अनेक लोक पाहिले, राजकारणात कायम सावली सारखी साथ त्यांनी मोठे मालक माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना दिली.तसेच माजी आमदार, मोठे बंधू  प्रशांत मालक परिचारक यांनाही राजकीय कारकिर्दीत खूप मोठी साथ दिली. रामाच्या पाठीशी जसा लक्ष्मण होता तद्वतच उमेश मालकांनी कर्तव्य पार पाडले. विविध राजकीय घडामोडी , निवडणुका यशस्वी पणें हाताळल्या,परिचारक घराण्यातील रिअल किंगमेकर, म्हणणे उमेश मालक. निवडणुका जिंकल्याचा आनंद कार्यकर्ते नेहमीच उत्साहात साजरा करतात. पण ते जिंकण्याचे कसब असणारे, त्यासाठी लागणारी मेहनत, बुद्धिमत्ता पणाला लावणारे उमेश मालक नेहमीच शांत असतात. मी पणाचा अजिबात लवलेश नसलेले उमेश मालक फार थोड्या लोकांना माहीत आहेत.  मोठा जनसंपर्क आणि मा...

पंढरीत जागतिक छायाचित्रकारदीन साजरा करण्यात आला.

Image
 पंढरीत जागतिक छायाचित्रकार दीन साजरा. पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्ताने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. फोटोग्राफिक क्षेत्रातील डिझायनर, लॅब ऑपरेटर, पोस्ट प्रोडक्शन, करणाऱ्या कलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे,  मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी सभापती विजयसिंह देशमुख, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी व कॅमेरा पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. फोटोग्राफर विकास मंचाचे बशीर शेख यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. त्यानंतर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. तसेच सम्राट भाळवणकर, रविकिरण जोशी, आणि योगेश आराध्ये यांना फोटोविश्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ पुष्पहार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.  आम्ही स्वतः फोटोग्राफ...

सोनके तलावात लवकरात लवकर पाणी सोडा, अन्यथा आंदोलन.- चेअरमन अभिजीत पाटील.

Image
 सोनके तलावात लवकरात लवकर पाणी सोडावे अन्यथा आंदोलन करणार :-  चेअरमन अभिजीत पाटील पंढरपूर (प्रतिनिधी) सोनके तलाव लवकरात लवकर भरून घ्यावा यासाठी मा.जलसंपदा विभाग पंढरपूर येथील अधिकारी यांना राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित निवेदन दिले. माझा बळीराजा शेतकरी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या शेतात सोनं पिकवतो आणि पाण्यावाचून पिकं डोळ्यासमोर जळून जातात.त्यामुळं निरा भाटघर कालव्यातून सोनके तलाव भरुन मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला... यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल,शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक नेते सचिन आटकळे, पिराजी कुरोली चे माजी सरपंच कुलदीप कोलगे, समर्थ साठे यांसह आदी उपस्थित होते संपादक चैतन्य विलास उत्पात. मो.९२२६२८२००५.

वैशिष्ठ्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर, मंगळवेढा नगर परिषदेसाठी१० कोटीचा निधी.- आ. समाधानआवताडे.

Image
 वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांच्या विविध विकास कामांना १० कोटी रुपये निधी मंजूर - आमदार समाधान आवताडे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विशेष अनुदान म्हणून पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषदांसाठी  विविध विकास कामांना १०कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. मंजूर झालेल्या या निधीमध्ये मंगळवेढा नगरपरिषदसाठी ५ कोटी व पंढरपूर नगरपरिषदसाठी ५कोटी   एवढा निधी आहे. आ. आवताडे यांच्या प्रयत्नांनातून मंजूर सदर निधीमुळे पंढरपूर व मंगळवेढा शहरांच्या विविध विकास कामांना चालना मिळणार आहे. सदर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध होणेकामे आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला होता. देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या प...

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी अंगणवाडीत आरोग्य शिबीर संपन्न.

Image
 कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अंगणवाडीत आरोग्य शिबीर संपन्न. पंढरपूर (प्रतिनिधी) माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यसमरणानिमित्त आज पंढरपुरात येथील तिळवण तेली समाज मठ येथे माजी नगरसेवक आंबादास धोत्रे व सूर्योदय फाउंडेशन याच्या वतीने अंगणवाडी मधील मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर, घेण्यात आले. याचप्रमाणे  शालेय विद्यार्थाना मोफत स्कुल बॅग वाटप तसेच नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेशकुमार माने यांच्यासह डॉ.मंदार सोनवणे,माजी नगरसेवक सायबू चौगुले,माजी उपनगराधक्ष नागेश भोसले,शिवाजी कोळी,सागर यादव,श्रीनिवास बोरगावकर,राजाभाऊ गोसावी,राजाभाऊ कौलवार,बाबुराव पावले सर,डॉ मंदार सोनवने,डॉ प्रदीप केचे,किरण मासाळ,सुनील भिंगे,नानासाहेब ठीगळे,नंदकुमार कटप,लखन चौगुले अनंत कटप,बाबुराव आडगे,राजेश्वर लिगाडे,राजेंद्र पावले,विकास टाकणे,महेश तेंडुलकर,प्रशांत घोडके,मनोज आदलिंगे,शरद कारटकर,युवराज भोसले,...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजुरी.- आ. समाधान आवता.डे

Image
  मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे यांची माहिती पंढरपूर  (प्रतिनिधी ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या मंजूऱ्यांच्या संदर्भात येत्या ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या मंत्रालययीन दालनामध्ये मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची पाणी प्रश्नावर असणारी तळमळ लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आवताडे हे तालुक्याचा पाणीप्रश्न वेळोवेळी शासन दरबारी लावून धरत आहेत. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व ही योजना लवकरात- लवकर मार्गी लागावी या...

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय manjuri- आ. समाधान आवताडे.

Image
 मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी व निधी मंजूर करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात- आ.समाधान आवताडे यांची माहिती पंढरपूर  (प्रतिनिधी ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील आणि जिव्हाळापूरक असणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजूरी देऊन स्वतंत्र निधी उपलब्ध करुन देणेकामी शासन दरबारी असणारी कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. या मंजूऱ्यांच्या संदर्भात येत्या ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या मंत्रालययीन दालनामध्ये मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेची पाणी प्रश्नावर असणारी तळमळ लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आवताडे हे तालुक्याचा पाणीप्रश्न वेळोवेळी शासन दरबारी लावून धरत आहेत. सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व ही योजना लवकरात- लवकर मार्गी लागावी यास...

आधीक महिन्यात मंदिर समितीला ७ कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न.- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.

Image
 अधिकमासात भाविकांकडून मंदिर समितीस रू.7.19/- कोटीचे दान.  *कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांची माहिती.*  पंढरपूर ( प्रतिनिधी) :- अधिकमास दि.१८ जुलै ते दि.१६ ऑगस्ट या कालावधीत संपन्न झाला. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यांना मंदिर समितीकडून पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या अधिकमासात मंदिर समितीस विविध माध्यमांतून रक्कम रू.7,19,43,037/- इतके उत्पन्न मिळालेले आहे. सन 2018 मध्ये रू.2,32,51,924/- इतके उत्पन्न मिळाले होते. सन 2018 च्या तुलनेने यावर्षीच्या अधिकमासाच्या उत्पन्नात रू.4,86,91,113/- इतकी वाढ झाली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.           तसेच या कालावधीत 6,39,917 भाविकांनी पदस्पर्शदर्शन व सुमारे 5,00,000 भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला आहे. श्रींच्या चरणाजवळ, नित्यपुजा, लाडूप्रसाद, अन्नछत्र, देणगी, महानैवेद्य, भक्तनिवास, तुळशीपूजा, मोबाईल लॉकर इत्यादी माध्यमांतून सदरचे उत्प्नन मिळालेले आहे.            अधिकमासात सोने-च...

नायब तहसीलदारास पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक.

Image
उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यास १५ हजारांची लाच घेताना अटक... पंढरपूर (प्रतिनिधी) शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याने दहा गुंठे जागेच्या व्यवहारासाठी वीस हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारताना आरोपी लोकसेवक १) आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, वय ५६ वर्षे पद- नायब तहसिलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर, तसेच सदर लाच रक्कम खाजगी इसम २) आरोपी खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम, वय ५९ वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, रा. घर नंबर ११ गौतम विद्यालय समोर, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर 3) आरोपी खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे, ४६ वर्षे, रा. विट्ठलनगर, गौतम विद्यालय शेजारी, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचेकडे देण्यास सांगून रक्कम स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या शेजारील ५० गुंठे शेतजमीन खरेदी केली असून, सदर शेत जमीन ही १० गुंठे असल्याने सदरच्या खरेदी करीता मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक असते, ...

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक तृतीय पुण्यस्मरण निमित्त विविध कार्यक्रम.

Image
 सहकार कर्मयोगी  सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम.. पंढरपूर( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष, पांडुरंग परिवाराचे श्रध्दास्थान, जनतेच्या मनातील  आमदार, आपल्या नावाप्रमाणे "श्रीमंत" असणारे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे तृतीय पुण्यस्मरण  गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतीस्थळ, वाखरी येथे संपन्न होत आहे. वाखरी येथे सदर कार्यक्रम सकाळी ९ वा. प्रतिमा पूजनाने सुरू होणार आहे.त्यानंतर भव्य रक्तदान शिबीर सकाळी ९.३० वा. आयोजित केले आहे. तर सकाळी १० वा. आदरांजलीपर मनोगते होणार आहेत.ठिक सकाळी ११ वा. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य किर्तन  होणार आहे. किर्तनानंतर ठिक १२ वा. पुष्पाजंली होणार आहे.तद्नंतर दुपारी १२.३० ते २.०० यावेळेत महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी आपण सदर कार्यक्रमास " नियोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतीस्थळ, वाखरी येथे उपस्थित रहावे असे आवाहन देशपातळीवरील "सर्वोत्कृष्ट साखर कारखाना " म्हणून गौरविलेला...

श्री विठ्ठल एज्युकशन अँड रिसर्च सेंटर ची यशोगाथा.

Image
 श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर ची रौप्य महोत्सवी यशोगाथा.       तंत्रशिक्षण क्षेत्रातसन १९९८ साली लावलेल्या ‘स्वेरी’ नावाच्या रोपट्याचे आज एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या २५ वर्षाच्या काळात 'स्वेरी'ने शैक्षणिक, सामाजिक व संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या बहुमोल कार्याचा घेतलेला हा लेखा जोखा.......                    गोपाळपूर (ता.पंढरपूर) हे पंढरपूरच्या शेजारी वसलेले, अध्यात्मिक परंपरा असलेले छोटेसे गाव. या गावाच्या पूर्व बाजूला असलेल्या माळरानावर 'श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' हे शैक्षणिक  नंदनवन फुलले असून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील समृद्ध खेडे प्रत्यक्षात उभा राहिले आहे. पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात उच्च तंत्रशिक्षणाचा नवीन 'पंढरपूर पॅटर्न' स्वेरीने निर्माण केला आहे.         साधारणपणे १९९७ च्या दरम्यान तालुक्यात व जिल्ह्यातही शिक्षणाच्या सुविधा खूप कमी प्रमाणात होत्या. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, सांगली, मुंबई अशा शहरा...

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे गौरवशाली रौप्यमहोत्सवी वर्ष

Image
स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा गौरवशाली रौप्य महोत्सव.            पंढरपूर (प्रतिनिधी) - स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर गेली २५ वर्षे अविरतपणे अनेक पिढ्यांना तंत्रशिक्षणाचे बोधामृत देत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. दि. १७ ऑगस्ट, १९९८ रोजी गोपाळपूरच्या माळावर १३ हजार स्क्वे. फुटाच्या पत्राशेड मधून १६० विद्यार्थी, ८ शिक्षक व २ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह रुजलेल्या या ज्ञानबिजाचे २५ वर्षात सुमारे ५००० विद्यार्थी, २५० शिक्षक, २०० शिक्षकेतर कर्मचारी यांसह विशाल अशा ज्ञानवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच संस्थेचे एकूण आर. सी. सी बांधकाम सुमारे ५.५० लाख स्क्वे.फुट इतके झाले आहे. स्वेरीची ज्ञानपताका गोपाळपूरच्या बाहेर सोलापुरातही फडकली आहे.         स्वेरीने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन आपल्याकडे घेऊन त्या माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअरिंग व आयटीआय या महाविद्यालयांची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.  या गौरवशाली रौप्यमहोत्सवी  महोत्सवाचा सांगता समारंभ  बुधवार, दि. १६ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे.     ...

श्री विठ्ठल प्रशालेत ध्वजारोहण समारंभ संपन्न.

Image
 श्री विठ्ठल प्रशालेत ध्वजारोहण समारंभ संपन्न. पंढरपूर  प्रतिनिधी वेणुनगर श्री विठ्ठल प्रशाला व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. धनंजय उत्तम काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. व्ही.जी.नागटिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी बोलताना श्री विठ्ठल सह. सा. कारखान्याचे संचालक प्रा.तुकाराम मस्के म्हणाले की; १५ ऑगस्ट १९४७ या दिवसी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारतमाता मुक्त झाली तो हा दिवस. स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नाही त्यासाठी अनेक वीरजवानांनी प्राणाचे बलिदान दिले. आज स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना इतिहासात पाठीमागे वळून पाहिले असता आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात अनेक आघाडीवर दैदिप्यमान प्रगती केलेली आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि प्रगतिचा नावलौकीक टिकविण्यासाठी तुम्ही विद्यार्थीनी स्वच्छतेचा व पर्यावरण सुरक्षीत राखण्याचा संदेश घरोघरी पोहचवण्याचे व भ्रष्टाचार मुक्त बलशाली भारत घडवायचा असेल तर प्रत्येक विद्याध्यान...