शालेय जीवनातील धेयनिश्चिती हाच यशाचा धागा.- रोहिणी बानकर.


 *शालेय जीवनातील ध्येय निश्चिती हाच यशाचा पाया- रोहिणी बानकर

पंढरपूर (प्रतिनिधी)

शालेय जीवनातच ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दिशेने कठोर परिश्रम व मेहनतीने सातत्याने पुढे जात राहणे हाच यशाचा पाया असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले त्या विनादप्तर शाळा उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथे बोलत होत्या.

 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे होते . विचारपीठावर संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष गुळवे ,प्रशालेचे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे  सहशिक्षक  संजय कुलकर्णी,सीमा बाबर हे  उपस्थित होते .

यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की स्पर्धा परीक्षांचा पाया हा शालेय शिक्षणात असून चांगली सुसंगती शालेय वयात असेल तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास निश्चित होतो.तंत्रज्ञानाचा संधी म्हणून आपण  योग्य वापर केला पाहिजे .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दर शनिवारी विनादप्तर शाळा आनंदी शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाची शिदोरी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने केला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य संधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे साठी हे उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण ओळखून त्यांना आकार देणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दादासो खरात यांनी केले सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय कुलकर्णी यांनी मानले.


*चौकट*- दर शनिवारी विना दप्तर शाळा आनंदी शाळा हा उपक्रम श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे  अध्यक्ष कल्याण काळे यांच्या संकल्पनेतून श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये राबवला जात असून पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम व विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले जाते यातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व नितीमूल्यांचे धडे मिळतात.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२७.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.