तावशी येथे घरावर धाडसी दरोडा.


 तावशी येथे घरावर धाडसी दरोडा.

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्यातील तावशी येथे शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ वाजून ४५मिनिटांनी गणेश सुभाष आसबे यांचे राहते घरी चोरट्यांचा धाडसी दरोडा पडला . गणेश असबे हे नोकरी निमित्त अमरावतीला असतात त्यांचे घरी त्यांची पत्नी सौ करिष्मा आसबे व आई कस्तुरा असबे या दोघीच घरी असतात सदर घटनेवेळी करिष्मा असबे या भांडी घासत असताना त्यांचे तोंड दाबून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या वस्तू अंदाजे तीन तोळे त्यामध्ये अडीच अडीच ग्रॅमच्या दोन अंगठ्या पाच ग्रॅमची एक अंगठी एक ठुशी व मंगळसूत्र असा एकूण तीन तोळे सोने लंपास केले संध्याकाळी पावणे नऊ वा. पडलेल्या दरोडेने ग्रामस्थ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर दरोडे ची बातमी ग्राम सुरक्षा दलाच्या मार्फत आले असता शेकडोंच्या संख्येने जमाव गणेश आसबे यांच्या घराकडे जमा झाला . घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार सचिन आटपाडकर प्रशांत शिंदे यांचे यांचे सह तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोच झाले . इतक्या लवकर हा धाडसी दरोडा पडल्याने ग्रामस्थांसह पोलिसहि चक्रावले आहेत . या दरोडे मुळे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान निर्माण झाले आहे सदर घटनास्थळी सरपंच गणपत यादव उपसरपंच अमोल कुंभार एडवोकेट तानाजी सरदार यांचे सह शेकडो ग्रामस्थ जमा होते . घटनेची माहिती मिळताच स्वतः डी वाय एस पी अर्जुन भोसले सुद्धा हजर होते तसेच रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सोलापूरचे क्राईम ब्रँचचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. ग्रामीण भागातील या धाडसी दरोड्यामुळे पोलिसांसमोर एक प्रकारे चॅलेंज  निर्माण झाले आहे. तर पोलीस दलही सदर घटनेचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडत आहे सदर घटनेची तक्रार सौ करिष्मा गणेश  आसबे यांनी दिली आहे. अशा धाडसी दरोडे मुळे ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर घटनेचा तपास लावून पोलिसांनीही अशा जबर गुन्हेगारांना वेळी शासन दिले तरच अशा घटनांना आळा बसेल.

संपादक.

चैतन्य उत्पात.

मो.९४०३८७३५२३.

९२२६२८२००५.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.