शासन आपल्या दारी, उपक्रमाच्या जागेची पाहणी.
शासन आपल्या दारी उपक्रमाच्या जागेची पाहणी
शासन आपल्या दारी हा उपक्रम पंढरपूर येथे दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी होणार
पंढरपूर (प्रतिनिधी): विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून पंढरपूर येथील वाखरी हद्दीतील वाखरी-कोर्टी बाह्यवळणरस्ता येथील जागेची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.
शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी किमान ३०ते ३५हजार लाभार्थी येणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान शासकीय योजनांची माहिती देणारे ५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यस्थळी वॉटरप्रुफ मंडप उभारणी, आसन व्यवस्था, वाहनतळ, आरोग्य सुविधा, लाभार्थ्यांना लाभाचे मान्यवरांच्या हस्ते वाटपाचे काटेकोर नियोजन, वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी याबाबत नियोजन, विद्युत व्यवस्था आदीबाबतची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली.
वाखरी हद्दीतील वाखरी-कोर्टी बाह्यवळणरस्ता येथील जागेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयाचे डॉ. धीरज चव्हाण, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, अजिंक्य घोडगे, पोलीस उपअधिक्षक रोहिणी बानकर,महावितरणचे अधिक्षक अभियंता संजीवकुमार शिंदे,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता अमित निंबकर,एस.टी महामंडळाचे विभागीय नियत्रंक विनोद भालेराव,पोलीस निरिक्षक मिलींद पाटील, अरुण फुगे,उपप्रादेशिक परिवहन विभागाचे श्री रायबान उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.

Comments
Post a Comment