पंढरीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायी, वासरांना जीवदान.
पंढरीत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गायी, वासरांना मिळाले जीवदान. हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने केली कारवाई.
पंढरपूर (प्रतिनिधी)श्री शिवप्रतिष्ठान,हिंदुस्तान आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी शुक्रवार दी.२५ ऑगस्ट रोजी पहाटे कत्तलखान्यात नेण्यात येणार २६ जनावरे पोलिसांच्या सहकार्याने पकडुन मुक्या जीवांची सुटका केली. पंढरपूर येथे पहाटे ही कामगिरी करण्यात आली.
एम एच ४२ एम ४२७६ या टेंपो मधून फलटण तालुक्यातील कत्तलखान्यात कत्तली साठी २२ वासरे व ४ गाईंना नेण्यात येत होते. पंढरपूर मध्ये पकडून अहिंसा गोशाळा येथे सोडण्यात आले यात एक गाई मृत्य पावली.
या वेळी कारवाई साठी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब, पोलीस निरीक्षक अरुण फुगे साहेब, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत , पोलीस हेडकॉन्स्टेबल बिप्पीनचंद्र ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल अंकुश माळी या प्रशासनातील मंडळी ने चे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले .
ही कारवाई गोरक्षक करणं धोत्रे, धनाजी ताड, शिवम वाघमारे, सुनील काका अभंगराव, अवधूत घाटे, शुभम पवार सौरभ थिटे,, राम काळे, आदित्य रणदिवे, अनुज तुपसुंदर, सुरज पवार, प्रदीप चौघुले, सोलापूर चे बजरंग दलचे विरु मंचाल, सतीश खटके, समर्थ गुजले हे तसेच श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी कारवाई यशस्वी केली.
सोलापूर जिल्ह्यात काही ठराविक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये बडे का,म्हणजेच बैल,गायी,वासरे अशा प्राण्याचे मांस विकले जात आहे. यामुळे भाकड, तसेच देवाला सोडलेली गायी, बैल पकडुन कत्तली साठी पाठविण्यात येते. पंढरपूर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री श्रावण महिन्यात श्री कृष्णास प्रिय असणाऱ्या गोवंशास जीवदान मिळाल्याने नागरिक, भाविकामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.
मो.९४०३८७३५२३.
९२२६२८२००५.

Comments
Post a Comment