भाजप महिला आघाडीच्या वतीने नमो सप्ताह निमित्त पथनाट्य सादरीकरण.


 भाजप महिला आघाडी यांच्या वतीने पंढरीत "नमो सेवा सप्ताह" निमित्त पंढरपुरात जनजागृती पर पथनाट्याचे आयोजन.

पंढरपूर (प्रतिनिधी)

देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत पंढरपूर पंचायत समितीच्या समोर 'नमो सेवा सप्ताह जनजागृती पर पथनाट्य' कार्यक्रम उत्साहात पार पडला.


भारतीय जनता पार्टी पंढरपूर तसेच पंढरपूर–मंगळवेढ्याचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार श्री.समाधान दादा अवताडे ,मा.आमदार श्री.प्रशांत मालक परिचारक तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष श्री.शशिकांत नाना चव्हाण त्याचबरोबर पंढरपूर तालुक्याचे युवक नेते श्री प्रणव मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली 

व भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे यांच्या संकल्पनेतून व दिग्दर्शनातून हे पथनाट्य पार पडले.


यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशाला दिलेल्या कल्याणकारी योजनांचे नाटकीय सादरीकरण पथनाट्यातून करण्यात आले.


यासाठी पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी व इंजिनिअरिंगच्या २० विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला होता.

या पथनाट्यात उज्वला गॅस योजना, कलम ३७०, जनधन बँक खाते तीन तलाक रद्द,२६/११दहशतवादी हल्ल्यानंतरची परिस्थिती, अशा विषयावर भाष्य करण्यात आले होते,

संपूर्ण दिग्दर्शन डॉ प्राजक्ता बेणारे यांनी केले होते, हे पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी या कार्यक्रमास युवा नेते, मंगळवेढा नगरपरिषदेचे विद्यमान लोकप्रिय नगरसेवक श्री.सोमनाथ मालक अवताडे

(सभापती क्रीडा,शिक्षण व सांस्कृतिक विभाग मंगळवेढा नगरपरिषद,मंगळवेढा) पंढरपूर पंचायत समिती सभापती डॉ.श्री.शुभम दादा आगावणे, 

पंढरपूर नगरपरिषदेचे विद्यमान व लोकप्रिय उपनगराध्यक्ष श्री.महादेव बॉस धोत्रे,

भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री श्री.अनुप दादा देवधर,

तालुकाध्यक्ष श्री.सुभाष मस्के सर,

पंढरपूर भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष डॉ.ज्योती शेटे,

जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व जिल्हा सरचिटणीस सौ.सुप्रिया काकडे,

मंगळवेढा भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.आशा पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते.


या कार्यक्रमास विशेष सहकार्य स्वेरी कॉलेजचे प्रमुख माननीय 

श्री.डॉ.बीपी रोंगे सर, श्री.एम.एम पवार सर,

डॉ.एम.एम पवार मॅडम,

डॉ.एम.एस मठपती सर, 

प्रा.अमोल चौंडे

या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.


यामध्ये उत्तम सादरीकरण करणारे विद्यार्थी, श्री.ज्ञानेश्वर भैरु शिंदे, शुभम संतोष मोरे,आयुष संताजी पवार,योगेश प्रल्हाद आनंदे,चैतन्य महादेव पिसे,अंकिता आनंद राजमाने,आरती हनुमंत सावंत,साक्षी शशिकांत थोरात,सिद्धी जयकुमार कांबळे,आदित्य सुनील मेटे,सुप्रिया महादेव क्षीरसागर,राजेश्वरी कृष्णात सुतार,सानिका बंडू इंगवले, ऋतुजा शरद काळदाते, हर्षद हरिश्चंद्र लोंढे,प्रणव परमेश्वर नवले,ऋषिकेश किशोर नवले,शैलेश वसंत आंधळे,मनोज विठ्ठल शिंदे, विश्वजीत संजय भोंग, श्रेयस कुमार लोखंडे,

तसेच या सर्व कार्यक्रमाचे उत्तम चित्रीकरण श्री.कार्तिक राजेंद्र ढवळे यांनी केले 


या पथनाट्यानंतर लोकप्रिय नगरसेवक श्री.सोमनाथ मालक अवताडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनास आमंत्रित केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.