पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना,_श्री उमेश परिचारक.


 पंढरपूर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर प्रोड्यूसर कंपनी, युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांची माहिती. 

 पंढरपूर(प्रतिनिधी )_

पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विविध फळबागा, आणि त्यांचे उत्पादन घेताना योग्य मार्गदर्शन आणि सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 

सुधाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उमेश परिचारक यांनी दिली,नाशिक येथील सह्याद्री ऍग्रो ,आणि सुधाकर फॉर्मर प्रोड्यूसर  कंपनी लिमिटे ड यांच्या वतीने युटोपियन शुगर्स चे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी बुधवार दिनांक २३सप्टेंबर रोजी कऱ्हाड रोड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते,

यावेळी   नाशिक येथील सह्याद्री ऍग्रो चे संस्थापक, अध्यक्ष मंगेश भास्कर युटोपियन शुगर्स चे कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, ऋषिकेश परिचारक, प्रदीप शिंदे,प्रगतिशील शेतकरी,

उद्योजक सी एन देशपांडे, उद्धव बागल,प्रभारी कृषी अधिकारी दीपाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

उमेश परिचारक म्हणाले संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे पारंपारिक द्राक्ष जाती पिकवताना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे तसेच सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यातील फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे आवश्यक आहे,

सध्या पंढरपूर तालुक्यात ७६५एकर द्राक्षबागा, ४०हजार एकर डाळिंब, २२हजार एकर पेरू, १०हजार एकर क्षेत्रावर सीताफळ अशी लागवड करण्यात आली आहे,

संपूर्ण जग हे मागणी तसा पुरवठा या तत्वावर अवलंबून आहे, कोविड नंतर द्राक्षमाल शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मागे लागून कवडीमोल भागाने विकावा लागला,

सह्याद्री ऍग्रो ही पारंपारिक द्राक्ष जाती, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, युनिट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,

सह्याद्री ऍग्रो यांच्या मदतीने सभासदांनी ३००एकर लागवड केली असून १५०एकर वर फळ मार्च महिन्यात येईल अशी माहिती उमेश परिचारक यांनी दिली,

कॅलिफोर्निया येथील विशिष्ट प्रकारच्या द्राक्ष जाती सह्याद्री अग्रोने दिल्या आहेत. या या द्राक्ष रोपांना औषधे लागत नाहीत, उत्तम गुणवत्ता असल्याने १६० ते १७० रुपये दर मिळाला आहे. 

सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुका या परिसरातील वातावरण कोरडे हवामान असलेले असून सूर्यप्रकाश स्वच्छ असल्याने द्राक्ष बागेसाठी हे पोषक हवामान आहे सध्या सुधाकर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे ७२४ सभासद असून त्यांच्या विविध प्रकाराच्या मार्गदर्शनाचा उपयोग शेतकऱ्यांना होत आहे, जियो टॅगिंग, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना द्राक्ष तसेच ईतर फळांना योग्य दर मिळत आहे.

या शेतकरी मेळाव्यास ४५०फळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

सुरुवातील उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मंगेश भास्कर यांनी सुमारे दोन तास मार्गदर्शन केले.

चौकट.

शेतीत काम करण्यासाठी आपल्या जिल्हा तसेच तालुक्यात मजूर मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी बिहार येथून मजूर आणले आहेत, तालुक्यातील युवकांनी आळस झटकून शेती मध्ये काम केल्यास चांगला रोजगार उपलब्ध होईल. असे मत परिचारक यांनी व्यक्त केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.