पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू.
नादुरुस्त कंटेनरला बुलेट ची धडक; मित्र अभिषेक धावरे गंभीर जखमी.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील उद्धव कोळी या युवकाचे गोव्यात दुर्दैवी अपघाती निधन झाले.
उद्धव आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
शुक्रवार
ता. १८ रोजी राज्यातील गोवा कुर्टी- खांडेपार महामार्गावर केरये येथे कंटेनर आणि मोटारसायकलची
भीषण धडक झाली. या अपघातात भोसे (करकंब, ता. पंढरपूर) येथील उद्धव बाळासाहेब कोळी (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र अभिषेक भीमराव धावरे (वय २५) हा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (ता. १८) दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
राजस्थानहून माल घेऊन गोव्यातील फोंडा येथे आलेला आरजे ०६ जीसी
९९८९ क्रमांकाचा कंटेनर केरये येथे अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे तो महामार्गाच्या कडेला थांबवून दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान, महाराष्ट्रातून फोंड्याकडे भरधाव जाणाऱ्या एमएच १३ एफबी ५०१९ क्रमांकाच्या बुलेट मोटारसायकलची मागून कंटेनरला
जोरदार धडक झाली. या धडकेत मोटारसायकल चालक उद्धव कोळी याचा जागीच मृत्यू झाला, तर अभिषेक धावरे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चौकट.
उद्धव हा गावात अत्यंत प्रसिद्ध, मनमिळावू युवक होता, नुकतेच त्याचे लग्न ठरले होते, गोव्यात एका वैद्यकीय कंपनीत तो नोकरी करीत होता,
त्याच्या अपघाती जाण्याने पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment