वाढदिवस असूनही कर्तव्याला प्राधान्य देऊन आ अभिजीत पाटील यांनी शिकागो येथील ऊसशेतीची पाहणी केली.


 वाढदिवस असूनही कर्तव्याला प्राधान्य देऊन आ. अभिजीत पाटील यांनी शिकागो येथील ऊसशेतीची पाहणी केली.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_ पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील सुपुत्र आणि 

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील  यांनी शिकागो येथील एका ऊसाच्या शेतात आपला वाढदिवस साजरा केला.

 अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आ . पाटील गेले होते

अमेरिकन ऊसशेती आणि भारतीय पद्धती यात कोणता फरक आहे याची पाहणी त्यांनी केली,

कायमच अभ्यासू आणि जिज्ञासु विचार असलेले आ.अभिजीत पाटील यांच्या या  भेटीचा निश्चितच मोठा फायदा भारतीय ऊसशेतीला होणार आहे, वाढदिवस असूनही शेतीची पाहणी करत

 शेतीविषयीची आपली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या अनोख्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

शिकागो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील ३२ आमदार सहभागी झाले होते. त्यामध्ये आमदार अभिजीत पाटील यांचाही समावेश होता. परिषदेनंतर त्यांनी अमेरिकेतील शेतीपद्धती, सिंचन व्यवस्था आणि अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास

केला.

यावेळी महाराष्ट्रातील मूळचे डॉ. बालाजी आगलावे यांनी आपल्या शेताची पाहणी करून अमेरिकेतील आधुनिक शेतीविषयी सविस्तर माहिती दिली. कमी मनुष्यबळ, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर शेती कशी केली जाते, याची माहिती आमदार पाटील यांनी जाणून घेतली. तसेच, अमेरिकेत पिण्याचे पाणी महाग असले तरी कृषी उत्पादन तुलनेने

स्वस्त असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. अमेरिकेतील कृषी व्यवस्थेतील चांगल्या

पद्धतींचा अभ्यास करून महाराष्ट्रात परतल्यानंतर त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ कशी साधता येईल, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत

अमेरिकेच्या दौऱ्यात पर्यटनापेक्षा शेतीचा अभ्यास करण्याला प्राधान्य देत उसाच्या शेतात साधेपणाने वाढदिवस

अत्यंत साधासुधा साजरा केला, त्यांच्या भेटीचा फायदा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.