पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड चित्रपट प्रदर्शित झाला.


 पंढरपूर येथील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा हॉरर , सस्पेन्स घबाडकुंड, सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर,

युवा दिग्दर्शक सागर जाधव यांचे होत आहे अभिनंदन.

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील युवा,सर्जनशील सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव यांचा घबाडकुंड हा मराठी सस्पेन्स, हॉरर , कॉमेडी मराठी चित्रपट शुक्रवार दी १९जून रोजी महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होत असून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातून एक उदयोन्मुख युवा दिग्दर्शक सोलापूर जिल्ह्याचे नाव उंचीवर नेत असल्याने पंढरपूर शहरात सागर जाधव या युवकाचे कौतुक

होत आहे,

सागर जाधव यांना बालपणा पासूनच सिने क्षेत्राचे आकर्षण आणि औत्सुक्य होते, सागर यांनी बाहुबली १, वेदात वीर दौडले सात, एलिझाबेथ एकादशी, रिंगण, जिगरिया (हिंदी)कन्यारत्न आदी सिनेमात अभिनय केला आहे मात्र सहाय्यक दिग्दर्शक म्हणून,घबाडकुंड, हा पहिलाच चित्रपट असल्याचे सागर यांनी सांगितले,

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील हे असून पुणे येथील लोणी काळभोर परिसरातील डोंगराळ भागात, निबीड जंगलात या सिनेमाचे सलग चित्रीकरण करण्यात आले आहे.

या चित्रपटात संदीप पाठक, देवदत्त नागे, शशांक शेंडे, प्राजक्ता हणमघर , कुशल बद्रिके, समिता पायगुडे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट हिंदी भाषेत देखील  डब करण्यात येणार आहे. 

सिनेमाची पटकथा संजय नवगिरे, कथा अक्षय धर्मपाल, डी आर रसिक कदम, यांची असून संगीत अभय जगताप यांचे आहे.

या चित्रपटाविषयी माहिती देताना सहाय्यक दिग्दर्शक सागर जाधव म्हणाले, हा चित्रपट युनिव्हर्सल आहे, रहस्यमय असा थरार, वेगळेपण असणार आहे,

हॉरर फिल्म असल्याने साठ टक्के शूटिंग रात्री करण्यात आले आहे.

सलग ४०दिवस चित्रीकरण सुरू होते,

लोकांना असे सिनेमे आवडत असल्याने मराठीत एक वेगळा प्रयोग केला आहे असे सागर जाधव यांनी सांगितले.

चौकट.

मराठी चित्रपट समृद्ध होत असून आता मराठी भाषेत मुंजा,दशावतार, तुंबाड, काळसेकर आहेत का?, ऐक, स सासूचा,सावट, गाढ अंधार,लपाछपी, बाली,झोंबिवली, तुंबाडची मंजुळा असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट तयार होत आहेत.

घबाडकुंड हा चित्रपट जागतिक स्तरावर जाणार असून प्रेक्षकांनी वेगळ्या थ्रिलिंग अनुभवासाठी हा चित्रपट पहावा.

सागर जाधव.

पंढरपूर.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.