सौ सुप्रिया बागल यांची भूजल सर्वेक्षण उपअभियंता पदी निवड.
सौ सुप्रिया बागल यांची भूजल सर्वेक्षण उप अभियंतापदी निवड,
गादेगाव आणि पंढरपूर मधून शुभेच्छांचा वर्षाव.
पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सौ.सुप्रिया राहुल बागल यांची उपअभियंता (यांत्रिकी) गट-अ (Class-1) या पदी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन या विभागामध्ये निवड झाल्याने गादेगावकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गादेगावातील कष्टाळू शेतकरी श्री नारायण महादेव बागल उर्फ बंडू आण्णा यांच्या सुनबाई सौ सुप्रिया राहुल बागल राहणार गादेगाव यांची महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या खात्यामध्ये क्लास-१ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन... श्री नारायण महादेव बागल यांचा मुलगा श्री राहुल नारायण बागल हेही महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदी सेवेत आहेत. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि सून महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी पदावर काम करणारे पहिलेच उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस गादेगाव आणि पंढरपूर येथील त्यांचे नातेवाईक व हितचिंतक यांनी शुभेच्छा दिल्या.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment