जे ई ई मेन्स परीक्षेत प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करिअर क्लास चे दणदणीत यश, दोन विद्यार्थी गुणवत्तायादित.


 ..


JEE Mains २०२६ मध्ये प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट चे दणदणीत यश कु. वैभवी पांडुरंग कोळी ९९.३० पर्सेटाईल मिळवून पंढरपूर प्रथम !


प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी पटकावला शहरात प्रथम व द्वितीय क्रमांक .

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर : यशाची परंपरा जपणाऱ्या प्रा. व्हि. डि. परिचारक व प्रा. मंदार वि. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटने JEE Mains २०२६ परिक्षेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रा. परिचारक सरांच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत भव्य यश संपादन केले आहे. कु. वैभवी पांडुरंग कोळी हिने ९९.३० पर्सेटाईल मिळवत पंढरपूरात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. ईशान गणेश बाळेकर याने ९७.३१ पसेंटाईल मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. या भरीव यशामुळे क्लासचे, पालकांचे तसेच पंढरपूर शहराचे नाव उज्ज्वल झाले आहे.


या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटवरील दृढ विश्वास हे प्रमुख घटक ठरले. विद्यार्थ्यांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता क्लास मधील नियोजनबद्ध अभ्यासक्रमानुसार तयारी केली. क्लासने स्वतः तयार केलेल्या नोट्स १२ वी बोर्ड, CET, NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परिक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे सांगितले की, दर आठवड्याला घेण्यात आलेल्या परिक्षा, मॉक टेस्ट, सराव परिक्षा तसेच डाऊट सॉल्व्हिंग सत्रांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि संकल्पना अधिक भक्कम झाल्या. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित विश्लेषण व वैयक्तिक मार्गदर्शनामुळे त्यांना योग्य दिशेने अभ्यास करता आला.

प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रातील ४३ वर्षांची विश्वासार्ह परंपरा लाभलेली असून गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध वातावरण व अनुभवी शिक्षकवर्ग ही क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकवर्गाला दिले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल क्लासचे संचालक, शिक्षकवर्ग व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.